बेंगळुरू येथे 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या, 15 व्या द्विवार्षिक ‘Aero India 2025‘ मध्ये, लॉकहीड मार्टिन भारतात प्रथमच त्यांची इमर्सिव Vast™ अनुभव प्रणाली प्रदर्शित करणार आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या गरजेनुसार तयार केलेल्या एकात्मिक आणि अत्याधुनिक क्षमतेवर लक्ष केंद्रित करून, कंपनी 21 व्या शतकातील सुरक्षा® साठी आपला दृष्टीकोन प्रदर्शित करेल.
कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, Vast™ अनुभव प्रणाली ही लॉकहीड मार्टिनच्या प्रदर्शनातील महत्वाचे आकर्षण असेल. ही प्रणाली अतिसंवेदनशील, संवादात्मक ३D व्हिज्युअलायझेशन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, जी बहु-डोमेन मिशनचे प्रतिनिधीत्व करेल.
लॉकहीड मार्टिनच्या म्हणण्यानुसार, “कंपनी भारताच्या २१व्या शतकातील सर्वात कठीण आव्हानांच्या दृष्टीकोनातून, नवीनतम अत्याधुनिक तंत्रज्ञान उपाय सादर करणार आहे.”
Vast™ व्यतिरिक्त, लॉकहीड मार्टिनच्या प्रदर्शनात C-130J सुपर हर्क्युलस टॅक्टिकल एअरलिफ्टर, F-21 लढाऊ विमान, MH-60R “रोमियो” मल्टी-मिशन हेलिकॉप्टर, यासह त्याचे नवीनतम आणि सर्वात प्रगत प्लॅटफॉर्म आणि सिस्टीम प्रदर्शित केले जातील. तसेच Javelin® शस्त्र प्रणाली, आणि S-92® मल्टी-रोल हेलिकॉप्टर, त्याच्या नाविन्यपूर्ण Vast™ तंत्रज्ञानासोबत प्रदर्शित केले जातील.
लॉकहीड मार्टिनचे एशिया आणि भारतातील उपाध्यक्ष आणि क्षेत्रीय मुख्य कार्यकारी- विलियम एल. ब्लेअर, यांनी सहयोगासाठी प्रमुख व्यासपीठ म्हणून एरो इंडियाच्या महत्वपूर्ण प्रदर्शनावर भर दिला.
“एरो इंडिया हे लॉकहीड मार्टिन आणि एरोस्पेस तसेच संरक्षण क्षेत्रांसाठी दीर्घकाळ एक प्रमुख व्यासपीठ ठरले आहे. आम्ही Vast™ अनुभव प्रणाली सादर करण्यासाठी आणि आमच्या अत्याधुनिक क्षमतांचा परिचय देण्यासाठी उत्साहित आहोत, जे आमच्या ग्राहकांच्या सर्वात महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केलेले आहेत. भारतीय उद्योगाबरोबर आमच्या मजबूत भागीदारींचा आधार घेऊन, आम्ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या मार्गावर आणखी समर्थन देण्याचा प्रयत्न करू,” असे ब्लेअर यांनी सांगितले.
सहयोगाचा वारसा
‘C-130J सुपर हरक्यूलिस टॅक्टिकल एअरलिफ्टर’ हे लॉकहीड मार्टिनच्या – भारताशी असलेल्या शाश्वत भागीदारीचे उदाहरण आहे. भारतीय हवाई दल (IAF) सध्या चालवत असलेले १२ C-130J हे विमान, विविध टॅक्टिकल एअरलिफ्ट मोहिमांना समर्थन देते. ही भागीदारी टाटा लॉकहीड मार्टिन एरोस्ट्रक्चर्स लिमिटेड (TLMAL) च्या संयुक्त उपक्रमावर देखील विस्तारित आहे. TLMAL हे सर्व नवीन सुपर हरक्यूलिस विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या, C-130J एम्पेनॅज असेंब्लीचे एकमेव जागतिक पुरवठादार आहे.
लॉकहीड मार्टिन आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (TASL) यांनी 2024 मध्ये, भविष्यातील संधींच्या दृष्टीकोनातून टीमिंग करार करत आपसी सहकार्य वृद्धिंगत केले, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- भारतीय हवाई दलाच्या C-130J फ्लीट आणि इतर जागतिक सुपर हरक्यूलिस विमानांसाठी देखभाल, दुरुस्ती आणि पुन्हा एकत्रीकरण (MRO) करण्याची सुविधा भारतात स्थापित करणे.
- भारतीय हवाई दलाच्या मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (MTA) कार्यक्रमासाठी C-130J उत्पादन आणि असेंब्ली क्षमतांचा विकास करणे (सदर प्रस्ताव अमेरिका आणि भारत सरकारच्या मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहे.)
अत्याधुनिक प्लॅटफॉर्म्सते महत्व
F-21 लढाऊ विमान, जे भारतीय हवाई दलाच्या बहुउद्देशीय लढाऊ विमान स्पर्धेसाठी डिझाइन केले गेले आहे, त्याकडे एक गेम-चेंजर म्हणून पाहिले जाते. अत्याधुनिक सेन्सर्स, मिशन अव्हियॉनिक्स आणि अत्याधुनिक कॉम्बॅट डिस्प्ले प्रणालीने सुसज्ज असलेले F-21 विमान भारताची किफायतशीरता, कार्यक्षमता, आणि ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘स्किल इंडिया’ उपक्रमांसोबतचे संरेखन अधोरिखित करते.
याव्यतिरिक्त, एरो इंडियामध्ये यावेळी ‘MH-60R “रोमियो” SEAHAWK®’ हे हेलिकॉप्टर देखील मुख्य आकर्षण ठरेल. अँटी-सबमरीन वॉरफेअर (ASW) आणि अँटी-सर्फेस वॉरफेअर (ASuW) साठी जगातील सर्वात सक्षम आणि बहुउद्देशीय असे हे MH-60R हेलिकॉप्टर, भारतीय नौदलात आधीच ऑपरेशनल आहे, ज्यामध्ये १० MH-60Rs सेवा मध्ये आहेत आणि २०२५ च्या अखेरीस एकूण २४ मिळवणार आहेत.
दुसरे एक प्रमुख आकर्षण म्हणजे Javelin शस्त्र प्रणाली—जगातील सर्वात बहुउद्देशीय, एकटा उचलता येणारी, फायर-आणि-फॉरगेट अँटी-टँक सोल्यूशन. कोणत्याही वातावरणात कार्य करण्याची त्याची क्षमता, अपार ऑपरेशनल लवचिकतेसह, हे आधुनिक लढाऊ परिस्थितीसाठी एक महत्त्वाचे साधन बनवते.
S-92® बहु-भूमिका हेलिकॉप्टर आणखी एक उदाहरण आहे लॉकहीड मार्टिनच्या भारताशी असलेल्या सहकार्याचे. टाटा सिकॉर्स्की एरोस्पेस लिमिटेडसोबतच्या त्यांच्या संयुक्त उपक्रमातून, S-92 पूर्णपणे लॉकहीड मार्टिनच्या जागतिक पुरवठा साखळीत समाकलित आहे, ज्यामध्ये भारतात उत्पादित केलेल्या एरोस्ट्रक्चर घटकांचा समावेळ आहे.