दशकभरानंतर अणुऊर्जा वाढविण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील

0

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार नवीन अणुऊर्जा प्रकल्पांच्या निर्मितीला गती देणारे एक विधेयक अमेरिकन संसदेने नुकतेच मंजूर केले आहे. हे विधेयक 365 विरुद्ध 36 मतांनी मंजूर झाले असून दोन्ही राजकीय पक्षांचे या विधेयकाला समर्थन असल्याचे यातून दिसले.हे विधेयक आता अणुऊर्जा प्रगत कायदा म्हणून ओळखले जाईल. अणुऊर्जेला स्वच्छ ऊर्जा म्हणून समर्थन देणाऱ्या बहुतांश डेमोक्रॅट्सकडून या विधेयकाला पाठिंबा मिळाला. तर हवामान बदलाच्या धोक्याबद्दल सतत जागरूक असणाऱ्या रिपब्लिकन पक्षानेही या विधेयकाला मंजूरी दिली आहे, कारण यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि ऊर्जा सुरक्षिततेला चालना मिळते असे त्यांना वाटते.

परदेशांमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर कार्यरत असणाऱ्या अणु नियामक आयोगाला (NRC) नवीन अणुभट्टीसाठी आवश्यक असणारी डिझाइनची प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी या नवीन विधेयकाचा फायदा होईल. वापरात नसलेल्या कोळसा खाणींच्या जागी नवीन अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी देखील दबाव टाकता येईल.

रिपब्लिकन पक्षातील या विधेयकाचे खंदे पुरस्कर्ते असणाऱ्या जेफ डंकन यांनी सांगितले की, हे विधेयक अमेरिकेमधील एका पिढीचे एक प्रमुख अणुऊर्जा धोरण आहे.
सिनेटमधील दोन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी आपापले मुद्दे लिहून ठेवले असून येत्या काही महिन्यांत त्यांवर चर्चा करणे आणि मतभेद दूर करणे अपेक्षित आहे.

अमेरिकेमध्ये अणुऊर्जा सुमारे 18 टक्के वीज निर्माण करते. मात्र किरणोत्सर्गी कचरा आणि अणुभट्टीच्या सुरक्षिततेबद्दल चिंता असल्यामुळे 1996 पासून केवळ तीनच अणुभट्ट्या पूर्ण झाल्या आहेत. देशातील जीवाश्म इंधनाची टंचाई दूर करण्यासाठी बायडेन सरकारने वेळोवेळी अणुऊर्जेला पाठिंबा दर्शविला आहे.

कमी किमतीत लहान अणुभट्ट्या उत्पादित करणाऱ्या उद्योगांबरोबरच आण्विक क्षेत्रात अनेक नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. पण, त्यासाठी एनआरसीकडून नव्या अणुभट्ट्यांच्या डिझाइनचा आढावा घ्यावा लागेल. मात्र पक्षाची शिस्त मोडणाऱ्या राजकारण्यांनी नवीन डिझाइन मंजूर करण्यात एनआरसी खूप वेळ लावते, अशी टीका केली आहे.

(अनुवाद : आराधना जोशी)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here