देशातील सर्वात मोठे खाजगी शस्त्रास्त्र उत्पादक एल्बिट सिस्टीम्स (ESLT.TA) यांच्याशी अंदाजे 275 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे करार करण्यात आल्याची घोषणा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी केली. या करारांचा उद्देश अवजड बॉम्ब आणि महत्त्वपूर्ण संरक्षण कच्च्या मालाचे देशांतर्गत उत्पादन वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
“इस्रायलच्या संरक्षण दलाची कार्यात्मकता आणि सैन्य वाढवण्याची क्षमता बळकट करण्यासाठी हे धोरणात्मक करार महत्त्वपूर्ण आहेत,” असे मंत्रालयाने नमूद केले. गाझामधील अलीकडील युद्धातून आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा एक मुख्य धडा मिळाल्याने असा निर्णय घेण्यावर भर दिला आहे.
पहिल्या करारांतर्गत, एल्बिट लष्कराला हजारो जड हवाई शस्त्रास्त्रांचा पुरवठा करेल. दुसऱ्या करारामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या प्रामुख्याने परदेशातून मिळवलेल्या कच्च्या मालाच्या निर्मितीसाठी सुविधा स्थापन करणे समाविष्ट आहे. मंत्रालयाने हा कच्चा माल नेमका कोणता हे निर्दिष्ट केले नसले तरी तो शस्त्रास्त्रांच्या उत्पादनासाठी आवश्यक असल्याचे सूचित केले.
संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक इयाल जमीर म्हणाले, “आज आम्ही आयडीएफच्या परिचालनक्षमतेसाठी दोन महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्पादन स्वातंत्र्य वाढवण्याचा पाया रचत आहोत-अवजड हवाई शस्त्रास्त्रांचे देशांतर्गत उत्पादन आणि कच्चा माल राष्ट्रीय प्रकल्प स्थापन करणे.”
“दोन्ही करार सर्व प्रकारच्या बॉम्ब आणि शस्त्रास्त्रे तयार करण्याची सार्वभौम क्षमता सुनिश्चित करतील.”
गाझामधील युद्धादरम्यान इस्रायलला शस्त्रे पुरविण्याबाबत काही पाश्चात्य देशांनी जाहीरपणे शंका व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या वर्षी काही बॉम्ब रहिवासी भागात वापरले जातील या चिंतेने त्यांची मालवाहतूक थांबवली.
7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यापूर्वीच आम्ही देशांतर्गत उत्पादनाकडे वळलो होतो, असे जमीर यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरच्या युद्धाने या योजनांच्या अंमलबजावणीला लक्षणीय गती दिली.
एल्बिट सिस्टीम्सचे (ESLT.TA) मुख्य कार्यकारी अधिकारी बेझलेल मॅक्लिस यांनी कंपनीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत म्हटले की, “इस्रायली संरक्षण दलांना आवश्यक शस्त्रास्त्रांच्या स्वातंत्र्याला बळकटी देण्यासाठी आम्ही भरीव योगदान देण्यासाठी समर्पित आहोत.”
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)