ट्रम्प यांनी मदत रोखल्यामुळे, म्यानमार निर्वासितांसाची आरोग्य सेवा ठप्प

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी गेल्या आठवड्यात बहुतेक परदेशी मदती गोठवल्यामुळे, थाय-म्यानमार सीमेवरील हजारो निर्वासितांना सेवा देणारी आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. संबंधित आरोग्य सेवा केंद्रे बंद करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे, थायलंडच्या अधिकाऱ्यांना तेथील आजारी रुग्णांना इतर वैद्यकीय सुविधांमध्ये हलवण्यास भाग पाडले गेले.

‘अमेरिकेच्या समर्थनासह वैद्यकीय केंद्रांना निधी पुरवणाऱ्या, आंतरराष्ट्रीय बचाव समितीने (IRC), शुक्रवार, 31 जानेवारीपर्यंत सुविधा बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे’, स्थानिक अधिकारी आणि दोन शिबिर समिती सदस्यांनी सांगितले.

ट्रम्प यांची मदत फ्रीझ

ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात, त्यांच्या “अमेरिका फर्स्ट” धोरणाशी सुसंगततेचे मूल्यांकन करण्यासाठी, यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) कडून मिळणारे विकास सहाय्य 90 दिवसांसाठी थांबवले होते.

या फ्रीझमुळे जागतिक मदत क्षेत्रात अराजकता निर्माण झाली आहे, जिथे अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर सहाय्यता निधी पुरवला आहे.

राज्य विभागाने मंगळवारी जारी केलेल्या 90-दिवसांच्या फ्रीजचा, लाखो लोकांचे जीवन वाचवणाऱ्या मानवतावादी सहाय्यावर काय परिणाम होईल तसेच सुमारे 1 लाख लोक राहत असलेल्या, नऊ शिबिरांमधील किती केंद्रांवर याचा कसा परिणाम होईल, हे त्वरित स्पष्ट झालेले नाही.

सीमेवरील या आरोग्य सुविधा संघर्षग्रस्त म्यानमारमधील हजारो निर्वासितांना नियमीत आरोग्य सेवा पुरवतात.

था सॉन्ग यांग जिल्ह्यातील माई ला कॅम्प येथील निर्वासित समितीचे सदस्य आणि स्थानिक शाळेतील शिक्षक- ब्वेह से यांनी बुधवारी सांगितले की, ”आयआरसी (IRC) ने आजारी रूग्णांना तसेच गर्भवती महिलांसह, ऑक्सिजन सिलेंडवर अवलंबून असलेल्या, श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या रुग्णांना वेळीच दुसरीकडे हलवले आहे.”

शिबिरातील पाणी वितरण आणि कचरा विल्हेवाट करणारी यंत्रणा, यांच्यावरही या निर्णयाचा गंभीर परिणाम झाला असल्याचेही, त्यांनी सांगितले.

”दरम्यान, डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी काही जणांचे नातेवाईक त्यांनी घरी नेण्यासाठी, ऑक्सिजन सिलेंडर शोधण्याचा प्रयत्न करत होते”, अशी माहिती ब्वेह से यांनी दिली.

स्थानिक संसाधनांवर ताण

स्थानिक शाळेतील एका शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोग्य केंद्रातील सुमारे 50 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवले गेले, तर काही अत्यावस्थ रुग्ण अजूनही Mae La रुग्णालयात दाखल होते. यामध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेल्या एका लहान मुलाचा देखील समावेश होता.’

“या रुग्णालयात दररोज अंदाजे 100 बाह्य रुग्ण येत असतात, मात्र आता त्यातील एकही नाही,” असेही त्यांनी सांगितले.

टाक प्रांताचे गव्हर्नर चूचीप पॉन्गचाई यांनी, थाय मीडियाला सांगितले की, ”सर्वात गंभीर रुग्णांना स्थानिक राज्य रुग्णालयांमध्ये हलवले जाईल. याशिवाय अधिकाऱ्यांनी IRC कडून त्यांच्या उपकरणांचा वापर करण्याचीही विनंती केली आहे.

था सॉन्ग यांग रुग्णालयाचे संचालक- डॉ. तवाचाई यिंगतवेसक यांनी सांगितले की, ते रुग्णांचे मूल्यांकन करण्यासाठी शिबिरात जात आहेत.

“आम्हाला मूल्यांकन करायचे आहे की, कोणते रुग्ण घरी जाऊ शकतात आणि कोणाला ऑक्सिजनची गरज भासेल,” असे त्यांनी रॉयटर्सशी फोनवर बोलताना सांगितले.

‘शिबिरांतील प्राथमिक आरोग्यसेवा पूर्ण होणार का, याबद्दल चिंता वाढत आहे,’ अशी चिंता, म्यानमारच्या दक्षिणेकडील मॅनलँड मानवाधिकार फाऊंडेशन (HURFOM) या स्थानिक संस्थेचे कार्यक्रम संचालक- नाई औ मोन यांनी व्यक्त केली. ‘हे प्रकरण ‘

“ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, इथले निर्वासित त्यांच्या दैनंदिन आरोग्य सेवांसाठी पूर्णपणे अवलंबून याच मदतीवर आहेत” असेही ते म्हणाले.

(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleIndia on Alert: PLA Fortifies India-China Border With Power Supply
Next articleकाँगो : गोमा विमानतळावर आंदोलकांचा कब्जा, दूतावासांवरही हल्ले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here