ट्रम्प यांच्या निर्बंधांच्या धमकीचा भारतातील रशियन तेलाच्या निर्यातीवर परिणाम

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, युक्रेनमध्ये शांतता करार होईपर्यंत रशियाकडून निर्यात घेणाऱ्या देशांवर निर्बंध लावण्याची धमकी दिली आहे. या हालचालींमुळे चीन आणि तुर्कीसह, भारतातील रशियन तेल निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

रशियन तेलाचे प्रकार व बंदरे

आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) माहितीनुसार, जून 2025 मध्ये रशियाच्या कच्च्या तेल व तेलजन्य उत्पादनांच्या विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नात, वर्षभराच्या तुलनेत जवळपास 14% घट झाली असून, हे उत्पन्न आधी $13.57 अब्ज इतके होते.

तरीही, रशियाचे कच्चे तेल उत्पादन स्थिर असून जूनमध्ये त्याचे मूल्य प्रतिदिन 9.2 दशलक्ष बॅरल (bpd) इतके होते. कच्च्या तेलाच्या लोडिंगमध्येही कोणताही मोठा बदल नव्हता, त्याचे मूल्य 4.68 दशलक्ष bpd इतके होते. मात्र, तेलजन्य उत्पादनांची निर्यात दरदिवशी 1.1 लाख बॅरलने घसरून 2.55 दशलक्ष bpd झाली.

रशिया Urals, Siberian Light आणि CPC Blend प्रकारचे तेल – प्रिमोर्स्क, उस्त-लुगा आणि नोव्होरोस्सिस्क या पश्चिमेकडील बंदरांमधून निर्यात करतो. तर, उत्तर दिशेच्या मुरमान्स्क बंदरातून ARCO आणि Novy Port सारख्या आर्क्टिक तेलाचे थोड्या प्रमाणात लोडिंग होते.

पूर्वेकडील कोझमिनो बंदरातून ESPO Blend तेल आणि प्रशांत महासागरातील साखालिन बेटावरून Sokol आणि Sakhalin Blend तेलही निर्यात होते.

रशियाची तेलवाहिनी प्रणाली, चीन आणि युरोपमधील काही देशांशी जोडलेली आहे. सध्या युरोपमधील केवळ हंगेरी आणि स्लोव्हाकिया या दोन देशांनी युरोपियन युनियनच्या निर्बंधांपासून सूट मिळवत रशियन तेल खरेदी सुरू ठेवली आहे.

रशिया कझाकिस्तानच्या तेलासाठीही वाहिन्यांचा वापर करून त्याचा पुरवठा जर्मनी व अन्य बंदरांपर्यंत पोहोचवतो. शेजारील बेलारूसलाही रशिया तेल पुरवतो, जिथे दोन मोठ्या रिफायनऱ्या आहेत.

मुख्य खरेदीदार

चीन हा रशियन तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, कारण चीन थेट पाइपलाइनद्वारे रशियन तेल क्षेत्रांशी जोडलेला आहे. Skovorodino-Mohe व Atasu-Alashankou (कझाकिस्तान मार्गे) पाइपलाइनमधून तेल चीनमध्ये येते, उर्वरित समुद्रमार्गे चिनी रिफायनऱ्या खरेदी करतात.

चीन सुमारे 2 दशलक्ष बॅरल प्रतिदिन रशियन तेल खरेदी करतो – मुख्यतः ESPO Blend, Sokol, Sakhalin Blend, तसेच काही प्रमाणात Urals व Arctic तेल. रॉयटर्सच्या अंदाजानुसार, याचे रोजचे मूल्य सुमारे $130 दशलक्ष आहे.

मुख्य खरेदीदार कंपन्या म्हणजे CNPC, Sinopec, CNOOC आणि काही खासगी रिफायनरीज.

भारत हा रशियन तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा खरेदीदार आहे आणि Urals हा त्याचा मुख्य खरेदी प्रकार आहे. भारत ESPO Blend, Sokol आणि Arctic तेलही घेतो. शिप ट्रॅकिंग फर्म Kpler नुसार, भारत दररोज सुमारे 1.8 दशलक्ष बॅरल रशियन तेल आयात करतो.

हे तेल भारतातील अनेक रिफायनरीजकडे जाते जसे की – Reliance Industries (जगातील सर्वात मोठी रिफायनरी), Nayara Energy (ज्यामध्ये रशियन कंपनी Rosneft ची भागीदारी आहे), तसेच Indian Oil आणि ONGC यांच्याकडेही तेल पाठवले जाते.

तुर्की हा रशियन तेलाचा तिसऱ्या क्रमांकाचा आयातदार असून, जून महिन्यात त्याच्या खरेदीत विक्रमी वाढ झाली – 400,000 बॅरल प्रतिदिन. रशियन Urals तेलाचा दर $60 प्रति बॅरलच्या खाली गेल्याने ही वाढ झाली.

तुर्कीतील STAR Refinery (Azerbaijan च्या SOCAR मालकीची) ही मुख्य खरेदीदार असून, Tupras ही दुसरी मोठी रिफायनरी देखील Urals तेल घेते.

तेलजन्य उत्पादने

रशिया दररोज सुमारे 2.5 दशलक्ष बॅरल इंधन उत्पादने (low-sulphur डिझेल, पेट्रोल, नाफ्था, फ्युएल ऑइल इ.) निर्यात करतो. 2023 पासून युरोपऐवजी रशियाने आशिया व लॅटिन अमेरिका या भागांमध्ये निर्यात वळवली आहे.

रशिया आता ब्राझील आणि तुर्कीला मोठ्या प्रमाणावर डिझेल पुरवतो, तसेच घाना, इजिप्त, मोरोक्को, टोगो, ट्युनिशिया यांसारख्या आफ्रिकन देशांनाही इंधन निर्यात करतो.

इतर खरेदीदार देश

रशिया ज्या देशांना “मैत्रीपूर्ण राष्ट्रे” म्हणतो, अशा काही तो देशांनाही तेल व इंधन पुरवतो. यामध्ये सिरिया (ज्यांनी अलीकडे रशियन इंधन व आर्क्टिक तेल खरेदी सुरू केले आहे), पाकिस्तान, क्युबा आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleमुक्त व्यापार कराराअंतर्गत खनिज सुरक्षेसंदर्भात भारताची अन्य देशांसोबत चर्चा
Next articleआइसलँडमध्ये पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक; नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here