सुसी वाइल्स बनल्या व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ

0
सुसी

व्हाईट हाऊसला पहिल्यांदाच महिला चीफ ऑफ स्टाफ मिळाल्या आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी फ्लोरिडातील राजकीय रणनीतीकार सुसी वाइल्स यांची या पदासाठी नियुक्ती केली आहे.
67 वर्षीय वाइल्स या कधीही फारशा चर्चेत आलेल्या नाहीत.  नवनिर्वाचित अध्यक्षांच्या दोन प्रचार व्यवस्थापकांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याविरुद्ध मंगळवारीची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी जाहीर केलेली ही पहिली नियुक्ती आहे.
असे करताना, ट्रम्प यांनी एका राजकीय कार्यकर्त्याला सर्वोच्च पद सोपवले आहे, ज्यांच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला निवडणूक जिंकणे सोपे झाले.
वाइल्स यांनी लॅटिनो आणि कृष्णवर्णीय मतदारांना आपल्याकडे वळवण्याच्या दृष्टीने धाडसी आणि यशस्वी रणनीती आखली आणि माजी अध्यक्षांना निर्णायक विजय मिळवून दिला.
“सुसी कठोर, हुशार, नावीन्यतेची आवड असणारी आहे आणि तिच्याबद्दल सर्वत्र प्रशंसा आणि आदर आहे,” असे ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले, “ती आपल्या देशाला अभिमान वाटेल असेच काम करेल यात मला शंका नाही.”
राष्ट्राध्यक्षांचे गेटकीपर म्हणून, चीफ ऑफ स्टाफ सामान्यतः मोठे प्रभावी असतात.
या पदावरील व्यक्ती व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करते, राष्ट्राध्यक्षांच्या वेळा आणि वेळापत्रक यांचे नियोजन करते तसेच इतर सरकारी विभाग आणि खासदारांशी संपर्क ठेवते.
विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या देशांतर्गत धोरण परिषदेचे माजी कार्यवाहक संचालक ब्रुक रोलिन्स हे देखील चीफ ऑफ स्टाफ पदाचे दावेदार होते.
ट्रम्प यांच्या तिसऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी अधिक शिस्तबद्ध कामकाज चालवण्याचे श्रेय वाइल्स आणि सहकारी मोहीम व्यवस्थापक ख्रिस लसिव्हिटाला दिले जाते.
बुधवारी पहाटे केलेल्या विजयाच्या भाषणात ट्रम्प यांनी त्या दोघांचे आभार मानले.
“मी तुम्हाला सांगतो की सुसीला पडद्यामागे राहायला आवडते,” असे ट्रम्प जेव्हा आपल्या भाषणात म्हणाले तेव्हा वाइल्स स्टेजच्या मागच्या बाजूला उभ्या होत्या.
ट्रम्प म्हणाले, “आम्ही तिला ‘द आइस मेडेन’ म्हणतो.
वाइल्स ही पॅट समरल यांची मुलगी आहे, जे एक प्रख्यात फुटबॉल खेळाडू आणि क्रीडा प्रसारक होते. समरल नॅशनल फुटबॉल लीगमध्ये एक दशक खेळले आणि नंतर त्यांनी 16 सुपर बाउल्सची घोषणा केली. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले.
व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांना स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी वाइल्स सूज्ञ सल्ला देतील असे वाइल्सबरोबर काम केलेल्या अनेक लोकांनी सांगितले.
ट्रम्प त्यांच्या 2017 ते 2021 या कार्यकाळात चार वेगवेगळे चीफ ऑफ स्टाफ नियुक्त करावे लागले होते – एक असामान्यपणे मोठी संख्या आहे – कारण त्यांनी बेशिस्त असणाऱ्या अध्यक्षांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले होते.
फ्लोरिडास्थित रिपब्लिकन सल्लागार डेव्हिड जॉन्सन म्हणाले, “सुसी ही एक मजबूत महिला आणि एक खरी नेता आहे जिचा काम पूर्ण करण्याकडे कल असल्याचे इतिहास सांगतो.”
वाइल्स यांनी यापूर्वी रोनाल्ड रेगन यांच्या 1980 च्या अध्यक्षीय मोहिमेवर काम केले आणि फ्लोरिडाच्या रिपब्लिकन गव्हर्नर रॉन डीसँटिस यांना 2018 मध्ये निवडणूक जिंकण्यास मदत केली.
त्यांनी ट्रम्प यांच्या 2016 आणि 2020 च्या निवडणुकीमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले.
ट्रम्प यांनी प्रतिनिधी सभागृहाचे माजी अध्यक्ष केव्हिन मॅककार्थी यांच्याऐवजी वाइल्स यांची निवड केली. खरंतर मॅककार्थी कॅलिफोर्नियाचे रिपब्लिकन असून ट्रम्प यांचे निकटवर्तीय आहेत आणि मार-ए-लागोला वारंवार भेट देत आले आहेत.
सूत्रांनी सांगितले की मॅककार्थी तसेच ट्रम्पच्या देशांतर्गत धोरण परिषदेचे माजी कार्यवाहक संचालक ब्रुक रोलिन्स हे देखील या पदाच्या शर्यतीत होते.
मंगळवारी झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा पराभव केल्यानंतर ट्रम्प यांना फ्लोरिडाच्या पाम बीच येथील त्यांच्या मार-ए-लागो क्लबमध्ये निवांतपणे पुढील रणनीती आखण्यासाठी ठेवण्यात आले आहे.
आपल्या प्रशासनातील उच्च पदांसाठी कोणाकोणाचा विचार करत आहेत याबद्दल जनतेत उत्सुकता आहे. त्यापैकी अनेकजण त्यांच्या ‘पहिल्या कार्यकाळातील” परिचित व्यक्तिमत्व आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, ट्रम्प यांचे कट्टर सहकारी, न्यूयॉर्क रिपब्लिकन प्रतिनिधी एलिस स्टेफानिक यांचे नाव  संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत म्हणून विचाराधीन आहेत.
जर्मनीतील अमेरिकेचे माजी राजदूत रिचर्ड ग्रेनेल, जे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात गुप्तचर प्रमुख होते आणि अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यासोबत होते, ते  परराष्ट्रमंत्रीपदासाठी विचाराधीन आहेत.
जपानमधील अमेरिकेचे माजी राजदूत, रिपब्लिकन सेनेटर बिल हेगर्टी यांचे नावदेखील या पदासाठी विचाराधीन आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
संरक्षण, गुप्तचर, मुत्सद्देगिरी, व्यापार, स्थलांतर आणि आर्थिक धोरण निर्मितीवर देखरेख ठेवणाऱ्या काही प्रमुख पदांसाठी देखील अनेक दावेदार आहेत.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleईस्ट टेक 2024: भविष्यातील संरक्षण उपाययोजनांची एक झलक
Next articleNew Chinese Stealth Fighter At The Centre Of China’s Grand Air Show

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here