तहव्वुर राणाच्या भारताकडील प्रत्यार्पणाला अमेरिकेची मंजुरी

0
प्रत्यार्पणाला
2008 मध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी दोषी असणारा तहव्वुर राणा (छायाचित्र सौजन्यः एक्स कडून व्हिडिओग्रॅब)

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाच्या नवी दिल्ली प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. हा भारताचा एका मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. सध्या राणाला लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.पाकिस्तानी वंशीय 64 वर्षीचा कॅनेडियन नागरिक असलेल्या राणाने त्याच्या प्रत्यार्पण आदेशाला आव्हान देणारा कनिष्ठ न्यायालयातील कायदेशीर निकाल त्याच्या विरोधात गेल्याने  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

प्रत्यार्पणाला आव्हान देण्याची आणखी संधी नाही

2008 च्या मुंबई हल्ल्याच्या संदर्भात राणाच्या भारतीकडील प्रत्यार्पणाविरोधातील शेवटचे कायदेशीर आव्हान फेटाळत, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाची फेरविचार याचिका फेटाळली.

भारत बऱ्याच काळापासून मागणी करत असलेल्या प्रत्यार्पणाला आव्हान देण्याच्या सर्व संधी आता राणाने संपवल्या आहेत. यू. एस. सॉलिसिटर जनरल एलिझाबेथ बी प्रीलॉगर यांनी सर्वोच्च न्यायालयाला राणाची याचिका रद्द करण्याची विनंती केली होती.

प्रीलॉगर यांनी ठामपणे सांगितले की राणाला भारताकडील प्रत्यार्पणापासून दिलासा मिळण्याचा हक्क नाही. 13 नोव्हेंबर रोजी राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयासमोर “petition for a writ of certiorari” दाखल केली.

मात्र ट्रम्प यांच्या शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी, 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने ती नाकारली.

राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याच्याशी संबंधित होता. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या 26/11 च्या  दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांपैकी हेडली एक होता. या हल्ल्यात 174 लोक ठार झाले.

26/11 चा दहशतवादी हल्ला

2008मध्ये मुंबईत झालेला हल्ला जगभरात 26/11 म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान स्थित इस्लामिक दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या 10 सदस्यांनी संपूर्ण मुंबईला चार दिवस वेठीला धरत 12 ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट घडवून आणले.

हे हल्ले बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सुरू झाले आणि 29 नोव्हेंबर 2008 पर्यंत सुरू राहिले. नऊ दहशतवाद्यांसह किमान 174 लोक मारले गेले आणि 300 हून अधिक जखमी झाले. या हल्ल्यांचा जागतिक स्तरावर निषेध करण्यात आला.

मुंबईच्या विविध भागात हल्ले

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई चबाड हाऊस, द ओबेरॉय ट्रायडेंट, द ताज पॅलेस अँड टॉवर, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, द नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारत –  सेंट झेवियर कॉलेजची मागील गल्ली अशा आठ ठिकाणी हे हल्ले झाले.

तर मुंबईच्या माझगाव बंदर परिसरात स्फोट झाला तर विलेपार्ले येथे एका टॅक्सीचा स्फोट झाला.

 

मुंबई पोलिस आणि एनएसजीने केलेली कारवाई

28 नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत ताज हॉटेल वगळता मुंबईत इतर सर्व ठिकाणी मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांनी शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित केली होती.

29 नोव्हेंबर रोजी नॅशनल सिक्युरिटी गार्डने (एनएसजी) उर्वरित दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो हाती घेतले. यामुळे ताज हॉटेलमधील शेवटच्या उर्वरित दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि हल्ले संपुष्टात आले.

 

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleINS Tushil in Africa : भारत-नामिबिया सागरी संबंधांना चालना
Next articleEU Military Chief Favours Troop Deployment To Greenland Amid Trump’s Interest In Territory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here