भारतीय तटरक्षक दलासाठी 149 सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओ खरेदीकरिता संरक्षण मंत्रालयाने 20 फेब्रुवारी 2025 रोजी बंगळुरूच्या मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), सोबत करार केला. या रेडिओची खरेदी श्रेणी अंतर्गत (इंडियन-आयडीडीएम) एकूण किंमत 1 हजार 220.12 कोटी रुपये इतकी आहे.
हे अत्याधुनिक रेडिओ हाय-स्पीड डेटा आणि सुरक्षित व्हॉइस कम्युनिकेशनद्वारे सुरक्षित आणि विश्वासार्ह माहितीची देवाणघेवाण, सहकार्य आणि परिस्थितीजन्य जागरूकता सक्षम करतील. याव्यतिरिक्त, हे रेडिओ भारतीय नौदलासोबत संयुक्त कार्यान्वयनात आंतर परिचालन क्षमता वाढवतील.
यामुळे सागरी कायदा अंमलबजावणी, शोध आणि बचाव कार्ये, मत्स्यव्यवसाय संरक्षण आणि सागरी पर्यावरण संरक्षण यासारख्या मुख्य जबाबदाऱ्या पेलण्याची भारतीय तटरक्षक दलाची क्षमता बळकट होईल. हा प्रकल्प तटरक्षक दलाच्या कार्यरत क्षमतांना बळकटी देण्यासाठी आणि सागरी सुरक्षा मजबूत करून भारत सरकारच्या नील अर्थव्यवस्था उद्दिष्टांना पाठिंबा देण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे.
याव्यतिरिक्त, नवीन एसडीआर भारतीय नौदलाची आंतरसंचालनीयता वाढवतील, ज्यामुळे संयुक्त कामगिऱ्या आणि सराव सुलभ होतील. हा विकास केवळ भारताच्या सागरी संरक्षण क्षमतांना बळकटी देत नाही तर त्याच्या नौदल दलांमध्ये अधिक समन्वय वाढवतो.
हा उपक्रम भारताच्या सुरक्षित सागरी क्षेत्राच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, व्यापार मार्ग आणि सागरी संसाधनांचे संरक्षण करून सरकारच्या सागरी अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देतो. याव्यतिरिक्त, ते उच्च तंत्रज्ञानाच्या लष्करी दर्जाच्या दळणवळण प्रणालींच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना देते. बीईएलबरोबरच्या करारामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि भारतीय संरक्षण क्षेत्रात तांत्रिक प्रगती होईल अशी अपेक्षा आहे.
1868 रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रकच्या खरेदीसाठी 697.35 कोटी रुपयांचा करार
याशिवाय भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदल यांच्यासाठी एकूण 697.35 कोटी रुपयांच्या 1 हजार 868 रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रकच्या (RTFLT) खरेदीसाठी,संरक्षण सचिव आर. के. सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालयाने मेसर्स एस लिमिटेड आणि मेसर्स जेसीबी इंडिया लिमिटेड यांच्याशी करार केला आहे.
रफ टेरेन फोर्क लिफ्ट ट्रक (आरटीएफएलटी) हे एक महत्त्वपूर्ण उपकरण आहे ज्यामुळे विविध लढाऊ आणि वाहतूक कार्यांतील प्रत्यक्ष हाताळणी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल आणि त्यामुळे भारतीय लष्कर,भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
ही खरेदी भारतीय असल्याने राष्ट्रीय संरक्षण उपकरणांची उत्पादन क्षमता वाढेल. सुट्या भागांच्या निर्मितीद्वारे एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची अफाट क्षमता आहे.
हे दोन्ही खरेदी करार म्हणजे महत्त्वपूर्ण लष्करी तंत्रज्ञानामध्ये देशाचे स्वावलंबन बळकट करताना भारताच्या संरक्षण पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
टीम भारतशक्ती