सोमालियन हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्यात 8 ठार

0

सोमालियाची राजधानी मोगादिशू येथील एका हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या  असून परतवून लावला असून त्यात सहभागी असलेल्या पाचही हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. गुरुवारी रात्री एसवायएल हॉटेलवर करण्यात आलेल्या हल्ल्यात तीन सैनिक ठार आणि 27 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिस प्रवक्ते कासिम रोबले यांनी दिली.

राष्ट्रपती भवनाजवळच्या अति सुरक्षित भागात वसलेल्या आणि सरकारी अधिकाऱ्यांची वारंवार ये जा असलेल्या या हॉटेलवर अल – शबाब या अतिरेकी गटाने हल्ला केला होता. आपल्याच लढवय्यांनी या परिसरात घुसखोरी केल्याचे सांगत या हल्ल्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे अल – शबाब गटाने या आधीच जाहीर केले होते.

अतिरेक्यांचा खात्मा झाल्यानंतर पोलिस प्रवक्ते कासिम रोबले यांनी सांगितले की परिस्थिती नियंत्रणाखाली आली असून हॉटेल परिसर पूर्णतः सुरक्षित आहे. परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याने खासदार आणि इतर रहिवाशांनी परत या हॉटेलमध्ये येण्यास सुरुवात केली आहे.

अलिकडच्या आठवड्यांमध्ये कडक सुरक्षा उपाययोजनांमुळे सागरी किनाऱ्यावर असलेल्या राजधानी मोगादिशूवर होणारे हल्ले कमी झाले असले तरी, यापूर्वी हॉटेल्स आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करणाऱ्या असंख्य प्राणघातक घटनांमागे अल – कायदाशी संबंधित असणारा अल – शबाब हाच गट होता. या गटाचा सोमालियन सरकारला विरोध आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये मोगादिशूमधील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या दुहेरी कार बॉम्बस्फोटांमध्ये किमान 120 नागरिकांचा बळी गेला होता. अलिकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला असल्याचे म्हटले जाते.

राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील सोमालियन सरकारने अल – शबाबच्या विरोधात मोठ्या कारवायांना सुरूवात केली आहे. या संघटनेला अमेरिकेने अल – कायदाच्या सर्वात प्राणघातक संघटनांपैकी एक संघटना म्हणून घोषित केले आहे. मोहम्मद यांनी अतिरेक्यांविरुद्ध “संपूर्ण युद्ध” घोषित केले आहे, ज्यांचे मध्य आणि दक्षिण सोमालियातील मोठ्या प्रदेशांवर नियंत्रण आहे आणि अलिकडच्या वर्षांमध्ये त्यांच्यावर अमेरिकेकडून असंख्य हवाई हल्ले केले गेले आहे.

रामानंद सेनगुप्ता


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here