चीन-पाकिस्तानच्या लढाऊ कार्यक्रमाची ‘उडान’ अजूनही रशियन शक्तीवरच?

0
रशियन
चिनी JF-17 ब्लॉक III लढाऊ विमाने 
रशियाने JF-17 ब्लॉक III लढाऊ विमानांसाठी पाकिस्तानला त्यांची नवीन RD-93MA इंजिन पुरवत असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. भारतासोबत मॉस्कोची गहिरी धोरणात्मक भागीदारी पाहता अशा बातम्या अत्यंत “अतार्किक” असल्याचे म्हटले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षाच्या अखेरीस भारत भेटीवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा करार झाला अशा अफवा पसरवून नवी दिल्लीसाठी हा एक संभाव्य धक्का असू शकतो असे सांगणाऱ्या काही गटांचा सुरू असणारा हा प्रयत्न एकीकडे बघायला मिळत आहे तर दुसरीकडे रशियाने या वृत्ताचे खंडन केले आहे.
रशियन अधिकारी आणि तज्ज्ञांच्या मते, MiG – 29 च्या RD-33 इंजिनचे अपग्रेड केलेले RD-93MA पाकिस्तानला निर्यात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. मॉस्कोच्या संरक्षण उद्योगातील सूत्रांनी या वृत्तांना “राजकीय विचलन” करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे, ज्याचा उद्देश दीर्घकालीन भारत-रशिया संरक्षण संबंधांची विश्वासार्हता कमी करणे आहे. लढाऊ विमाने, आण्विक पाणबुड्या आणि क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये हे दोन्ही देश प्रमुख संयुक्त प्रकल्पांना आधार देत आहेत.

 

चीनचे इंजिन अवलंबित्व कायम

विश्लेषकांनी असे नमूद केले आहे की जरी असा करार झाला तरी, पाकिस्तानी हवाई दलाच्या आघाडीच्या लढाऊ विमानांना शक्ती देणाऱ्या रशियन इंजिनसाठी स्वदेशी पर्याय तयार करण्यामध्ये बीजिंगची असणारी असमर्थता उघड होईल. चीनच्या चेंगडू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन आणि पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स (पीएसी) यांनी सह-विकसित केलेले JF-17 थंडर, दोन दशकांपूर्वीच्या व्यावसायिक करारांतर्गत पुरवलेल्या रशियन-निर्मित RD-93 इंजिनवर अवलंबून आहे.

चीनने वर्षानुवर्षे स्वदेशी पर्याय, WS-13 तैशान टर्बोफॅन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु वारंवार उद्भवणारी विश्वासार्हता आणि कामगिरी विषयक समस्यांमुळे त्याचे समावेशन लांबले आहे. पाकिस्तानला त्याच्या “सर्वात प्रगत” JF-17  प्रकारासाठी अजूनही रशियन प्रणोदनाची आवश्यकता असू शकते. यातून हेच अधोरेखित होते की चीन-पाकिस्तान सहकार्य तांत्रिकदृष्ट्या अजूनही मॉस्कोवरच अवलंबून आहे.

“ही परिस्थिती प्रत्यक्षात भारताला फायदेशीर आहे,” असे एका वरिष्ठ रशियन विश्लेषकाने एका वृत्तसंस्थेला सांगितले. “यावरून असे दिसून येते की चीनने इंजिन डिझाइनमधील तंत्रज्ञानातील तफावत अद्याप भरून काढलेली नाही आणि पाकिस्तानचा हवाई ताफा रशियन-मूळ प्रणालींच्या मर्यादांनी बांधलेला आहे ज्यांच्याशी भारतीय हवाई दल फार पूर्वीपासून परिचित आहे.”

भारताच्या संदर्भात कोणताही धोरणात्मक बदल नाही

मॉस्कोमधील संरक्षण तज्ज्ञांनी यावर भर दिला आहे की रशियाचा पाकिस्तानशी लष्करी-तांत्रिक संबंध भारतासोबतच्या दशकांपासूनच्या सहकार्याच्या तुलनेत मर्यादित आणि व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही. उलट, भारताकडे त्याच्या MiG 29 ताफ्यात वापरल्या जाणाऱ्या उत्कृष्ट RD 33 इंजिनचे परवानाकृत उत्पादन अधिकार आहेत आणि त्याच्या प्रकारांसह सखोल ऑपरेशनल अनुभव आहे.

जुन्या RD-93 वर JF-17 चे अवलंबून राहणे याचे सामरिक तोटे देखील आहेत. काही विशिष्ट परिस्थितीत इंजिनमधून होणाऱ्या गडद धुराच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्सर्जनामुळे विमानाला लढाईत लगेच ट्रॅक करणे सोपे जाते – या त्रुटीचे IAF ने ऑपरेशनल मॉनिटरिंगमधून दस्तऐवजीकरण केले आहे.

“पाकिस्तानने RD-93MA मिळवल्याच्या काल्पनिक प्रकरणातही, त्यामुळे हवाई शक्तीचे प्रादेशिक संतुलन बदलणार नाही,” असे रशियन तज्ज्ञांनी स्पष्ट केले. “भारताचा हवाई ताफा अधिक सक्षम प्रणालींनी सक्षम आहे आणि रशियासोबतच्या सखोल औद्योगिक तळ आणि तांत्रिक सहकार्याचे त्याला फायदेही होत आहेत.”

मॉस्कोकडून संबंध संतुलित करण्यावर भर

रशियाकडून केल्या गेलेल्या वृत्ताच्या खंडनामुळे नवी दिल्ली आणि बीजिंगमध्ये मॉस्को साधत असलेल्या संतुलनाला बळकटी मिळते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीत प्रमुख संरक्षण आणि ऊर्जा करारांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा असल्याने, पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देऊन भारतासोबत धोरणात्मक संबंध ताणले जातील निर्माण होईल असा कोणताही प्रयत्न दूर करण्यास मॉस्कोमधील अधिकारी उत्सुक असल्याचे दिसून येते.

शेवटी, RD-93MA इंजिनभोवतीचा वाद प्रत्यक्ष लष्करी हस्तांतरणांबद्दल कमी आणि कल्पनांबद्दल जास्त आहे असे दिसते आणि त्या कल्पनांमध्ये, भारताची स्थिती सुरक्षित असल्याचे दिसून येते.

रवी शंकर

+ posts
Previous articleWhy China-Pakistan Fighter Programme Still Flies on Russian Power
Next articleTransforming Defence: Indian Army Embraces AI to Tackle Future Threats

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here