
दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबा (LeT) चा प्रमुख सूत्रधार अबू क़ताल, पाकिस्तानमधील एका टार्गेटेड हल्ल्यात ठार झाला. क़ताल हा मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदचा भाचा आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमागेही क़तलचा हात असल्याचे समजते.
अबू क़तल, ज्याचे खरे नाव जिया-उर-रहमान होते, 7 वाजण्याच्या सुमारास जहेलम क्षेत्रात आपल्या सुरक्षा रक्षकासोबत प्रवास करत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला, अशी माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिली.
हल्लेखोरांनी क़तल आणि त्याच्या एक रक्षकावर तब्बल 15 ते 20 गोळ्या झाडल्या, या गोळीबारात दोघेही जागीच ठार झाले.
लष्कर-ए-तोयबा च्या आणखी एका सुरक्षा रक्षकाला हल्ल्यात गंभीर दुखापत झाली.
अबू क़तल पाकिस्तानी आर्मीकडून हेव्ही सुरक्षा घेत होता, त्याच्या सुरक्षेसाठी लष्कर-ए-तोयबा चे दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्याच्या सिव्हील ड्रेसमधील जवान तैनात होते, असे एका वृत्तवाहिनीने सांगितले.
हा हल्ला जहेलम जिल्ह्यातील दिना पंजाब विद्यापीठाजवळ झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
सईदने लष्कर-ए-तोयबा चा मुख्य ऑपरेशनल कमांडर म्हणून क़तलची नियुक्ती केली होती.
रिपोर्ट्सनुसार, कताल सईदच्या आदेशानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्व योजना राबवत असे.
शिवखोरी दहशतवादी हल्ला
अबू क़तलने 9 जून रोजी, जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील, शिवखोरी मंदिरातून परत येणाऱ्या तीर्थयात्र्यांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, अशी माहिती आहे.
अचानक झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे तीर्थयात्र्यांची बस दरीत कोसळली, ज्यात किमान दहा लोक ठार झाले आणि अनेकजण जखमी झाले.
राजोरी हल्ला
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने 2023 मध्ये झालेल्या, राजोरी हल्ल्यांमध्ये क़तलचे नाव आरोपपत्रात नमूद केले होते.
1 जानेवारी 2023 रोजी, दहशतवाद्यांनी राजोरी परिसरातील धांगरी गावावर हल्ला केला होता, दोन दिवस चाललेल्या या हल्ल्यात सात लोकांचा मृत्यू झाला, ज्यात दोन लहान मुले देखील होती.
दहशतवाद्यांनी राजोरी हल्ल्याच्या दरम्यान एक IED स्फोट देखील केला होता.
(IBNS च्या इनपुट्ससह)