तटरक्षक दलाकडून जखमी मच्छीमाराची सुटका

0
भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने खंबायतच्या आखातातील एका मच्छीमार बोटीतून अत्यंत गंभीररित्या जखमी झालेल्या कर्मचाऱ्याची सुटका केली. छायाचित्र: पीआयबी

दि. ०५ एप्रिल: भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने खंबायतच्या आखातातील एका मच्छीमार बोटीतून अत्यंत गंभीररित्या जखमी झालेल्या कर्मचाऱ्याची सुटका केली.

खंबायतच्या आखातात किनारपट्टीपासून ५० किलोमीटर अंतरावर पुष्करराज या मच्छीमार बोटीततील एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या पिपवाव या स्थानकाला मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाच्या सी ४०९ या ‘इंटरसेप्टर बोटी’ने या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी प्रस्थान केले. घटनेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ‘इंटरसेप्टर बोटी’ने पुष्करराज या मच्छीमार बोटीशी संपर्क प्रस्थापित केला. बचावपथकाने बोटीत प्रवेश केला; तेव्हा या बोटीत एक सदतीस वर्षीय मच्छीमार जखमी अवस्थेत आढळला. त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे व घोटा  तुटल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्याला मच्छिमार बोटीतून तातडीने ‘इंटरसेप्टर बोटी’त हलविण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या मच्छीमाराची परिस्थिती आता स्थिर असल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here