थायलंड आपल्या ६०९ किमी (३७८ मैल) लांब, हाय स्पीड रेल्वे लिंक २०३० मध्ये सुरूवात होण्याची अपेक्षा करत आहे. हा रेल्वे मार्ग लाओसद्वारे चीनशी जोडला जाईल, अशी माहिती थायलंड सरकारने बुधवार दिली. हा प्रकल्प साधारणतः नियोजित कालावधीपेक्षा जवळपास एक दशक उशिराने सुरु होत आहे.
प्रकल्पाची आत्तापर्यंतची प्रगती
थायलंड सरकारचे प्रवक्ते जिरायु हौंगसुब यांनी सांगितले की, बँकॉक ते नखोन रचसिमा शहर (सुमारे २२० किमी अंतरावर) यांना जोडणाऱ्या मार्गाच्या, तिसर्या टप्प्यापैकी एक तृतीयांश काम पूर्ण झाले असून, संपूर्ण लाईन २०३० पर्यंत लाओसच्या सीमेजवळील नॉन्ग खाईपर्यंत बनून पूर्ण होईल.
६ अब्ज डॉलर्स किमतीच्या, १००० किमी लांबीच्या या रेल्वे लाईनने २०२१ मध्ये, लाओसची राजधानी वियंतियान ते दक्षिण-पश्चिम चीनमधील कुआनमिंग शहरांदरम्यान सेवा सुरू केली, ज्यामध्ये ७०% भाग बीजिंगच्या मालकीचा आहे. या लाईनला वियंतियानमधून थायलंडच्या नॉन्ग खाईशी जोडले जाईल, जे वियंतियानपासून सुमारे २५ किमी दूर आहे.
जिरायु पुढे म्हणाले की, “हा रेल्वे मार्ग थायलंडसाठी जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणी साधण्याची एक मोठी संधी आहे आणि यामुळे थायलंडला आपल्या लॉजिस्टिक्स हब बनण्याच्या ध्येयाच्या आणखी जवळ नेण्यास मदत होणार आहे.”
चीनने थायलंडला रेल्वे लिंकवर वेगाने प्रगती करण्याचे आवाहन केल्यानंतर एक वर्षानंतर ही घोषणा झाली आहे.
हस्ताक्षरित करार
सुमारे दोन दशकांपूर्वी रेल्वे मार्गावर चर्चा सुरू झाली होती आणि 2021 मध्ये, थायलंड व चीनने ऑपरेशन सुरू करण्याच्या योजना सुरु करण्यासह, 2017 मध्ये त्याच्या बांधकामाबाबत करारांवर स्वाक्षरी केली होती. परंतु वित्तपुरवठ्याचा तुटवडा तसेच डिझाइनवरील मतभेद आणि त्यानंतर आलेल्या COVID-19 च्या लाटेमुळे काम पुढे नेण्यास विलंब झाला.
ही योजना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, यांचा महत्त्वाकांक्षी बेल्ट- रोड व्यापार आणि पायाभूत सुविधा उपक्रमाचा एक भाग आहे, ज्यामध्ये कुनमिंगमध्ये म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाममधून जाणाऱ्या तीन मार्गांच्या योजनांचा समावेश आहे.
व्हिएतनामची दोन मोठी शहरे, हनोई आणि हो ची मिन्ह सिटी यांना जोडणारी 1,541 किमी (958-मैल) हाय-स्पीड रेल्वे लाईन बांधण्याची योजना, $67 बिलियनपेक्षा जास्त रकमेची आहे. हे ऑपरेशन 2035 मध्ये सुरू करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. चीनच्या युनान प्रांताच्या सीमेपासून हनोई, हैफॉन्ग आणि हा लाँग सिटी या बंदर शहरापर्यंत $7.2 अब्ज डॉलर्स किमतीची रेल्वे लाईन बांधण्याची देखील योजना आखली जात आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)