एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत, खूप मोठा गाजावाजा झालेली DeepSeek ही चीनी AI कंपनी, बहुधा चीनी नववर्षामुळे हायबरनेशन मोडमध्ये गेल्याचे दिसत आहे. चीनचा हा नवा आविष्कार प्रत्यक्षात कितपत यशस्वी होऊ शकतो, विशेषत: पाश्चात्य समकक्षांच्या तुलनेत त्याला कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते? हे पाहण्याची आता वेळ आली आहे.
रातोरात प्रसिद्धी – पण कोणत्या किंमतीवर?
अहवालानुसार, अमेरिकेचे सरकार DeepSeek ने प्रतिबंधित AI चिप्स वापरल्या आहेत का, याची सध्या चौकशी करत आहे. काही अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की, DeepSeek प्रयोगशाळेने 50,000 उच्च दर्जाचे Nvidia H100 GPUs वापरले असण्याची शक्यता आहे, जे पूर्वीच संकलित केले गेले असू शकतात किंवा जागतिक ब्लॅक मार्केटमधून मिळवलेले असू शकतात. त्यामुळे येथे प्रणालीच्या दीर्घकालीन टिकाऊपणाचा प्रश्न उभा राहतो.
सेन्सॉरशिपची कोंडी
सहसा AI मॉडेल्स ही खूप मोठ्या आणि विविध प्रकारच्या डेटासेट्सवर आधारित असतात, पण चीनमधील सरकारी सेन्सॉरशिप राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयांवर प्रवेश मर्यादित करते. हे OpenAI च्या ChatGPT पेक्षा वेगळे आहे, जे काही प्रमाणात मॉडरेशनसह कार्य करत असले तरी राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय, वादग्रस्त ऐतिहासिक घटना आणि जागतिक दृष्टिकोनांवर चर्चा करते.
तियानमेन स्क्वेअर येथे झालेले हत्याकांड, शिनजियांग आणि तिबेटमधील मानवाधिकारांचे उल्लंघन, तैवानचे मुद्दे आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या टीकेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना DeepSeek आवश्यक ती उत्तरे देऊ शकलेले नाही.
AI च्या क्रांतिकारक शोधांसाठी खुल्या आणि अप्रतिबंधित माहितीचा प्रवाह आवश्यक असतो. जर DeepSeek सेन्सॉरिशिपने मर्यादित झाली, तर तिला अत्याधुनिक ज्ञान निर्मितीमध्ये मागे पडण्याचा धोका उद्भवू आहे. चिनी AI क्षेत्राने चेहरा ओळख आणि स्मार्ट निगराणी यासारख्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक मॉडेल्स तयार केली आहेत, पण जेव्हा जनरेटिव AI चा विषय येतो, तेव्हा नवकल्पना आणि बौद्धिक खुल्या विचारांची आवश्यकता असते, जी राज्याने लादलेल्या मर्यादांशी विरोधाभास करते.
विश्वास आणि सुरक्षेची चिंता
कुणल्याही तंत्रज्ञान प्रणालीतील दुसरे मोठे आव्हान म्हणजे ‘विश्वास’. ChatGPT ला पूर्वग्रहदूषित आणि चुकीची माहिती पुरवल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला आहे, परंतु त्याच्याकडे राज्य प्रचाराचे साधन म्हणून पाहिले जात नाही. परंतु, DeepSeek ला चिनी सरकारच्या प्रभावाखाली असल्यामुळे प्रमाण मानले जाईल, ज्यामुळे चीनच्या बाहेर त्याच्या स्वीकारणावर गंभीर मर्यादा येऊ शकतात.
लाँच झाल्यापासूनच DeepSeek, त्याच्या किफायतशीरतेमुळे आणि अग्रगण्य AI मॉडेल्सशी वारंवार होणारी तुलना व सायबर सुरक्षेबद्दलच्या चिंतेमुळे सातत्याने चर्चेत आहे. चीनच्या बाहेरील डाउनलोड चार्टवर जरी ते वेगाने चढत असले, तरी संभाव्य सुरक्षा जोखमीच्या अहवालांमुळे अनेक वापरकर्ते, डेटा गोपनीयतेतील असुरक्षितता आणि सायबर धोक्याच्या भीतीने, त्यावर लॉग इन करण्यासाठी संकोच करत आहेत.
DeepSeek ची किफायतशीरता आणि त्याचा वेगाने होणारा विकास पाहता, ते AI विश्वातील एक मोठा खेळाडू बनू शकते, परंतु नियामक तपासणी, भौगोलिक तणाव आणि सेन्सॉरशिपच्या मर्यादांमुळे त्याचा जागतिक प्रभाव अजूनही अनिश्चित आहे.
सद्यस्थितीत, DeepSeek मुख्यधारेमध्ये आहे, परंतु त्याची खरी परीक्षा पुढे आहे. DeepSeek खरोखरच जागतिक स्तरावर उभरते AI तंत्रज्ञान म्हणून नावारुपाला येईल की ते चीनच्या बंदिस्त AI इकोसिस्टममध्ये अडकून राहील? हे येणारी वेळच सांगू शकते.