अमेरिकाः आयडाहोमधील आग विझवताना झालेल्या गोळीबारात 2 जवान ठार

0

उत्तर आयडाहोमध्ये आग विझवण्यासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत 2 अग्निशमन दलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला, असे कुटेनई काउंटी शेरीफ यांनी सांगितले. एकीकडे हल्लेखोराचा शोध सुरू असतानाच, कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांवर अजूनही गोळीबारच सुरू आहे.

गोळीबाराच्या या घटनेत एकाच व्यक्तीचा समावेश होता की त्याहून अधिक हे लगेच स्पष्ट झाले नसल्याचे, शेरीफ बॉब नॉरिस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सामान्य नागरिकांनी या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहनही शेरीफने यावेळी केले.

सध्या सार्वजनिकरित्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर सक्रियपणे गोळीबार करत असलेल्या या संशयिताला निष्क्रिय करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे नॉरिस म्हणाले. तसेच या घटनेत काही नागरिकांना ओलिस ठेवले असावे असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

लोकप्रिय गिर्यारोहण स्थानाची हल्ल्यासाठी निवड

वॉशिंग्टन राज्यातील सिएटलच्या पूर्वेस सुमारे 260 मैल (420 किमी) अंतरावर असलेल्या 57 हजार लोकवस्तीच्या कोअर डी ‘एलिन शहराजवळील गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय असलेल्या कॅनफिल्ड माउंटन निसर्ग क्षेत्रात हा हल्ला झाला.

शेरीफने सांगितले की गोळीबार करणारा किंवा करणारे पहिल्यांदा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर वेगाने गोळीबार करण्यासाठी उच्च-शक्तीच्या क्रीडा रायफल्सचा वापर करत होते आणि गुन्हेगारांना “सध्या, शरणागती पत्करण्याची इच्छा असल्याचा कोणताही पुरावा अजून तरी दिसून आलेला नाही.”

नॉरिस म्हणाले की गुन्हेगार “त्या ठिकाणी पूर्ण तयारीने आलेले असून सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप झालेले आहेत.”

“जर या व्यक्तींना त्वरित निष्प्रभ केले गेले नाही, तर ही कारवाई अनेक दिवस सुरूच राहील,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

तपास सुरू

कूटेनाई काउंटी शेरीफचे लेफ्टनंट जेफ हॉवर्ड यांनी ए. बी. सी. न्यूजला सांगितले की, घटनास्थळी आपत्कालीन  कर्मचाऱ्यांना तिथे आणण्यासाठी ही आग जाणूनबुजून लावली गेली होती का  नाही याचा तपास कायदा अंमलबजावणी यंत्रणा करीत आहे.

ए. बी. सी. न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, होमलँड सिक्युरिटी विभागाच्या सचिव क्रिस्टी नोएम यांना आयडाहो गोळीबाराबद्दल माहिती देण्यात आली आहे.

अग्निशमन दलाला स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजून 21 मिनिटांच्या सुमारास आगीचा पहिला कॉल आला. त्यानंतर सुमारे 40 मिनिटांनी, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात असल्याच्या बातम्या समोर आल्याचे नॉरिस यांनी सांगितले.

‘अत्यंत भीषण हल्ला’

“हा आमच्या शूर अग्निशामक दलावरचा एक अत्यंत घृणास्पद थेट हल्ला आहे,” असे आयडाहोचे गव्हर्नर ब्रॅड लिटल यांनी एक्सवर सांगितले.

“मी सर्व इडाहोवासियांना विनंती करतो की त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना करावी. आम्ही त्यांच्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाट पाहत आहोत”.

कोणत्याही जीवितहानीबद्दल किंवा घटना नेमकी कशी घडली याबद्दल अधिक तपशील दिलेला नाही. “या परिस्थितीत अजूनही घडामोडी घडत असल्याने, कायद्याची अंमलबजावणी आणि अग्निशामक दलाला त्यांचे काम करू देण्यासाठी कृपया त्या भागापासून दूर रहा,” असे आवाहन लिटल यांनी केले आहे.

अमेरिकेत बंदूक बाळगण्याबाबतचे मालकी हक्क व्यापक आहेत. तिथे देशाचे संविधानच अमेरिकन लोकांच्या “शस्त्रे ठेवण्याच्या आणि धारण करण्याच्या” अधिकारांचे संरक्षण करते.

बंदुकीतून गोळ्या झाडून होणाऱ्या हिंसाचाराशी संबंधित मृत्यू या घटना अत्यंत सामान्य आहेत. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या सर्वात अलीकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, 2023 मध्ये अमेरिकेत बंदुकीने 17 हजार 927 लोकांची हत्या करण्यात आली.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia–Russia vs The West? Cyber+AI Tech Alliance Emerges
Next articleपंतप्रधानांच्या ब्राझील दौऱ्यात संरक्षण क्षेत्र, उदयोन्मुख तंत्रज्ञानावर भर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here