अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचे दोन जोरदार धक्के; आधीच 2,200 जणांचा मृत्यू

0
भूकंपाचे

शुक्रवारी, 12 तासांच्या अंतराने पूर्व अफगाणिस्तानला पुन्हा दोन तीव्र भूकंपाचे धक्के बसले. यामुळे आधीच सुमारे 2,200 जणांचे प्राण घेणाऱ्या भूकंपांनी ग्रस्त असलेल्या भागात, आणखी जीवितहानी व विध्वंस होण्याची भीती निर्माण झाली आहे. मदतकार्य करणाऱ्या पथकांना दुर्गम भूप्रदेश आणि अस्थीर हवामान यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

या भूकंपप्रवण भागात पाणी, अन्न, औषधे आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी संघर्ष सुरू असून, संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर संस्थांनी तातडीने निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) $4 मिलियन निधीची मागणी केली आहे.

युद्धाने होरपळलेल्या देशाला भूकंपाचा तडाखा

नुकतेच बसलेले हे भूकंपाचे धक्के अफगाणिस्तनसाठी शाप ठरत आहेत, कारण आधीच हा देश आधीच युद्ध, दारिद्र्य आणि आंतरराष्ट्रीय मदतीतील घट यामुळे खूप संकटात आहे. तालिबान प्रशासनाने गुरुवारी सांगितले की, आतापर्यंत 2,205 लोक मृत झाले असून 3,640 जखमी झाले आहेत.

गुरुवारी रात्री, नंगरहार प्रांतातील शिवा जिल्ह्यातील पाकिस्तानी सीमेजवळ आलेल्या 6.2 तीव्रतेच्या भूकंपामुळे जखमी झालेल्या 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे प्रादेशिक आरोग्य प्रवक्ते नकिबुल्ला रहिमी यांनी सांगितले.
त्यापैकी 10 जणांना उपचारानंतर सोडण्यात आले, तर 3 जणांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रॉयटर्सच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, “नंगरहारमध्ये सतत येणाऱ्या धक्क्यांमुळे नुकसानाचा तपशील अद्याप जमा केला जात आहे. या प्रांताची राजधानी जलालाबाद ही काबूलपासून सुमारे 150 किमी (95 मैल) अंतरावर आहे.”

तीव्र धक्क्यांमुळे मोठे नुकसान

शुक्रवारी आलेल्या भूकंपाची तीव्रता 5.4 रेक्टर स्केल होती आणि हा भूकंप 10 किमीपर्यंत (6.2 मैल) खोल झाला होता, अशी माहिती जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (GFZ) ने दिली. गुरुवारी आलेल्या प्रलयताकी भूकंपानंतर, काही तासांतच पुन्हा हे धक्के झाला.

या भागातील घरे प्रामुख्याने दगड, लाकूड आणि कोरड्या भिंतींपासून बनलेली असल्याने, काही कुटुंबांनी घरात परत जाण्याऐवजी उघड्यावरच राहणे पसंत केले आहे.

कुनार प्रांतातील नुरगल जिल्ह्यातील रहिवासी, अजूनही डोंगराच्या पायथ्याशी, नदीजवळ तंबू ठोकून किंवा उघड्यावर राहत आहेत, कारण त्यांना अजून धक्के बसण्याची भीती वाटते.

भूस्खलन आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे काही गावांपर्यंत रस्ते बंद झाले असून, त्यामुळे बचाव व मदतकार्य अडकले असल्याचे सांगण्यात आले आहे.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या, 6 रेक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने नंगरहार आणि कुनार प्रांतात प्रचंड हानी केली. तो 10 किलोमीटरपर्यंत खोल होता आणि अफगाणिस्तानमधील सर्वात भीषण भूकंपांपैकी एक ठरला आहे.

मंगळवारी आलेल्या 5.5 तीव्रतेच्या दुसऱ्या भूकंपामुळे, डोंगर उतारांवरून दगड आणि माती घसरून खाली आली, रस्ते बंद झाले आणि बचावकार्य खोळंबले.

या दोन भूकंपांनी 6,700 पेक्षा अधिक घरे उद्ध्वस्त केली असून, रुंबळाखालून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानातील बहुतांश भूकंप हे हिंदूकुश पर्वतरांगांमध्ये होतात, जिथे भारतीय आणि युरेशियन प्लेट्स एकमेकांवर आदळतात.

पैशाची टंचाई आणि वाढते संकट

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले की, “मुख्य रस्त्यांवर झालेल्या भूस्खलनामुळे मदतकार्याला अडथळे येत आहेत.” त्यांनी रोगप्रसार आणि आरोग्य संकट याविषयीही इशारा दिला आहे.

त्यांनी सांगितले की, “$4 मिलियन इतका निधी अभाव असल्यास महत्वाच्या आरोग्य सेवा आणि रोग नियंत्रण उपक्रम उशिराने सुरू होऊ शकतात, आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय मदतीची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित होते.”

गर्दीने भरलेले निवारे, दूषित पाणी आणि अपुऱ्या स्वच्छता सुविधांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका आहे. याशिवाय, पाकिस्तानमधून हकालपट्टी झालेल्या अफगाण निर्वासितांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.

तालिबान सरकारने रविवारी आलेल्या आपत्तीनंतर, तात्काळ आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केले होते.

परंतु 2021 मधील, तालिबानच्या सत्ताबदलानंतर जगाने अफगाणिस्तानकडे दुर्लक्ष केल्यामुळे, मदत अत्यंत मर्यादित प्रमाणात पोहोचत आहे. देश आता पाकिस्तान व इराणमधून परत पाठवले गेलेले निर्वासित आणि उत्तर भागातील दुष्काळग्रस्त लोकसंख्या यांना सांभाळण्यात अपयशी ठरत आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे की, “भूकंपग्रस्तांसाठी असलेला निधी लवकरच संपेल आणि म्हणूनच आपत्कालीन निधीसाठी एक फ्लॅश अपील लवकरच सुरू केला जाईल.”

“त्यांनी स्वत: $10 मिलियन इतका निधी वितरित केला आहे, जो समृद्ध राष्ट्रांनी दिलेल्या फारच मर्यादित मदतीपेक्षा अधिक आहे. काही देशांनी तंबू आणि अन्य साहित्य पाठवले आहेत, मात्र आर्थिक मदत फारशी जमलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

UN च्या अफगाणिस्तानसाठीच्या मानवतावादी समन्वय कार्यालयाच्या उपप्रमुख- केट केरी यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आमच्याकडे थोडाफार निधी आहे, पण आम्ही आता एक फ्लॅश अपील करणार आहोत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleटॅरिफ सवलतीबाबतच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी
Next articleट्रम्प यांचा ‘डॅमेज कंट्रोल’ पवित्रा, म्हणाले- “मोदींसोबत मैत्री कायम राहील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here