संरक्षणदलप्रमुख फ्रान्सच्या भेटीवर रवाना

0
CDS, Space Industry, DRDO
संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान

संरक्षण क्षेत्रातील संबंध बळकट करण्यावर भर

दि. २२ एप्रिल: भारत आणि फ्रान्सदरम्यान संरक्षण संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने संरक्षणदलप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान रविवारी फ्रान्सच्या दौऱ्यावर रवाना झाले. उभय देशांतील लष्करी संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्याला गती देणे व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत संबंधांना मजबूत करण्याच्या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.

जनरल अनिल चौहान आपल्या या दौऱ्यात फ्रान्सच्या वरिष्ठ नागरी आणि लष्करी नेतृत्वाशी संवाद साधणार आहेत. यामध्ये त्यांचे समकक्ष व फ्रान्सचे संरक्षणदल प्रमुख (फ्रेंच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ-सीईएमए) जनरल थिएरी बर्कहार्ड, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हायर डिफेन्स स्टडीज’चे संचालक आणि आयुध विभागाचे महासंचालक यांचा समावेश आहे. जनरल चौहान फ्रेंच स्पेस कमांड, लँड फोर्सेस कमांडला भेट देतील आणि इकोल मिलिटेअर (स्कूल ऑफ मिलिटरी) येथे लष्कर आणि जॉइंट स्टाफ कोर्सच्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित करतील. ते सॅफ्रान ग्रुप, नेव्हल ग्रुप आणि दसॉ एव्हिएशनसह फ्रान्समधील काही प्रतिष्ठित संरक्षण उद्योगांना भेट देणार आहेत आणि त्यांच्याशी संवादही साधणार आहेत.

सीडीएस जनरल अनिल चौहान न्यू वे -चॅपेल मेमोरियल आणि विलर्स-गुइस्लेन येथील भारतीय स्मारकाला भेट देऊन पहिल्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ पुष्पचक्र अर्पण करणार आहेत.

विनय चाटी

स्रोत: पीआयबी

 


Spread the love
Previous articleपूर्व किनारपट्टीवर नौदलाचा युद्धसराव
Next articleतिसऱ्या कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे ‘स्टील कटिंग’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here