अमेरिकन लष्कराचा संशयित ड्रग्जवाहू जहाजांवर हल्ला; पाच जणांचा मृत्यू

0

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ, यांनी बुधवारी सांगितले की: “अमेरिकेन लष्कराने पूर्व पॅसिफिक महासागरातून, अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या तील दोन संशयित जहाजांवर हल्ला केला, ज्यामध्ये पाच लोक मारले गेले. ही कारवाई अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध, सशस्त्र दलांना तैनात करण्याच्या ट्रम्प प्रशासनाने धोरणाचा विस्तार दर्शवते.”

बुधवारी दुपारी, हेगसेथ यांनी जाहीर केले की-  “लष्कराने मंगळवारी पूर्व पॅसिफिक महासागरात एका संशयित ड्रग्जवाहू जहाजावर हल्ला केला, ज्याच 2 जण मारले गेले.” अमली पदार्थांच्या व्यापाराविरुद्ध अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन आक्रमक मोहीम सुरू केल्यापासून, पॅसिफिक महासागरातील ही पहिली ज्ञात अमेरिकन लष्करी कारवाई होती. काही तासांनंतर, हेगसेथ यांनी अपडेट देत सांगितले की, “लष्कराने बुधवारी पूर्व पॅसिफिकमध्ये आणखी एका जहाजावर हल्ला केला, ज्यात 3 जण मारले गेले.”

कॅरिबियनमध्ये अमेरिकन लष्कराचे हल्ले

अमेरिकन लष्कराच्या कॅरिबियनमधील किमान सात हल्ल्यांव्यतिरिक्त, करण्यात आलेल्या या अन्य हल्ल्यांमुळे व्हेनेझुएला आणि कोलंबियासोबतचा अमेरिकेचा तणाव वाढला आहे.

जहाजांवरील या ताज्या हल्ल्यानंतर हेगसेथ म्हणाले की, “ते जहाज अवैध अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असल्याचे आमच्या गुप्तचर यंत्रणेला माहीत होते, ते एका ज्ञात अमली पदार्थ-तस्करीच्या मार्गावरून जात होते आणि त्यावर अमली पदार्थांचा साठा होता,” मात्र याबाबत त्यांनी कोणताही ठोस पुरावा न देता 

त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर दोन्ही हल्ल्यांचे सुमारे 30 सेकंदांचे व्हिडिओ पोस्ट केले. दोन्ही व्हिडिओंमध्ये सुरुवातीला जहाज पाण्यातून जाताना दिसत होते आणि नंतर त्यांचा स्फोट झाल्याचे दिसत होते.

कॅरिबियन हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान 32 लोक मारले गेले आहेत, परंतु ट्रम्प प्रशासनाने याबद्दल फारसे तपशील दिलेले नाहीत, जसे की लक्ष्य केलेल्या जहाजांवर नेमक्या किती प्रमाणात अमली पदार्थ होते किंवा त्यांच्याकडे अमली पदार्थ असल्याची सूचना देणारे नेमके कोणते विशिष्ट पुरावे होते इत्यादी. पूर्व पॅसिफिकमध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या हल्ल्याची बातमी सर्वप्रथम सीबीएस न्यूजने (CBS News) प्रसिद्ध केली होती.

‘ही हत्या आहे’

कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो, ज्यांचे जहाजांवरील हल्ले आणि टॅरिफच्या मुद्द्यावरुन ट्रम्प यांच्याशी मतभेद सुरू आहेत, ते म्हणाले की, “पॅसिफिकमधील आणखी एका बोटीवर झालेल्या हल्ल्यात लोक मारले गेले आहेत, ते जहाज इक्वाडोरचे होती की कोलंबियाचे हेही आम्हाला माहीत नाही. ही उघड उघड हत्या आहे. कॅरिबियन असो वा पॅसिफिक, अमेरिकेच्या सरकारचे हे धोरण आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम भंग करते.”

कोलंबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने, एका स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की “अमेरिकेने हे हल्ले थांबवले पाहिजेत.”

दुसरीकडे, आपल्या देशातील टोळ्यांविरुद्ध युद्ध पुकारलेले इक्वाडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी, ट्रम्प यांच्या अमली पदार्थविरोधी प्रयत्नांना पाठिंबा दर्शविला आहे.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांनी ट्रम्प यांना या हल्ल्याबद्दल विचारले असता, ते म्हणाले की “त्यांच्या प्रशासनाकडे ही कारवाई करण्यासाठी कायदेशीर अधिकार आहेत आणि प्रत्येक हल्ल्याने अमेरिकेच्या नागरिकांना ड्रग्जपासून वाचवले आहे, असे त्यांचे मत आहे.”

ट्रम्प यांनी, व्हेनेझुएलातील जमिनीवरच्या टार्गेट्सवर हल्ला करण्याच्या योजनांचाही पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “जर त्यांनी हे पाऊल उचलले, तर त्यांचे प्रशासन कदाचित अमेरिकन काँग्रेसला त्याची माहिती देईल. म्ही जमिनीवर काय करत आहोत, हे स्पष्ट करण्यासाठी आम्ही बहुधा काँग्रेसकडे परत जाऊ. आम्हाला तसे करण्याची गरज नाही, पण मला वाटते आम्ही तसे करू, मला स्वत:ला तसे करायला आवडेल.”

लष्कर उभारणी

“मूळात, अमेरिकेचे लष्कर हे हल्ले का करत आहे? कोस्टगार्ड, जी अमेरिकेची मुख्य सागरी कायदा अंमलबजावणी संस्था आहे, ती यामध्ये का सहभागी नाही; आणि घातक हल्ले करण्यापूर्वी जहाजांना रोखण्याचे इतर प्रयत्न का केले जात नाहीत..’’ असे प्रश्न कायदेशीर तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पॅसिफिक महासागरातील हे हल्ले कॅरिबियनमधील अमेरिकेच्या लष्करी उभारणीच्या पार्श्वभूमीवर झाले आहेत, ज्यात मार्गदर्शित विनाशक क्षेपणास्त्र, F-35 फायटर जेट्स, एक न्युकलिअर पाणबुडी आणि सुमारे 6,500 सैनिक यांचा समावेश आहे.

ऑगस्टमध्ये, कोस्ट गार्डने पॅसिफिक महासागरात अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी, ‘ऑपरेशन वायपर’ नावाची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत 15 ऑक्टोबरपर्यंत, कोस्ट गार्डने 100,000 पाउंड (45,000 kg) पेक्षा जास्त कोकेन जप्त केल्याचे सांगितले.

या प्रकरणात प्रशासनाने जहाजांना अडवण्याऐवजी त्यांच्यावर थेट हल्ला का केला, हे अजून स्पष्ट झाले नाही.

गेल्या आठवड्यात, कॅरिबियनमध्ये झालेल्या अमेरिकी लष्करी हल्ल्यातून दोन संशयित अमली पदार्थ तस्कर बचावले, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे. त्यांना पकडून अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेवर आणले गेले आणि नंतर त्यांना त्यांच्या मायदेशी म्हणजे कोलंबिया आणि इक्वाडोरला परत पाठवण्यात आल्याचे समजते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleBrahMos Boom: India Set to Export Missiles to ASEAN Nations
Next articleतैवान अमेरिकेसोबत लष्करी सहकार्य मजबूत करण्याच्या तयारीत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here