क्रॅथॉन चक्रीवादळाचा तैवानच्या पश्चिमेला तडाखा, दोघांचा मृत्यू

0
क्रॅथॉन

क्रॅथॉन या कमकुवत झालेल्या तरीही “विलक्षण” टायफूनने गुरुवारी नैऋत्य तैवानला तडाखा दिला. यावेळी झालेल्या पावसात दोन जणांचा मृत्यू झाला.

प्रमुख बंदर शहर असलेल्या काओसिउंगमध्ये दुपारच्या सुमारास क्रॅथॉनने कमकुवत श्रेणी 1चे  चक्रीवादळ म्हणून तैवानला धडक दिली. यावेळी जोरदार वाऱ्यांनी कचऱ्याचे ढिगारे, झाडे आणि रस्त्यावरील दिव्याचे खांब उडवले.

सामान्य जनजीवन विस्कळीत

परिणामी, तैवानमधील व्यवहार सलग दुसऱ्या दिवशीही बंद करण्यात आले. विमानांची शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली, तसेच आर्थिक बाजारपेठा बंद करण्यात आल्या.
प्रमुख बंदर शहर काओसिउंग येथे दुपारच्या सुमारास क्रॅथॉन या  कमकुवत श्रेणी 1मधील चक्रीवादळाने भूस्खलन झाले.

मात्र, मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि भरतीच्या वेळी परत तडाखा बसणाऱ्या वादळामुळे सरकारने नागरिकांना अजूनही घरातच राहण्याचा इशारा दिला आहे.

पहाटेच्या वेळी, सुमारे 27 लाख लोकसंख्या असलेल्या काओसिउंग शहरातील रहिवाशांना 160 किमी प्रतितासापेक्षा (100 मैल प्रतितास) जास्त वेगाच्या वादळापासून बचाव करण्यासाठी आश्रय घ्यावा अशा शब्दांमध्ये इशारे मिळू लागले.

जोरदार वारे

काओसिउंगच्या बंदरात ताशी 220 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे घोंघावल्यची नोंद करण्यात आली. काओसिउंगचे महापौर चेन ची-माई यांनी पत्रकारांना सांगितले की, अनेक नागरिक अजूनही रस्त्यावर आहेत.

ते म्हणाले, “पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये दिसणाऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की इतक्या जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये आणि पावसात बरेच नागरिक स्कूटर चालवत आहेत, जे खरोखरच खूप धोकादायक आहे.” “तुम्हाला गरज नसेल तर कृपया बाहेर जाणे टाळा”.

तैपेई विद्यापीठाचा 24 वर्षीय विद्यार्थी लिआओ शियान-रोंग, वादळाचा अभ्यास करण्यासाठी काही वर्गमित्रांसह काओसिउंगला आला. आपल्यासोबत ते बॅरोमीटरसारखी उपकरणे घेऊन आले होते. त्यांच्या मते, ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे.

एका हॉटेलच्या लॉबीतून वादळाचे चित्रीकरण करताना ते म्हणाले, “आम्हाला आता वादळाचा मध्यबिंदू सापडला असून लवकरच आम्ही त्या मध्यबिंदूत प्रवेश करू.”

जीवितहानी

चक्रीवादळामुळे संपूर्ण बेटावर मुसळधार पाऊस पडल्याने  दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तैवानच्या अग्निशमन विभागाने दिली. हे दोन्ही मृत्यू डोंगराळ आणि विरळ लोकसंख्या असलेल्या पूर्व किनारपट्टीवर झाले. एक माणूस झाडाची छाटणी करताना खाली पडला, तर दुसऱ्या व्यक्तीच्या वाहनाला गडगडत येणाऱ्या दगडाने धडक दिली.

पूर्व तैवानच्या काही भागांमध्ये 1.6 मीटरपेक्षा जास्त (5.2 फूट) पावसाची नोंद झाली, ज्यामुळे दगड आणि चिखल रस्त्यावर पसरला.

दक्षिणी तैवान सायन्स पार्क भागात कामकाज सामान्यपणे सुरू असल्याची माहिती मुख्य चिपमेकर असलेल्या टीएसएमसीमधील एका कर्मचाऱ्याने दिली.

हवामान अंदाज

हवामान अंदाजानुसार, चक्रीवादळ हळूहळू तैवानच्या  पश्चिमेकडील मैदानी प्रदेशापर्यंत सरकण्याची शक्यता आहे. राजधानी तैपेईला पोहोचण्यापूर्वी शुक्रवारी उशिरा उष्णकटिबंधीय प्रदेशात वादळ आणखी कमकुवत होईल.

विमानांची उड्डाणे रद्द

देशांतर्गत उड्डाणे सलग दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली आहेत. 236 आंतरराष्ट्रीय उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. याखेरीज उत्तर-दक्षिण द्रुतगती रेल्वे विभागाने मध्य ते दक्षिण तैवानपर्यंतची सेवा पहाटेपर्यंत स्थगित केली आहे.

तैवानचा वित्तीय बाजारही सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिला. तैपेईमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी अनेक दुकाने आणि मॉल्स खुले होते.

“विलक्षण” चक्रीवादळ

अनेकदा तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर पॅसिफिकच्या दिशेने टायफून धडकतात.मात्र क्रॅथॉन हे विलक्षण ठरले कारण ते थेट पश्चिम किनाऱ्यावर धडकते.

त्या कारणास्तव आणि जमिनीवर पोहोचण्यापूर्वी ते किनाऱ्यावरुन ज्याप्रकारे प्रवास करत होते त्यामुळे स्थानिक माध्यमांनी त्याला “विलक्षण” वादळ असे नाव दिले. काओशुंग राज्य सरकारने आपल्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाताना विशेष काळजी घेतली आहे.

या सगळ्या तयारीबाबत सरकारने अनुभवातून धडा घेतला आहे.

1977 मध्ये, टायफून थेल्मा नावाच्या अशाच वादळाने 37 लोकांचा बळी घेतला होता. त्यावेळी संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले होते.

आणखी एका वेगळ्या अपघातात, पिंगटुंगच्या दक्षिण भागातील सरकारने सांगितले की, रुग्णालयात लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

चक्रीवादळाच्या काळात आरोग्य मंत्रालय रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याचे काम करत होते.

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleAir Marshal SP Dharkar Assumes Charge Of Indian Air Force Vice Chief
Next articleएअर मार्शल एस. पी. धारकर यांनी हवाई दलाच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here