“स्फोटक अण्वस्त्र चाचण्या घेऊ नयेत”; अमेरिकेच्या सिनेटरची ट्रम्प यांना विनंती

0
अण्वस्त्र चाचण्या

डेमोक्रॅटिक अमेरिकेन सिनेटर एडवर्ड मार्की यांनी, मंगळवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्फोटक अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करू नयेत, अशी विनंती केली आणि तसे झाल्यास, प्रतिस्पर्धी अण्वस्त्र शक्ती असलेल्या रशिया आणि चीनला देखील अशाप्रकारची चाचणी करण्यास प्रोत्साहन मिळू शकते, असेही ते म्हणाले.

गेल्या महिन्याच्या अखेरीस, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर घोषणा केली की, 33 वर्षांच्या विरामानंतर त्यांनी पेटागॉनला अण्वस्त्र चाचण्यांची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, कारण स्फोटक अण्वस्त्र चाचण्या या प्रत्यक्षात ऊर्जा विभागाची एक शाखा असलेल्या, राष्ट्रीय अणु सुरक्षा (नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी) प्रशासनाद्वारे पार पाडल्या जातात.

मार्की यांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “अमेरिकेची एक लहानशी अणुचाचणी देखील रशिया आणि चीनला अनेक मोठ्या अणुचाचण्या करण्यासाठी हिरवा कंदील देईल, ज्या त्यांच्या नवीन अण्वस्त्र विकासासाठी अधिक उपयुक्त ठरतील आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतील.”

सिनेट आणि प्रतिनिधीगृहातील सदस्यांसह अण्वस्त्र आणि शस्त्र नियंत्रण कार्यगटाचे सह-अध्यक्ष असलेले मार्की, काँग्रेसमध्ये अण्वस्त्र-अप्रसार (नॉन-प्रोलीफरेशन) प्रयत्नांचे दीर्घकाळ नेतृत्व करत आहेत. त्यांनी 2020 मध्ये, ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कार्यकाळातही, स्फोटक अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

व्हाईट हाऊसने मंगळवारी पुन्हा स्पष्ट केले की, ट्रम्प यांनी इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे आपल्या प्रशासनाला अण्वस्त्र चाचणी प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ट्रम्प यांना अण्वस्त्रीकरण कमी झालेले पाहायला आवडेल, परंतु एक मजबूत, विश्वसनीय आणि प्रभावी अण्वस्त्र प्रतिबंध कायम ठेवण्यासाठी ही कृती योग्य असल्याचे त्यांना वाटते.”

सीआयएचे (CIA) संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी 3 नोव्हेंबर रोजी, सोशल मीडियाद्वारे सांगितले की, “इतर देशांच्या अण्वस्त्र चाचण्यांविषयी ट्रम्प यांचा अंदाज बरोबर आहेत.”

ट्रम्प यांना प्रत्युत्तर म्हणून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संभाव्य अण्वस्त्र चाचणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले, जे मॉस्कोने 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनानंतरही केले नव्हते.

मार्की यांनी पत्रात म्हटले आहे की, “ट्रम्प यांचा असा दावा आहे की, रशिया आणि चीन हे अमेरिकेच्या धोरणाचे आणि व्यापक चाचणी बंदी कराराचे उल्लंघन करत, हायड्रो न्यूक्लियर चाचण्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, आणि ट्रॅक करण्यास कठीण असलेल्या लहान अणुचाचण्या करत आहेत.

“2019 पासूनचे अशा चाचण्यांचे अहवाल चिंता वाढवतात, पण त्याला ठोस पुष्टी मिळालेली नाही. हे अहवाल खरे असले तरीही, ते अमेरिकेच्या अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू होण्याबाबत समर्थन करू शकत नाहीत,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मार्की यांनी ट्रम्प यांना 15 डिसेंबरपर्यंत, रशिया आणि चीन गुप्त अणुचाचण्या करत असल्याचा पुरावा देण्यास सांगितले आहे. तसेच, ट्रम्प यांचे हे विधान क्षेपणास्त्र चाचण्या आणि अण्वस्त्र स्फोटक चाचण्या यांच्यातील फरकाचा गैरसमज दर्शवते का? असा प्रश्नही त्यांनी ट्रम्प यांना विचारला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleInside Pakistan’s Long War of A Thousand Cuts
Next articleIAF, French Air and Space Force Scale Up Interoperability in Exercise Garuda 25

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here