मेक्सिको सीमेजवळ एका संशयित तस्करावर अमेरिकन सुरक्षा दलाचा गोळीबार

0
अमेरिकन

मंगळवारी, मानवी तस्करी करणाऱ्या एका संशयितावर अमेरिकन सीमा सुरक्षा गस्त दलाच्या एजंटने गोळीबार केला, ज्यामध्ये तो इसम जखमी झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशयिताने ॲरिझोना राज्यात फेडरल सरकारच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार केला; ज्यानंतर अमेरिकन एजंटसोबत झालेल्या चकमकीत तो जखमी झाला.

तस्करीच्या मागील गुन्ह्यात दोषी ठरलेला हा संशयित, एका ‘हाफवे हाऊस’मधून (सुधारणा केंद्रातून) पळून गेल्यानंतर काही काळ फरार होता. पिमा काउंटी शेरीफ आणि एफबीआयने (FBI) पत्रकार परिषदेत माहिती दिली की, जखमी संशयितावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे.

हल्ला आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या तस्करीचे आरोप

मेक्सिको-अमेरिका सीमेपासून सुमारे 10 मैल (16 किमी) अंतरावर असलेल्या अरीवाका शहराच्या वाळवंटी भागात, ही गोळीबाराची घटना घडली. हा भाग स्थलांतरितांच्या क्रॉसिंगसाठी गजबजलेला असून, भूतकाळात येथे इमिग्रेशन समर्थक आणि बॉर्डर पेट्रोल यांच्यात तणावाच्या घटना घडल्या आहेत.

पॅट्रिक गॅरी श्लेगल (34) असे या संशयिताचे नाव असल्याचे, एफबीआयचे विशेष एजंट हेथ जान्के यांनी सांगितले. गॅरी याच्यावर फेडरल ऑफिसरवर हल्ला करणे, परदेशी नागरिकांची तस्करी करणे आणि गुन्हेगार असतानाही बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे, असे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

“मी स्पष्ट करतो की, कायदा अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही. जे वर्दी परिधान करणाऱ्यांना इजा पोहचवतील किंवा तशी धमकी देतील, त्यांचा एफबीआय कठोरपणे तपास करत राहील,” असे जान्के म्हणाले.

फेडरल कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, 15 डिसेंबर 2014 रोजी टक्सन येथील हाफवे हाऊसधून पळून गेल्याप्रकरणी गॅरी विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. बेकायदेशीर परकीयांची वाहतूक आणि शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याला यापूर्वी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती.

पत्रकार परिषदेदरम्यान, पिमा काउंटीचे शेरीफ ख्रिस नॅनोस यांनी खुलासा केला की, मंगळवारी गॅरीच्या वाहनातील काही प्रवासी उतरून पळून गेल्यानंतर बॉर्डर एजंट्स त्या वाहनाचा पाठलाग करत होते.

त्यानंतर त्यांना अरीवाकाजवळ ते वाहन दिसले, जिथे चालकाने गाडी थांबवली आणि तो पायी पळू लागला; यादरम्यान त्याने हवेत असलेल्या ‘कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’च्या हेलिकॉप्टरवर गोळीबार केला, असे जानके यांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्ष बचावात्मक भूमिकेत

मेक्सिको सीमेवरील ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा अमेरिकेत तणाव वाढलेला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनवरील कडक कारवाईचा भाग म्हणून, मिनेसोटा येथे ‘ICE’ एजंट्सनी रेनी गुड (37) आणि ॲलेक्स प्रेटी (37) या दोन अमेरिकन नागरिकांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती.

लष्करी गणवेश आणि मास्क घातलेले ‘ICE’ एजंट्सचावावर आता देशात ठिकठिकाणी वाढत असून, यामुळे मियानपोलिससह अनेक शहरांमध्ये आंदोलने होत आहेत, जिथे एजंट्सनी प्राणघातक बळाचा वापर केला आहे.

रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, प्रेटी यांच्यावरील गोळीबारानंतर ट्रम्प यांच्या इमिग्रेशन अंमलबजावणीला मिळणारा सार्वजनिक पाठिंबा कमी होत चालला आहे. मात्र, नोव्हेंबरच्या मध्यात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी या मुद्द्याने रिपब्लिकन पक्षाला बचावात्मक भूमिकेत आणले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीन–बांगलादेश ड्रोन करार; भारताच्या सुरक्षा धोरणाबाबत गंभीर चिंता निर्माण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here