करोडपती नाही तर कदाचित अब्जाधीश असणाऱ्या, आगा खान यांनी खासगी विमाने, 20 कोटी डॉलरची सुपर-यॉट आणि बहामासमधील एक खाजगी बेट अशी वैशिष्ट्ये असलेली भव्यदिव्य जीवनशैली देखील अनुभवली.
त्यांच्याकडे अंदाजे 800 दशलक्ष ते 13 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती होती. यात कौटुंबिक वारसाहक्कातून आलेला पैसा, उत्तम घोड्यांच्या प्रजननाचा व्यवसाय आणि पर्यटन तसेच स्थावर मालमत्तेत त्यांनी केलेल्या वैयक्तिक गुंतवणुकीचा परतावा यांचा समावेश होता.
ब्रिटिश, फ्रेंच, स्विस आणि पोर्तुगीज नागरिकत्व असलेल्या या आंतरराष्ट्रीय jet setterने जगातील गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते.
“जर तुम्ही विकसनशील जगाचा प्रवास करत असाल, तर तुम्हाला दिसेल की गरिबी हे अनेक दुःखांचे कारण आहे आणि त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी 2007 मध्ये न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या एका दुर्मिळ मुलाखतीत सांगितले.
व्यवसायाद्वारे गरिबांना मदत करून, “आम्ही टोकाची भूमिका घेण्यापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे त्यांनी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रारंभिक जीवन
राजकुमार शाह करीम अल हुसैनी यांचा जन्म 13 डिसेंबर 1936 रोजी जिनेव्हा येथे झाला तर बालपण नैरोबी, केनिया येथे गेले.
नंतर ते स्वित्झर्लंडला परतले आणि हार्वर्ड येथे इस्लामिक इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाण्यापूर्वी विशेष ले रोझी शाळेत शिक्षण पूर्ण केले.
त्यांचे आजोबा, सर सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांचे 1957 मध्ये निधन झाल्यावर वयाच्या 20 व्या वर्षी शिया इस्लामची शाखा असलेल्या इस्माइली मुस्लिमांचे ते इमाम झाले.
त्यांच्या आजोबांनी आपल्या मुलाऐवजी करीम यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली-करीम यांचे वडील प्रिन्स अली खान- यांनी हॉलीवूड अभिनेत्री रीटा हेवर्थशी लग्न केले होते.
पैगंबर मोहम्मद यांचे थेट वंशज
आगा खान, तुर्की आणि पर्शियन शब्दांतून कमांडिंग चीफ असा अर्थ काढलेला असल्याने, इस्माइलिसांनी ते पैगंबरांचे चुलत भाऊ आणि जावई, अली, पहिले इमाम आणि त्यांची पत्नी फातिमा, पैगंबराची मुलगी यांच्याद्वारे पैगंबर मोहम्मद यांचे थेट वंशज असल्याचे मानले होते.
1830 च्या दशकात पर्शियाच्या सम्राटांनी करीम यांच्या पणजोबांना दिलेल्या पदवीचे ते चौथा धारक होता, जेव्हा त्यांनी सम्राटांच्या मुलीशी लग्न केले होते.
मध्य आशिया, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, उप-सहारा आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या इस्माइली समुदायाला दैवी मार्गदर्शन प्रदान करणे हे त्यांच्या भूमिकेमध्ये समाविष्ट होते.
शर्यतींवर असणारे प्रेम
मे 1960 मध्ये वडिलांच्या निधनानंतर आगा खान यांनी सुरुवातीला कुटुंबात असणारी शर्यतीसाठी लागणाऱ्या घोड्यांची पैदास आणि प्रजननाची दीर्घ परंपरा चालू ठेवायची की नाही यावर बराच विचार केला.
पण त्यानंतरच्या पहिल्या हंगामात फ्रेंच अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्यानंतर याची त्यांना भुरळ पडली.
2013 मध्ये व्हॅनिटी फेअरला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला ते आवडायला लागले होते.” “ते खूप रोमांचक आहे, त्यात सातत्याने एक आव्हान आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही बसता आणि प्रजननासाठी प्रयत्न करता तेव्हा तुम्ही निसर्गाशी बुद्धिबळाचा खेळ खेळत असता.”
त्यांच्या सी द स्टार्ससारख्या घोड्याने मोठे यश मिळवले. त्याने एप्सम डर्बी आणि 2000 वर्षीचे गिनी पारितोषिक जिंकले; याशिवाय सिंडर, याने त्याच वर्षी, एप्सम डर्बी, आयरिश डर्बी आणि प्रिक्स डी ल ‘आर्क डी ट्रायम्फदेखील जिंकले.
मात्र या सगळ्यांमध्ये त्यांचा सर्वात प्रसिद्ध घोडा शेरगर होता, ज्याने फेब्रुवारी 1983 मध्ये आयर्लंडच्या बालीमॅनी स्टड फार्ममधून अपहरण होण्यापूर्वी एप्सम डर्बी, आयरिश डर्बी आणि किंग जॉर्ज सारख्या स्पर्धा जिंकल्या होत्या.
अपहरणानंतर माफियांनी खंडणीची मागणी केली होती. या अपहरणामागे लिबियाचा माजी नेता मुअम्मर गद्दाफी आणि IRA संशयित म्हणून असावेत असे मानले जात होते. मात्र हे पैसे दिले गेले नाहीत आणि घोड्याचा कोणताही मागमूस नंतर कधीच लागला नाही.
द आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क
1967 मध्ये आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कची स्थापना झाली. 80 हजार लोकांना रोजगार देणाऱ्या या आंतरराष्ट्रीय विकास संस्था समूहाने शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी तसेच आफ्रिका आणि आशियातील गरीब भागांतील लाखो लोकांना वीज पुरवण्याचे काम केले.
त्यांनी त्यांचे या विकासाचे काम खाजगी व्यवसायाशी एकत्र केले. उदाहरणार्थ युगांडामध्ये त्यांची एक फार्मास्युटिकल कंपनी, एक बँक आणि एक फिशनेट कारखाना आहे.
फार कमी लोकांना आध्यात्मिक आणि भौतिक, पूर्व आणि पश्चिम, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यातील अनेक स्तरांवर असणारी विभागणी त्यांच्याइतकी सुंदरपणे जोडता येते,” असे व्हॅनिटी फेअरने आपल्या 2013 च्या लेखात लिहिले आहे.
त्यांचे दोनदा लग्न झाले. माजी ब्रिटिश मॉडेल सारा क्रोकर पूल यांच्याशी 1969 मध्ये त्यांचे पहिले लग्न झाले. या लग्नापासून त्यांना एक मुलगी आणि दोन मुले झाली. 1995 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला.
1998 मध्ये त्यांनी जर्मनमध्ये जन्मलेल्या गॅब्रिएल झु लेइनिंगनशी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. मात्र 2014 मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)