आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्हिएतनामकडून खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन

0
खाजगी क्षेत्राला

व्हिएतनामच्या सर्वोच्च नेत्याने, खाजगी कंपन्यांना राष्ट्रीय पायाभूत सुविधांमध्ये अधिक योगदान देण्याचे आवाहन केल्याच्या दोन दिवसांनंतरच, मोठ्या उद्योग समूहातील कंपनी विनग्रुप (Vingroup)ने 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची योजना जाहीर केली. या गुंतवणुकीत हाय-स्पीड रेल्वेसेवा विकसित करणे आणि त्यासाठी ट्रेन्सची निर्मीती करणे यांचा समावेश आहे.

कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख टो लाम (To Lam) यांचे हे आवाहन, ‘रिसोल्युशन 68’ मध्ये आखलेल्या व्यापक धोरणाचा भाग आहे. हा विकास आराखडा मे महिन्यात जाहीर झाला होता, ज्याला तज्ज्ञांनी त्याला “डोई मोई 2.0 (Doi Moi 2.0)” असे टोपण नाव दिले आहे. याचा संदर्भ 1980 च्या दशकातील आर्थिक सुधारणांशी आहे, ज्यांनी व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणला होता.

व्हिएतनाममधील हा हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प, देशातील सर्वात महागडा पायाभूत चाचणी प्रकल्प म्हणून उदयास आला आहे, जो आर्थिक स्थिरतेसंबंधी चिंता निर्माण करत असल्याने केंद्रीय बँक आणि वित्त मंत्रालयाने काहीवेळा त्यावर स्पष्ट टीका केली आहे, असे रॉयटर्सने पाहिलेल्या दस्तऐवजांमध्ये नमूद आहे.

पक्षाकडून खाजगी कंपन्यांसाठी प्राधान्यपूर्ण सवलती

ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झालेल्या एका पक्षीय दस्तऐवजानुसार, कम्युनिस्ट शासन चालवणाऱ्या या देशाचा उद्देश, स्थानिक नेतृत्वाखाली खाजगी क्षेत्राला अर्थव्यवस्थेचे मुख्य “चालक बल” बनवण्याचा आहे.

यासाठी, अधिक खाजगी व्हिएतनामी कंपन्यांना जागतिक स्तरावर स्थान मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. या कंपन्यांनी रणनीतिक प्रकल्पांमध्ये अधिकाधिक सहभाग घ्यावा यासाठी, सरकार प्राधान्य, सवलती आणि ‘प्राधान्यपूर्ण धोरणे’ देण्यास तयार आहेत, ज्यामध्ये “मर्यादित बोली लावणे किंवा थेट करार” यांचा समावेश आहे. ‘रिसोल्युशन 68’ मध्ये याविषयी नमूद केले आहे.

गुंतवणूकदारांची सावध पावले

व्हिएतनाममधील कोरियन बिझनेस असोसिएशनचे मानद अध्यक्ष हॉंग सून म्हणतात की, देशाला ‘चिप-टू-शिप’ (लहान-मोठी सर्व उत्पादने बनवणाऱ्या) कंपन्या हव्या आहेत आणि यामध्ये दक्षिण कोरियाची चेबोल्स (chaebols) कंपनी ‘आदर्श’ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

परदेशी गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत, ‘रिसोल्युशन 68’ जारी झाल्यानंतर पाच महिन्यांतच, गुंतवणूकीचे आश्वासन 5% कमी झाले आहे आणि तेजी असूनही परकीय गुंतवणूक शेअर बाजारातून बाहेर पडत आहे, मे महिन्यात व्हिएतनामी शेअर्सची परदेशी मालकी 16% वरून, 15% पर्यंत खाली घसरली आहे.

अनेक गुंतवणूकदार पक्षाच्या खाजगी क्षेत्र वाढवण्याच्या जाहीर हेतूला पाठिंबा देतात, परंतु काहीजण पारदर्शकता आणि पक्षपाताबाबत चिंता व्यक्त करतात.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारताच्या संरक्षण सुधारणांनी अधिग्रहण गतीला सार्वभौमत्वाशी जोडले
Next articleहाँगकाँगचे माध्यम सम्राट जिमी लाई यांना सोडण्याचे ट्रम्प यांचे शी यांना आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here