पाकिस्तानच्या आगामी धोरणात्मक डावपेचाचा सामना करण्याच्या दृष्टीने आधीपासूनच सज्ज राहण्याची गरज आहे. भारताला शांतता हवी आहे आणि समस्यांतून मार्ग काढण्यासाठी धोरणात्मक चर्चा हाच मार्ग आहे, पण त्यासाठी पूरक परिस्थिती आणि पाकिस्तानने भारताविरोधात चालविलेले छुपे युद्ध थांबवणे आवश्यक असल्याचे लेफ्टनन्ट जनरल जे. एस. नैना यांनी सांगितले.
जम्मू – काश्मीरमधील सध्याच्या सुरक्षाविषयक परिस्थितीबद्दल पुणेस्थित दक्षिण कमांडच्या कक्षेतील डेझर्ट कोअरने आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनार आयोजित केले होते. कलम 370 रद्द केल्यानंतर जागतिक व राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीत झालेला आमूलाग्र बदल आणि त्यामुळे काश्मीरच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवरील परिणाम यावर हे वेबिनारचे होते.
मुख्य वक्त्यांमध्ये GOC (जनरल ऑफिसर कमांडिंग) चिनार कोअरचे लेफ्टनंट जनरल डी पी पांडे, पुलवामा घटनेच्या वेळी कारभाराचे सुकाणू हाती असलेले GOC चिनार कोअरचे माजी लेफ्टनंट जनरल के जे एस धिल्लन (निवृत्त), जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक राजेंद्र कुमार, पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त आणि परराष्ट्रनीतीमधीत तज्ज्ञ टी सी ए राघवन यांचा समावेश होता. या विषयातील जाणकार असलेले अदित्य राज कौल, प्रसिद्ध पत्रकार बशीर अस्सद, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते असलेले एजाज वाणी व राजा मुनिब, इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडिज् अॅण्ड अनॅलिसिसचे (IDSA) दक्षिण आशिया विषयक तज्ज्ञ अशोक बेहुरिया यांनी काश्मीरच्या बदलत्या आयामांबद्दल आणि सुरक्षा परिस्थितीवर त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातील मते मांडली.
जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरील धोकादायक घटक व त्यांचे जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर होणारे परिणाम याबद्दल या वेबिनारमध्ये विवेचन करण्यात आले. याशिवाय, काश्मीर व काश्मीरी नागरिकांच्या निकोप प्रगतीच्या दृष्टीने विविध क्षेत्रातील संबधितांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या वेबिनारमधून केला गेला. प्रशासनाच्या विविध स्तरांवर पकड मिळवण्यासाठी ‘संपूर्ण राष्ट्र’ या ठोस आणि सयुक्तिक भूमिकेचा अवलंब करण्याची गरज या वेबिनारमध्ये अधोरेखित करण्यात आली.
या वेबिनारमधून मिळालेला मुख्य दृष्टीकोन आर्मी कमांडरने समारोपाच्या प्रास्ताविकात मांडला, युवावर्गाने मुख्य धारेशी एकरूप व्हावे यासाठी शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, तसेच अंमलीपदार्थाशी संबधित दहशतवाद रोखणे व प्रमुख संस्थांमध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून काळजी घेण्यावर भर दिला. कलम 370 रद्द करणे, जम्मू-काश्मीरची फेररचना यासारखे निर्णय गेल्या काही वर्षांमध्ये घेतले गेले. हे निर्णय धर्मनिरपेक्ष, बहुविध समाजासाठी धोरण राबवणारे, निर्णयक्षम नेतृत्वाचे निदर्शक आहे आणि ते जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले.
दक्षिण कमांडच्या 32 विविध स्थानांवरून सुमारे 1100 अधिकारी या वेबीनारमध्ये सहभागी झाले होते.
Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.
https://youtube.com/channel/UCPZPza3BQr6nt1Tp8EntiGg