ब्राझिलने सोमवारी, इंडोनेशिया हा देश BRICS गटाचा नवीन पूर्ण सदस्य झाला, असे घोषित केले. ब्रिक्स हा गट बहुपक्षीय संस्थांमध्ये उगवत्या अर्थव्यवस्थांच्या दृष्टिकोनांचा एकजूट असलेला आहे.
ब्राझिलच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “ब्राझिलच्या अस्थायी अध्यक्षतेच्या संदर्भात, जे १ जानेवारीपासून सुरू झाले आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील, त्यात ब्राझिल सरकार ६ जानेवारी रोजी, रिपब्लिकन ऑफ इंडोनेशियाची, ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून औपचारिकपणे प्रवेश दिल्याची घोषणा करत आहे”
ब्राझिलने सांगितले की, ब्रिक्सच्या नेत्यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये जोहान्सबर्ग शिखर परिषदेदरम्यान इंडोनेशियाच्या उमेदवारीला मान्यता दिली होती, जो पूर्ण सदस्यांसाठी गटाच्या विस्तार प्रक्रियेचा एक भाग होता.
“२०२४ मधील राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुका लक्षात घेता, इंडोनेशियाने नवीन सरकारच्या स्थापनेनंतरच BRICS मध्ये सामील होण्याच्या त्यांच्या स्वारस्याच्या गटाला औपचारिकपणे सूचित केले. २०२४ मध्ये, ब्रिक्स सदस्यांनी सर्वांच्या सहमतीने इंडोनेशियाच्या सदस्यत्वास मंजुरी दिली. हा निर्णय जोहान्सबर्गमध्ये संमतीसाठी आलेल्या विस्ताराबाबतची मार्गदर्शक तत्त्वे, निकष आणि प्रक्रियेच्या अनुषंगाने घेण्यात आला”, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, ब्राझिलने इंडोनेशियाच्या ब्रिक्समधील प्रवेशाचे स्वागत केले आहे.
“आग्नेय आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र म्हणून ओळख असलेला, इंडोनेशिया देश हा इतर BRICS सदस्यांसह जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणांना पाठिंबा देतो आणि ग्लोबल साउथ सहकार्याची वृद्धी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतो” असेही या निवेदनात म्हटले आहे.
इंडोनेशिया, जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. याआधीही इंडोनेशियाने, उदयोन्मुख देशांना बळकट करण्यासाठी आणि तथाकथित ग्लोबल साउथचे हितसंबंध वाढवण्यासाठी या गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
BRICS नक्की काय आहे?
BRICS गट हा मूळात BRIC असा होता, ज्यामध्ये ब्राझील (B), रशिया (R), इंडिया (I), आणि चीन(C) या चार देशांचे नेते, प्रथमच एका खास परिषदेसाठी एकत्र आले होते. ही परिषद जुलै 2006 मध्ये, रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे G8 आउटरीच शिखर परिषदेदरम्यान आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर, सप्टेंबर २००६ मध्ये, या गटाला पहिल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये औपचारिकपणे ‘ब्रिक्स’ म्हणून अस्तित्वात आणले गेले, जे न्यूयॉर्क सिटीतील UN महासभेच्या सामान्य चर्चेच्या पार्श्वभूमीवर आयोजित केले गेले होते.
उच्चस्तरीय बैठकांच्या मालिकेनंतर, 16 जून 2009 रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे पहिली BRIC शिखर परिषद झाली.
त्यानंतर सप्टेंबर 2010 मध्ये, न्यूयॉर्क येथे झालेल्या ब्रिक परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत, ‘दक्षिण आफ्रिकेला’ पूर्ण सदस्य म्हणून या गटात सामील करुन घेण्यात आले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका अर्थात साऊथ आफ्रिकेचा ‘S’ ब्रिक नावापुढे जोडला गेला आणि त्याला ‘BRICS’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अशी नवीन ओळख प्राप्त झाली.
(IBNS आणि रॉयटर्सच्या इनपुटसह)