जो बायडेन आपल्या अध्यक्षपदाच्या उर्वरित काही दिवसांमध्ये चीनवरचा आपला दबाव ताप कायम ठेवला आहे. मानवाधिकारांच्या कथित उल्लंघनासाठी अमेरिकेने दोन चिनी कंपन्यांवर व्यापार निर्बंध लादले आहेत.
निर्यात धोरणाची देखरेख करणाऱ्या वाणिज्य विभागाने एका फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यांनी झेजियांग युनिव्ह्यू टेक्नॉलॉजीज कंपनी लिमिटेडला काळ्या यादीत (entity list) समाविष्ट केले आहे.
विभागाने म्हटले आहे की झेजियांग युनिव्ह्यू टेक्नॉलॉजीज कंपनी लिमिटेड मानवी हक्कांचे उल्लंघन करत असल्याचे लक्षात आले आहे.
सामान्य नागरिक, उईघुर आणि इतर वांशिक तसेच धार्मिक अल्पसंख्याक गटांच्या सदस्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर पाळत ठेवणारी उच्च-तंत्रज्ञान निरीक्षणाच्या स्वरूपातील हे हक्कांचे उल्लंघन होते.
चीनच्या बीजिंग झोंगडून सिक्युरिटी टेक्नॉलॉजी ग्रुप कं, लिमिटेडला “चीनच्या सार्वजनिक सुरक्षा आस्थापनांना मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यास सक्षम करणारी” उत्पादने विकण्यासाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयानंतर युनिव्यूने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. बीजिंग झोंगडुन सिक्युरिटीशी प्रतिक्रियासाठी संपर्क होऊ शकला नाही.
अलिकडच्या वर्षांत, अमेरिकेने 2019 मध्ये चिनी व्हिडिओ पाळत ठेवणाऱ्या हिकव्हिजन या व्हिडिओ कंपनीसह उईघुर आणि इतर अल्पसंख्याक गटांवर करण्यात आलेल्या चीनच्या दडपशाहीला मदत केल्याचा आरोप करणाऱ्या चिनी कंपन्यांना शिक्षा देण्यासाठी काळ्या यादीचा वापर केला आहे.
काळ्या यादीमध्ये नाव आल्याने लक्ष्यित कंपनीच्या अमेरिकन पुरवठादारांना लायसन्स मिळणे अवघड जाते.
मंगळवारी रशिया आणि म्यानमारमधील सहा इतर कंपन्यादेखील यात समाविष्ट झाल्या आहेत.
ऑगस्टच्या सुरुवातीला, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, चीनने उइगर मुस्लिम आणि देशातील इतर वांशिक तसेच धार्मिक अल्पसंख्याक गटांवर ‘सुरू असणारी दडपशाही’ समाप्त करण्यासाठी त्वरित कारवाई करावी.
चीनच्या शिनजियांग भागातील मानवाधिकार उल्लंघनाच्या स्थितीवर संयुक्त राष्ट्राने अहवाल प्रसिद्ध केल्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी ही टिप्पणी केली.
चीनमधील उइघुर गटाची दडपशाही हा मानवी हक्क उल्लंघनाचा गंभीर प्रश्न आहे.
चीनच्या सरकारवर दहा लाखांहून अधिक उइघुर आणि इतर मुस्लिम अल्पसंख्याकांना “पुनर्शिक्षण” छावण्यांमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप आहे. या छावण्यांमध्ये, उईगरांवर सक्तीने मजुरी, छळ आणि प्रबोधन केले जाते.
अमेरिकेने या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. ही दडपशाही थांबवण्यासाठी चीनवर दबाव आणणे गरजेचे असल्याने सरकार तसेच अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि इतर उपायांची मागणी केली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)