तब्बल दशकभराने झाली दोन इस्रायली ओलिसांची गाझामधून सुटका

0

 

पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासने शनिवारी सुटका केलेल्या सहा ओलिसांमध्ये एक इस्रायली बेदुईन आणि तर एक इथिओपियामध्ये जन्म झालेला नागरिक- जो अनेक वर्षांपासून गाझामध्ये होता – यांचा समावेश होता. 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्याच्या एक दशकभर आधी चुकून ते एन्क्लेव्हमध्ये घुसले होते.

36 वर्षीय हिशाम अल-सईद आणि 39 वर्षीय एव्हेरा मेंगिस्टू हे दोघेही मानसिक आजाराचे रुग्ण होते, असे त्यांच्या कुटुंबियांच्या  प्रतिक्रिया आणि ह्यूमन राइट्स वॉचच्या 2017 च्या अहवालात म्हटले आहे.

‘अकल्पनीय दुःख’

इथिओपियामध्ये जन्मलेल्या आणि दक्षिणेकडील इस्रायली शहर एश्केलॉनमध्ये राहणाऱ्या मेंगिस्टूने सप्टेंबर 2014 मध्ये गाझामधील समुद्रकिनाऱ्याजवळील काटेरी तारांचे कुंपण ओलांडले होते, तर नेगेव वाळवंटात राहणारे इस्रायली नागरिकत्व असलेले बेदुईन सय्यद एप्रिल 2015 मध्ये पूर्वेकडून गाझामध्ये पोहोचले होते.

“आमच्या कुटुंबाने दहा वर्षे आणि पाच महिने अकल्पनीय दुःख सहन केले आहे. या काळात, त्याच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न केले गेले, त्यात प्रार्थना आणि विनंत्यांचा समावेश होता. या विनंती अर्जांपैकी काही आजपर्यंत अनुत्तरित राहिले,” असे मेंगिस्टूच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात म्हटले आहे.

‘शांतताप्रिय व्यक्ती’

एकेकाळी हमासने त्यांचे वर्णन इस्रायली सैनिक म्हणून केले असले तरी ह्यूमन राइट्स वॉचने म्हटले आहे की त्यांचा इस्रायली सरकारशी किंवा सैन्याशी दूरान्वयाने काहीही संबंध नव्हता, परंतु दोघांनाही पायी लांब अंतर चालण्याची सवय होती. ते गाझामध्ये का घुसले यांचे कारण अजूनही माहीत नाही.

“ज्यांनी काहीही चुकीचे केले नाही अशा व्यक्तीला ते का धरून ठेवत होते? तो एक शांत माणूस आहे, एक माणूस ज्याला गाझाला पोहोचायचे होते, त्याला गाझा आवडते, तो युद्ध करायला तिथे गेला नव्हता,” असे सय्यदचे वडील शाबान अल-सय्यद यांनी या आठवड्यात इस्रायली सार्वजनिक रेडिओला सांगितले. “आमच्यासाठी हे इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त वेदनादायक होते.”

गेली अनेक वर्षे, पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याच्या स्पष्ट प्रयत्नात, हमासने जून 2022 मध्ये ऑक्सिजन मास्क लावून अंथरुणावर पडलेले सय्यद आणि जानेवारी 2023 मध्ये मेंगिस्टू यांचे व्हिडिओ जारी करेपर्यंत त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

सय्यद आणि मेंगिस्टू यांच्याव्यतिरिक्त, हमासने 2014 च्या गाझा युद्धात ठार झालेल्या दोन इस्रायली सैनिकांचे मृतदेहही ताब्यात घेतले होते. त्यापैकी ओरॉन शाऊल याचे शव, गेल्या महिन्यात गाझामध्ये असलेल्या इस्रायली सैन्याने ताब्यात घेतले, तर हदर गोल्डिन या दुसऱ्या सैनिकाचे शव अजूनही हमासच्या ताब्यात आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)

 


Spread the love
Previous articleInformation System Landscape Redefining Military Warfare
Next articleभारताच्या आरोग्यविषयक जागतिक योगदानावर जयशंकर यांचा प्रकाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here