लष्कर-हवाईदलाचा राजस्थानात संयुक्त सराव
दि. २६ एप्रिल: लष्कर आणि हवाईदलाच्या संयुक्त सरावाचे राजस्थानातील जैसलमेर येथील ‘महाजन फिल्ड फायरिंग रेंज’वर गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी हवाईदलाच्या सी-१७ या अजस्त्र मालवाहू विमानातून लष्करच्या चिलखती वाहनाला (मेकॅनाइज्ड प्लॅटफॉर्म-बीएमपी) ‘पॅराशुट’च्या सहायाने ‘एअरड्रॉप’ करण्यात आले, अशी माहिती लष्कराच्या माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्यावतीने (एडीजी-पीआय) ‘फेसबुक’वर देण्यात आली आहे.
मालवाहू विमानातून चिलखती वाहन उतरविणे हे आतिशय मोठे आव्हान होते. त्यासाठी लष्कर आणि हवाईदलाने संयुक्तपणे नियोजन केले होते. देशांतर्गत विकसित करण्यात आलेले टाइप-५ हे ३२ फुटी चिलखती वाहन या सरावादरम्यान ‘पॅराशुट’च्या सहायाने ‘एअरड्रॉप’ करण्यात आले. या चिलखती वाहनाची निर्मिती सरकारच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाला चालना देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे, असेही ‘एडीजी-पीआय’कडून सांगण्यात आले.
विनय चाटी