कझाकस्तानमध्ये चीनविरोधी भावनांचा उद्रेक; जिनपिंग यांचे चित्र जाळले

0
जिनपिंग

कझाकस्तानमध्ये आंदोलने होणे तसे दुर्मिळ आहे, त्यामुळे जेव्हा अल्माटी शहरातील लोकांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे चित्र जाळल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला, तेव्हा कझाकस्तानमध्ये त्याचा पूर्वेकडील बलाढ्य शेजाऱ्याविषयी अर्थात चीनविषयी असलेला असंतोष दिसून आला.

कझाकिस्तानचे नागरिक असलेले अलिमनूर तुरगानबे यांना चिनी सीमा रक्षकांनी जुलैमध्ये केलेली अटक, हे या आंदोलनामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. अटक झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याविषयी काहीच माहिती समोर आली नसून, त्यांना उइगूरसाठी असलेल्या अनेक अटक केंद्रांपैकी कुठल्यातरी एका केंद्रात ठेवले असावे, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

कझाक अधिकाऱ्यांनी, शी जिनपिंग यांचे चित्र जाळणाऱ्या आंदोलकांना त्वरित ताब्यात घेतले असून, रिपोर्ट्सनुसार त्यातील काहींना दंड ठोठावण्यात आला, तर इतरांना अंदाजे 14 दिवसांची अल्प कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्यावर ‘बेकायदेशीर कृत्ये’ केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, ही एक अशी पद्धत आहे जी चीनविरुद्धची अगदी सौम्य टीकाही दडपून टाकण्यासाठी वारंवार वापरली जाते. परंतु, यामुळे जनाक्रोश वाढत आहे आणि सरकारला याकडे दुर्लक्ष करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

अलिमनूर तुरगानबे यांच्या कुटुंबीयांना भीती आहे की, तिथे त्यांचा छळ केला जाईल आणि त्यांना जबरदस्तीने कबुलीजबाब नोंदवण्यास भाग पाडले जाईल. मानवाधिकार संस्थांनी बऱ्याच आधी हा इशारा दिला आहे की, चीनची त्यांच्या सीमेवरील दडपाशी थांबत नाहीये; अलिमनूरचे गायब होणे हे त्याचेच एक ताजे आणि भीतीदायक उदाहरण आहे.

अनेक कझाक नागरिकांसाठी, चीन अन्य प्रकारच्या समस्या देखील निर्माण करत आहे. जसे की, बीजिंगने अनेक वर्षांपासून मध्य आशियात अब्जावधी डॉलर्स गुंतवून, तेथील शेतजमीन आणि राजकीय शांतता विकत घेतली आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, ‘बीजिंग राष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून कझाकची कृषी जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे आर्थिक भागीदारी ही संथ गतीने होणाऱ्या राजकीय नियंत्रणासठीचे केवळ एक आवरण आहे, या समजुतीला बळकटी मिळत आहे.’

जनतेचा रोष वाढत असतानाही, चीन कझाकस्तानवरील आपली पकड अधिक मजबूत करत आहे आणि ऑलटोबे प्रदेशात 200 दशलक्ष डॉलर्सच्या सिमेंट प्रकल्पासह, जवळजवळ दररोज नवनवीन प्रकल्पांची घोषणा करत आहे. परंतु, हे मोठे करार तिथल्या गंभीर समस्यांना त्यांच्या आड लपवत आहेत.

चीनने जितक्या वाहनांच्या मंजूरीचे वचन दिले होते, त्यापेक्षा खूपच कमी वाहनांना त्यांनी या आठवड्यात वाहतुकीसाठी मंजुरी दिली, ज्यामुळे नूर झोली सीमेवर जवळपास 1,500 कझाकच्या मालवाहू ट्रक अडकून पडले होते. बीजिंगने दररोज किमान 800 ट्रक्सना वाहतूकीची मंजुरी देण्याचे मान्य केले होते, तरीही त्यांनी कशीबशी 700 ट्रक्सना मंजुरी दिली, ज्यामुळे कझाकचा व्यापार पूर्णपणे मंदावला. या गोंधळामुळे, कझाकस्तानला दररोजच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यास भाग पाडले. हे संकट इतके गंभीर झाले की, अखेर राष्ट्राध्यक्ष टोकायेव यांना, सीमा व्यवस्थापनात वारंवार अपयश आल्याच्या कारणावरुन, त्यांच्या परिवहन मंत्र्याना बडतर्फ करावे लागले.

कझाकस्तानच्या सरकारने सहसा चीनवर टीका करणे टाळले आहे, आणि गुंतवणूक व राजकीय स्थैर्य जपण्याला प्राधान्य दिले आहे. परंतु, या आठवड्यात अल्माटी प्रदेशात दिसलेल्या जनाक्रोशातून त्यांच्या या शांतता धोरणात फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. जोपर्यंत कझाकचे नागरिक चीनच्या सीमेवरुन गायब होत राहतील, तोपर्यंत लोकांमध्ये हा रोष कायम राहील आणि बीजिंगने स्वतः पेटवलेली ही आग कोणतीही अटक शांत करू शकणार नाही.

मूळ लेखिका- रेशम

+ posts
Previous articleबांगलादेश: शेख हसीना यांना न्यायाधिकरणाने सुनावली फाशीची शिक्षा
Next articleIndia-UK Launch’ Ajeya Warrior-25′ in Rajasthan to Boost Counter-Terrorism Readiness

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here