संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज सेवानिवृत्त

0
संयुक्त
रुचिरा कंबोज यांच्या एक्स अकाऊंटवरून साभार

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज 35 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्त झाल्या. 1987 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झालेल्या कंबोज या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजदूत म्हणून प्रतिष्ठित पदावर असलेल्या पहिल्या महिला मुत्सद्दीने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीच्या दिवशी सर्व सहकारी आणि वरिष्ठांचे आभार मानत निरोप घेतला.

“धन्यवाद, भारत, या सगळ्या विलक्षण वर्षे आणि अविस्मरणीय अनुभवांसाठी,” असे या 60 वर्षीय ज्येष्ठ मुत्सद्दीने त्यांच्या एक्स हँडलवर हा संदेश पोस्ट केला.

1987च्या नागरी सेवा बॅचमध्ये अखिल भारतीय महिला टॉपर आणि 1987च्या परराष्ट्र सेवा बॅचमध्ये टॉपर असलेल्या रुचिरा कंबोज यांनी 2 ऑगस्ट 2022 रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात भारताच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी/राजदूत म्हणून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या पोस्ट नियमितपणे आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर करणाऱ्या कंबोज यांच्या निवृत्तीची घोषणा करणाऱ्या पोस्टला सर्व स्तरातील लोकांनी-सामान्य नागरिक ते माजी राजदूत-प्रचंड प्रतिसाद दिला.

सोशल मीडिया वापरकर्ता रोहित बन्सलने कंबोज यांच्या निवृत्ती पोस्टवर कमेंट केली. “37 वर्षांच्या सेवेत त्यांनी जी शालीनता आणि दृढता दाखवली  त्याचा प्रभाव नेहमीच राहील.”

हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच बोलणाऱ्या कंबोज यांनी 1989 ते 1991 पर्यंत फ्रान्समधील भारतीय दूतावासात तिसऱ्या सचिव म्हणून काम केले. पॅरिसमध्ये आपल्या राजनैतिक प्रवासाला सुरुवात करणाऱ्या कंबोज यांनी नंतर अनेक देशांमध्ये नोकरशहा म्हणून काम केले. 2002-2005 या काळात न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायमस्वरुपी मिशनमध्ये कंबोज प्रथम समुपदेशक म्हणून कार्यरत होत्या. कंबोज यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत संयुक्त राष्ट्र शांती स्थापना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) तसेच पश्चिम आशिया/मध्य पूर्व संकट (पश्चिम आशिया अशांतता) यासह अनेक संवेदनशील मुद्द्यांवर भारताचे प्रतिनिधित्व केले.

भारतीय मिशननुसार, कंबोज यांनी लंडनमधील राष्ट्रकुल सचिवालयातही काम केले. तिथे त्यांनी सरचिटणीस कार्यालयाच्या उपप्रमुख म्हणून काम बघितले. 2011 ते 2014पर्यंत भारताच्या प्रोटोकॉल प्रमुख म्हणून कंबोज कार्यरत होत्या. या पदावर काम करणारी पहिली आणि एकमेव महिला असण्याचा मानही कंबोज यांनी पटकावला आहे. युनेस्कोच्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या तीन वर्षांच्या  कार्यकाळात त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिऱ्या पार पाडल्या. मे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना आमंत्रित केले होते. एका विशेष कामगिरीसाठी नवी दिल्लीला बोलावण्यात आलेल्या रुचिरा यांनी सार्क देश आणि मॉरिशसच्या प्रमुखांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवरून)


Spread the love
Previous articleUS Focus Shifts To China Risks; Zelenskiy Joins Asia Defence Meeting
Next articleइस्रायली गोळीबारात दोन पॅलेस्टिनी किशोरवयीन मुलांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here