गोल्फ आणि EU व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी ट्रम्प यांचा स्कॉटलंड दौरा

0

दोषी वित्तपुरवठादार आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत छाननीला सामोरे जाणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी गोल्फच्या एका फेरीसाठी आणि युरोपियन युनियनशी (EU) व्यापार कराराचा मार्ग मोकळा करणाऱ्या बैठकांसाठी स्कॉटलंडमध्ये पोहोचले.

ट्रम्प यांनी आगमनानंतर पत्रकारांना सांगितले की ते स्कॉटलंडमधील त्यांच्या दोन गोल्फ मालमत्तांना भेट देतील आणि ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर तसेच युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांची भेट घेतील, ज्यांना त्यांनी ‘अत्यंत आदरणीय महिला’ असे संबोधले आहे.

50-50 टक्के संधी

ट्रम्प यांचे विमानतळावर आगमन झाले त्यावेळी शेकडो समर्थकांनी त्यांचा जयजयकार केला. युरोपियन युनियनसोबत (EU) करार होण्याची 50-50 टक्के शक्यता असल्याबद्दलची आपली पूर्वीची टिप्पणी ट्रम्प यांनी परत एकदा केली. जर हा करार झाला तर तो त्यांच्या प्रशासनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार असेलही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र ब्रुसेल्ससोबत “कदाचित 20 वेगवेगळ्या गोष्टींबाबत” अजूनही “अडचणीचे मुद्दे” असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ट्रम्प म्हणाले की, स्टारमर यांच्यासोबतची आपली भेट म्हणजे  काम सुरू ठेवण्यापेक्षा आधीच झालेल्या व्यापार कराराचा उत्सव असेल, “दोघांसाठीही हा एक मोठा सौदा आहे.”

वॉशिंग्टन सोडण्यापूर्वी, ट्रम्प म्हणाले की त्यांचे प्रशासन युरोपियन युनियनसोबत (EU) संभाव्य व्यापार करारावर कठोर परिश्रम करत आहे आणि ब्रुसेल्स करार करण्यास उत्सुक आहे. वॉन डेर लेयन यांनी नंतर सांगितले की रविवारी स्कॉटलंडमध्ये ट्रम्प यांची आपण भेट घेणार आहोत.

युरोपियन युनियनच्या (EU) राजनैतिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या करारामुळे EU च्या वस्तूंवर 15 टक्के कर लागू होऊ शकतो, जो या आठवड्यात जपानसोबत झालेल्या फ्रेमवर्क कराराचे आणि ट्रम्प 1 ऑगस्टपर्यंत लागू करण्याची धमकी देत असलेल्या 30 टक्के करांपैकी निम्म्या करांसारखे आहे.

एप्रिलमध्ये जवळजवळ सर्व व्यापारी भागीदारांवर 10 टक्के दर लादल्यानंतर आणि आतापासून एका आठवड्यात अनेक देशांना तीव्र उच्च दर लागू करण्याची धमकी दिल्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. ट्रम्प म्हणतात की या पावलांमुळे अमेरिकेची व्यापार तूट कमी होईल आणि अतिरिक्त महसूल मिळेल, परंतु अर्थशास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की नवीन व्यापार धोरणांमुळे चलनवाढ होऊ शकते.

‘ट्रम्पबद्दल बोलू नका’

दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठ्या देशांतर्गत राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या ट्रम्प यांनी एपस्टाईन यांच्यावरील गुन्हेगारी आरोप आणि 2019 मध्ये तुरुंगात झालेल्या त्यांच्या मृत्यूशी संबंधित तपास फायली हाताळण्याबाबत त्यांच्या प्रशासनाच्या सुरू असलेल्या प्रश्नांबद्दल निराशा व्यक्त केली.

“तुम्ही जी गोष्ट मोठी करून दाखवण्याचा प्रयत्न करताय ती तितकी मोठई गोष्ट नाही,” असे ट्रम्प यांनी स्कॉटलंडमध्ये पत्रकारांना सांगितले आणि त्यांना माजी अध्यक्ष बिल क्लिंटनसह एपस्टाईनशी संबंध असलेल्या इतर प्रमुख अमेरिकन लोकांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

“क्लिंटनबद्दल बोला. हार्वर्डच्या माजी अध्यक्षांबद्दल बोला. त्यांच्या सर्व मित्रांबद्दल बोला. त्यांच्यासोबत नेहमीच असलेल्या हेज फंडच्या लोकांबद्दल बोला. ट्रम्पबद्दल बोलू नका,” असे ते म्हणाले. “तुम्ही ज्याबद्दल बोलले पाहिजे ते म्हणजे अध्यक्षपदाच्या इतिहासातील सर्वोत्तम सहा महिने आपल्याकडे आहेत.”

एपस्टाईन प्रकरणामुळे ट्रम्प यांच्या काही सर्वात विश्वासू मेक अमेरिका ग्रेट अगेन समर्थकांमध्ये एक मोठा मतभेद निर्माण झाला आहे आणि बहुतेक अमेरिकन तसेच ट्रम्प यांचे रिपब्लिकन म्हणतात की त्यांना वाटते की सरकार या प्रकरणातील तपशील लपवत आहे, असे अहवालात म्हटले आहे.

ट्रम्प परदेशात असताना हा वाद कमी होईल अशी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांना आशा आहे, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी सांगितले.

संबंध दृढ करा

ट्रम्प या आठवड्याच्या शेवटी स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील त्यांच्या टर्नबेरी येथील जागेत राहतील, सोमवारी एबरडीनमधील एका गोल्फ कोर्टमध्ये ते त्यांच्या आई मेरी अँनी मॅकलिओड यांच्या सन्मानार्थ दुसऱ्या 18-होल कोर्सचे उद्घाटन करतील. मॅकलिओड यांचा जन्म आणि पुढील वाटचाल स्कॉटिश बेटावर झाला आणि नंतर त्या अमेरिकेत स्थलांतरित झाल्या.

व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना ट्रम्प म्हणाले की ते स्टारमर आणि स्कॉटिश नेते जॉन स्विनी यांना भेटण्यास उत्सुक आहेत, ज्यांनी 2024 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांना सार्वजनिकरित्या पाठिंबा दिला होता.

या दौऱ्यामुळे ट्रम्प आणि स्टारमर यांना त्यांचे आधीच चांगले असणारे संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. शिवाय युक्रेनमधील रशियाचे युद्ध संपवणे या अजेंड्यावरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा  होणार आहे, असे ब्रिटिश आणि अमेरिकन सूत्रांनी सांगितले.

गाझामधील बिघडणारी परिस्थिती देखील समोर येण्याची शक्यता आहे. स्टारमर यांनी गुरुवारी सांगितले की ते फ्रान्स आणि जर्मनीशी आपत्कालीन फोनवर बोलतील ज्याला त्यांनी तेथे नोंदवल्या जाणाऱ्या “अकथनीय आणि अक्षम्य” दुःख आणि उपासमारीबद्दल सांगितले तसेच  इस्रायलला पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये मदत प्रवेश करण्यास परवानगी देण्याचे आवाहन केले.

गाझा आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की 100 हून अधिक लोक अलिकडच्या काळात उपासमारीने मरण पावले आहेत. या प्रदेशाच्या अगदी बाहेर टनभर अन्न आणि इतर पुरवठा अबाधित असताना देखील मोठ्या प्रमाणात उपासमार पसरत असल्याचे मानवाधिकार गटांनी म्हटले आहे.

चांगले संबंध

गेल्या वर्षी निवडून आल्यापासून, स्टारमर यांनी ट्रम्प यांच्याशी चांगले संबंध ठेवण्यास प्राधान्य दिले आहे, मे महिन्यात अमेरिकेसोबत पहिला टॅरिफ-कपात करार साध्य करण्यासाठी काम करत असताना, ब्रिटनच्या संरक्षण आणि सुरक्षा युतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

फ्रेमवर्क कराराने ब्रिटिश ऑटोमोबाईल्सवरील कोटा आणि टॅरिफ दरांची पुष्टी केली आणि ब्रिटनच्या एरोस्पेस क्षेत्रावरील टॅरिफ काढून टाकले, परंतु स्टील टॅरिफ कायम ठेवले.

स्टारमर स्टील टॅरिफ कमी करण्यासाठी दबाव आणण्याची अपेक्षा आहे, परंतु या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की ट्रम्पच्या भेटीदरम्यान यात काही यश येणे शक्य आहे की नाही हे स्पष्ट नाही.

ट्रम्प यांनी स्कॉटलंडचे वर्णन “खूप खास ठिकाण” म्हणून केले आहे आणि 2016 मध्ये अध्यक्षपदाच्या त्यांच्या आधीच्या शर्यतीत तेथे असाच दौरा केला होता, परंतु त्यांचे जोरदार स्वागत होणार नाही.

मार्चमध्ये झालेल्या इप्सॉस पोलमध्ये असे आढळून आले की सुमारे 70 टक्के स्कॉट्सचे ट्रम्प यांच्याबद्दल प्रतिकूल मत आहे, तर 18 टक्के लोकांचे अनुकूल मत आहे.

स्कॉटिश पोलिस शनिवारी एबरडीन आणि देशाची राजधानी एडिनबर्ग या दोन्ही ठिकाणी निदर्शनांसाठी सज्ज झाले आहेत.

राजा चार्ल्स यांनी आयोजित केलेल्या राजकीय दौऱ्यासाठी ट्रम्प 17 ते 19  सप्टेंबर या काळात ब्रिटनला परत एकदा भेट देणार आहेत. त्यामुळे ब्रिटनला दोन वेळा राजकीय भेटी देणारे ट्रम्प हे आधुनिक काळातील पहिले जागतिक नेते ठरतील. दिवंगत महाराणी एलिझाबेथ यांनी जून 2019 मध्ये बकिंगहॅम पॅलेसमध्ये तीन दिवसांच्या राजकीय दौऱ्यासाठी त्यांचे स्वागत केले होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत-मालदीव संरक्षण संबंध पुन्हा रुळावर; विमान संचालन कराराचे नूतनीकरण
Next articleOperation Sindoor: India’s Stern Response to Pakistan, Army Chief Dwivedi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here