मिलिटरी सिम्युलेशन आणि लढाऊ प्रशिक्षण उपाययोजनांमधील कौशल्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या झेन टेक्नॉलॉजीजने बंगळुरूच्या येलहंका येथे सुरू असणाऱ्या एरो इंडिया 2025 मध्ये तीन प्रगत संरक्षण प्रणालींचे प्रदर्शन केले. यामुळे अँटी-ड्रोन तंत्रज्ञानातील त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. या अत्याधुनिक संरक्षण प्रणालींची रचना लढाऊ अचूकता, हवाई हल्ले आणि ॲंटी-ड्रोन उपाय वाढविण्यासाठी करण्यात आली आहे.
व्योमकवचः AI आधारित अँटी-ड्रोन प्रणाली
झेन टेक्नॉलॉजीजने यूएव्हीच्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी तयार केलेल्या AI आधारित व्योमकवच या अँटी-ड्रोन प्रणालीचे अनावरण केले. प्रगत सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक जॅमर आणि कायनेटिक इंटरसेप्टरसह सुसज्ज, व्योमकवच Bayraktar TB2 आणि अति-धोकादायक UAVs च्या झुंडीला निष्प्रभ करण्यासाठी ड्रोनला आवश्यक रिअल-टाइम डिटेक्शन आणि न्यूट्रलायझेशन प्रदान करते.
झेन टेक्नॉलॉजीजचे सीएमडी अशोक अतलुरी म्हणाले, “व्योमकवचची रचना सर्वसमावेशक हवाई संरक्षण कवच म्हणून करण्यात आली आहे.” प्रभावी ड्रोन प्रतिकारक उपाय आता ऐच्छिक नाहीत- तर ती एक गरज बनली आहे.”
फोर-बॅरल रोटरी मशीन गन (12.7 x 99 मिमी)
झेन टेक्नॉलॉजीजचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची फोर-बॅरलची रोटरी मशीन गन, जी उच्च-तीव्रतेच्या लढाऊ आणि अँटी-ड्रोन अनुप्रयोगांसाठी तयार केली गेली आहे. या प्रगत शस्त्र प्रणालीमध्ये प्रति मिनिट 3 हजार 500 राऊंड्स मारण्याची क्षमता आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालणाऱ्या मोटरमुळे मारण्याच्या गतीत बदल करत गोळीबार करता येतो. योग्य गोळ्यांचा वापर करून प्रति मिनिट 900 राऊंड्स फायर करता येतात. अंदाजे 50 किलो वजनाची आणि तेराशे मिमी लांबीची ही प्रणाली आटोपशीर आहे आणि 12.7×99 मिमी नाटो दारूगोळ्यासह सुसंगत आहे, ज्यामुळे ती आधुनिक लढाऊ परिस्थितीसाठी अत्यंत योग्य प्रणाली आहे.
लढाऊ हेलिकॉप्टर्ससाठी ट्विन-बॅरल स्वयंचलित तोफ
झेन टेक्नॉलॉजीजने लढाऊ हेलिकॉप्टर्सची हल्ला करण्याची क्षमता वाढविण्यासाठी तयार केलेली एक प्रगत शस्त्रप्रणाली ट्विन-बॅरल ऑटोकॅनन देखील सादर केली. उत्कृष्ट स्थिरीकरण आणि उच्च-अचूकता लक्ष्यीकरण दर्शविणारी, अंडरबेली टर्टेड कॅनन प्रणाली (UTCS) हलक्या वजनाची आणि संक्षिप्त 20 मिमीची जुळी-बॅरेल ऑटोकॅनन एकत्रित करते, ज्यामुळे गतिशील लढाईच्या वातावरणात त्याची परिणामकारकता सुनिश्चित होते.
स्वदेशी नवकल्पनांवर भर
झेन टेक्नॉलॉजीजने आत्मनिर्भरतेप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. याशिवाय त्यांचे ड्रोन स्वदेशी बनावटीच्या मोटारीद्वारे चालवले जातात, ज्यामुळे परदेशी विक्रेत्यांवरील अवलंबित्व दूर होते-चीनमधून संरक्षण आयातीवरील भारताच्या अलीकडील निर्बंधांमुळे हा एक महत्त्वाचा घटक आहे.
काही चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. आम्ही नेहमीच स्वदेशी संशोधन आणि विकासाला प्राधान्य दिले आहे आणि या धोरणामुळे आमच्यासारख्या कंपन्यांना फायदा होतो ज्यांनी देशांतर्गत नवनिर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे,” असे अशोक अतलुरी म्हणाले.
स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या गरजेवर अतलुरी यांनी भर दिला. “खरेदीला होणारा विलंब हा एक मोठा अडथळा आहे. आम्ही वेगाने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणत आहोत, परंतु हे तंत्रज्ञान सक्रिय संरक्षण धोरणांमध्ये वेगाने एकात्मिक केले नाही तर भारत मागे पडण्याची भीती आहे.”
जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणार
मजबूत निर्यात आधारासह, झेन टेक्नॉलॉजीज युरोप आणि अमेरिकेत सक्रियपणे विस्तारत आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय मागणीची पूर्तता करताना भारताच्या स्वावलंबनाच्या मोहिमेशी सुसंगत, कंपनीने परदेशी उत्पादन आणि परिचालन केंद्रांसाठी योजना आखल्या आहेत.
एरो इंडिया 2025 मध्ये, झेन टेक्नॉलॉजीजने संरक्षणविषयक नवकल्पना, नवीन मापदंड प्रस्थापित करणे सुरूच ठेवले आहे, ज्यामुळे पुढच्या पिढीतील लष्करी तंत्रज्ञानात जागतिक नेतृत्व म्हणून भारताचे स्थान बळकट होत आहे.
रवी शंकर