ट्रम्प यांचे भारतातील राजदूत सर्जियो गोर नव्या जबाबदारीबाबत उत्साही

0
गोर
ट्रम्प यांचे भारतातील राजदूत म्हणून नामांकित, दक्षिण आणि मध्य आशियासाठी अमेरिकेचे विशेष दूत सर्जिओ गोर यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली. 
या महिन्याच्या अखेरीस मलेशियामध्ये मोदी आणि ट्रम्प भेटीबाबत असणाऱ्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे भारतातील नियुक्त राजदूत सर्जियो गोर दिल्लीत आले आहेत. गोर यांच्यासोबत व्यवस्थापन आणि संसाधन विभागाचे उपसचिव मायकेल रिगास देखील आहेत.

गोर आणि रिगास व्यापार, इमिग्रेशन धोरण, प्रादेशिक सुरक्षा आणि इंडो-पॅसिफिकमधील सहकार्यासह “द्विपक्षीय मुद्द्यांच्या विस्तृत श्रेणी” वर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असल्याच्या चर्चांना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दुजोरा दिला आहे.

राजनैतिक दबाव

भारतीय वस्तूंवरील ट्रम्प यांचे टॅरिफ, H-1B व्हिसा शुल्कात केलेली वाढ आणि प्रादेशिक घडामोडींवरील भिन्न विचारांमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना ही भेट होणार आहे.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री सध्या भारतात असल्याने सुरक्षा समन्वय आणि या प्रदेशातील अमेरिकेच्या कारवायांसाठी एकेकाळी मध्यवर्ती केंद्र असलेल्या बगराम एअरबेसवर पुन्हा प्रवेश मिळविण्यात अमेरिकेच्या स्वारस्याबद्दलही संभाव्य चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण खनिजे

या भेटीच्या वेळी मुख्यतः लक्ष केंद्रित केले जाईल अशा प्रमुख क्षेत्रांपैकी एक म्हणजे महत्वपूर्ण खनिजे. जुलैमध्ये, चार क्वाड राष्ट्रांनी (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान) क्वाड क्रिटिकल मिनरल्स इनिशिएटिव्ह सुरू केला, ज्याचा उद्देश तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या असलेल्या साहित्यांसाठी पुरवठा साखळ्या मजबूत करणे आणि विविधीकरण करणे आहे.

परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यासह अमेरिकन अधिकाऱ्यांनी केवळ कच्च्या मालाचे स्रोत सुरक्षित करण्याची गरज नाही तर प्रक्रिया आणि शुद्धीकरण क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज अधोरेखित केली आहे, जिथे भारतासोबत सहकार्य करता येणे शक्य आहे का याचा अंदाज घेतला जात आहे.

उच्चस्तरीय चर्चा

उभय देशांमध्ये तणाव वाढला असूनही, दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू ठेवली आहे. अर्थात ती अनौपचारिक आणि मोठ्या प्रमाणात प्रतीकात्मक असली आणि दोन्ही देश त्यांच्या प्राधान्यांचे मूल्यांकन करत असताना राजनैतिक मार्ग खुले ठेवण्यात सतत असणारे स्वारस्यही यातून सूचित होते.

अमेरिकेच्या सिनेटने अलीकडेच ज्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले ते गोर या भेटीदरम्यान भारतीय समकक्षांशी कार्यरत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. चर्चेत धोरणात्मक, आर्थिक आणि प्रादेशिक विषय अशा विविध मुद्द्यांचे एकत्रीकरण समाविष्ट होईल अशी अपेक्षा आहे.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleट्रम्प यांचे स्वप्न भंगले, मारिया मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर
Next articleRajnath Singh Visits HMAS Kuttabul, Pushes Defence Industrial Synergy with Australia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here