अमेरिकेत Bird Flu च्या पहिल्या गंभीर मानवी प्रकरणाची नोंद

0
अमेरिकेत
'बर्ड फ्लू' - प्रतिकात्मक छायाचित्र

अमेरिकेत बुधवारी ‘बर्ड फ्लूच्या’ (H5N1) पहिल्या मानवी रुग्णाची नोंद झाली आहे. ज्येष्ठ नागरिक असलेला हा रूग्ण लुईझियानाचा रहिवासी असून, सध्या तो गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल आहे. रुग्णाच्या बॅकयार्ड परसरातील संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यामुळे त्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सदर रुग्णाला श्वसनाचा गंभीर आजार आहे, अशी माहिती लुझियाना आरोग्य विभागाने एका निवेदनाद्वारे दिली आहे.

सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या ‘कॅलिफोर्निया’ राज्याने, बर्ड फ्लूच्या H5N1 विषाणूबाबत, आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे. कारण कॅलिफोर्नियात सध्या हा विषाणू, दूध देणाऱ्या जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. ज्यामुळे या वर्षात तेथील डझनभर शेतकरी व अन्य कामगार संक्रमित झाले आहेत.

कॅलिफोर्निया, जे अमेरिकेतील दूध उत्पादन करणाऱ्या सर्वोत्तम राज्यांपैकी एक आहे, तिथे ऑगस्ट अखेरपासून 649 जनावरांच्या कळपांचे परिक्षण केले गेले. ज्यापैकी 60% जनावरांमध्ये H5N1 विषाणूचा संसर्ग आढळला आहे, अशी माहिती यूएस डेटाद्वारे जारी करण्यात आहे.

दरम्यान कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर ‘गॅव्हिन न्यूजम’ यांनी आपल्या आपत्कालीन घोषणेमध्ये म्हटले आहे की, ’12 डिसेंबर रोजी दक्षिण कॅलिफोर्नियातल्या चार डेअरींमधील जनावरांची बर्ड फ्लूची चाचणी केली गेली, जी पॉझिटीव्ह निघाली. त्यामुळे  प्रादेशिक नियंत्रणातून राज्यव्यापी देखरेख आणि प्रतिसादाकडे कल देणे अधिक आवश्यक झाले आहे.”

यापूर्वी राज्याच्या सेंट्रल व्हॅलीमध्ये अशा प्रकरणांची नोंद झाली होती, असेही ते म्हणाले.

या घोषणेचे उद्दिष्ट, स्थानिक कर्मचारी व अन्य नागरिकांसंबंधीत नियमांमध्ये अधिक लवचिकता आणून, कॅलिफोर्नियाच्या प्रतिसादाला सुव्यवस्थित व वेगवान करणे हे आहे, असे न्यूजम म्हणाले.

फेडरल आणि राज्य अधिकारी, बर्ड फ्लू विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरले आहेत. ज्याने 2024 मध्ये प्रथमच दुग्धजन्य गुरांना संक्रमित केले होते. त्यांच्या अपयशामागे काही शेतकऱ्यांनी चाचणी आणि प्रतिबंधात्मक उपायांना केलेला विरोध, हे प्रमुख कारण आहे.

दरम्यान, सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या लुईझियानाच्या रुग्णामध्ये, श्वासोच्छवासाच्या त्रासासोबतच डोळ्यातील लालसरपणा किंवा डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागाची होणारी जळजळ ही लक्षणं आढळून आली आहेत. जी संक्रमित झालेल्या डेअरी कामगारांमध्ये देखील आढळून आले होते.

दरम्यान, संक्रमित जनावरांच्या संपर्कात न आलेल्या सर्वसामान्य लोकांना बर्ड फ्लूचा अद्याप तितकासा धोका नसल्याचे, ‘यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ने म्हटले आहे.

‘CDC’ ने एप्रिलपासून राष्ट्रीय स्तरावर, एकूण 61 बर्ड फ्लू संक्रमित मानवी प्रकरणांची पुष्टी केली आहे. ज्यापैकी बहुतेक रुग्ण हे डेअरी फार्मवरील कामगार असून, तिथल्या विषाणू संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना ही बाधा झाली आहे. यामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे.

CDC चे संचालक- डेमेत्रे दस्कलाकिस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘घराच्या बॅकयार्डमध्ये असलेल्या ‘नॉन कमर्शिअल’ पोल्ट्री फार्ममधून झालेल्या संक्रमणाचे हे पहिलेच प्रकरण आहे.’

याप्रकरणी CDC ने म्हटले आहे की, बर्ड फ्लू (H5N1) ने संक्रमित असलेल्या व्यक्तीमध्ये गंभीर लक्षणे दिसणे अपेक्षित आहे. कारण 2024 आणि त्याआधीच्या वर्षांत इतर देशांमध्ये अशा घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये लोकांचा मृत्यू देखील झाला आहे.

“आम्ही United states मध्ये आजवर पाहिलेली बर्ड फ्लूची प्रकरणे हे स्पष्ट करतात की, बहुतांशी संक्रमित व्यकींना दूध देणाऱ्या गायींमुळे या आजाराचा संसर्ग झाला आहे. मात्र जर तुम्ही लुईझियानामधील रुग्णाचा जीनोटाइप पाहिला तर हे संक्रमण गुरांमुळे नाही तर एखाद्या जंगली पक्ष्यामुळे झाल्याचे आढळून येते,” असे जॉन्स हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटीचे- अमेश अडलजा यांनी सांगितले.

याविषयी बोलताना CDC ने सांगितले की, CDC ने सांगितले की, संक्रमित रुग्णाच्या विषाणूच्या डेटा नुसार, हा विषाणू D1.1 प्रकाराचा आहे, जो अलीकडे युनायटेड स्टेट्समधील वन्य पक्ष्यां आणि कुक्कुटांमध्ये तसेच कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया आणि वॉशिंग्टन राज्यात मानवी रुग्णांमध्ये आढळला आहे.

विषाणूचा हा जीनोटाइप दुग्ध गायींमध्ये आढळलेल्या B3.13 जीनोटाइपपेक्षा, अनेक राज्यांमधील मानवी केसेस आणि देशातील काही पोल्ट्री प्रादुर्भावापेक्षा वेगळा आहे, असे CDC ने सांगितले.

बर्ड फ्लूने गेल्या मार्चपासून 16 राज्यांमध्ये 860 हून अधिक दुग्ध व्यवसायिकांना संक्रमित केले आहे आणि 2022 मध्ये या विषाणूचा उद्रेक सुरु झाल्यापासून 123 दशलक्ष जनावरे मृत पावली आहेत.

‘यूएस कृषी विभागाने’ सांगितले की त्यांनी नव्याने लाँच केलेल्या, ‘राष्ट्रीय बल्क मिल्क बर्ड फ्लू चाचणी योजनेत’ एकूण 13 राज्यांची नोंदणी केली आहे. जी देशाच्या जवळपास निम्म्या दूध पुरवठ्याचे प्रतिनिधित्व करतात.

(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleCold War Era Nuclear Arms Control A Thing Of The Past Says Top General of Russia
Next articleतैवानला युद्धाची धमकी देऊनही शी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here