अमेरिकन रुग्णालये आणि जेनेरिक औषधनिर्मात्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चीनकडून येणाऱ्या वैद्यकीय गोष्टींवरील नवीन आयात शुल्कात सूट देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. अशा निर्णयामुळे व्यापारात अडथळे निर्माण होऊन अमेरिकेत औषधांची टंचाई आणि किंमती वाढतील असे म्हणणाऱ्या मोठ्या फार्मा लॉबिस्ट्सचच त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
रिपब्लिकन अध्यक्षांनी मंगळवारी अमेरिकेत आयात केलेल्या सर्व चिनी वस्तूंवर 10 टक्के कर लादले आणि चीनने स्वतःच्या लक्ष्यित शुल्कासह त्याला प्रतिसाद दिला.
ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडातील वस्तूंवरील 25 टक्के शुल्काची धमकी स्थगित केली आणि त्या देशांच्या नेत्यांशी बोलल्यानंतर 30 दिवसांच्या विरामास सहमती दर्शवली. ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला आपले पुढचे लक्ष्य ठरवले आहे.
अमेरिकन हॉस्पिटल असोसिएशनने मंगळवारी ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चीनकडून येणाऱ्या वैद्यकीय गोष्टींवरील आयात शुल्कामुळे कर्करोग आणि हृदयाच्या औषधांवर तसेच अमोक्सिसिलिनसारख्या प्रतिजैविकांवर परिणाम होईल.
अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, 1994 पासून अमेरिका आणि त्याचे प्रमुख व्यापारी भागीदार औषध उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या औषध उत्पादने आणि रसायनांसाठी आपसांतील शुल्क हटविण्यास सहमत झाले आहेत.
निर्बंधांच्या घोषणेच्या काही आठवडे आधी, नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्सशी बोलणारे चार लॉबिस्ट आणि एक फार्मास्युटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणाले की त्यांनी ट्रम्प प्रशासनावर त्यांच्या उत्पादनांना कोणत्याही शुल्कातून वगळले जाईल या आश्वासनासाठी दबाव आणला होता.
व्हाईट हाऊसने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
शुल्क जाहीर होण्यापूर्वी व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की कोणतीही सूट “अत्यंत दुर्मिळ आणि वारंवा देता येणार नाही ” अशी असेल.
चीनकडून महत्त्वपूर्ण घटकांचा पुरवठा
सुमारे 5 हजार अमेरिकी रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रणालींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॉस्पिटल लॉबिंग ग्रुपच्या म्हणण्यानुसार, गंभीर आजारांवरील औषधे तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे 30 टक्के कच्चे घटक चीनमधून येतात. डिस्पोजेबल फेस मास्कपैकी एक तृतीयांश आणि आरोग्यसेवेसाठी वापरले जाणारे जवळजवळ सर्व प्लास्टिकचे हातमोजेदेखील चीनमधून येतात, असे त्यात म्हटले आहे.
“देशांतर्गत पुरवठा साखळी तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असूनही, अमेरिकेची आरोग्य सेवा प्रणाली आंतरराष्ट्रीय स्रोतांवर लक्षणीयरीत्या अवलंबून आहे,” असे ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
द असोसिएशन फॉर एक्सेसिबल मेडिसिन्स या जेनेरिक औषधांच्या लॉबी गटाने सांगितले की, ते देखील कमी किमतीच्या औषधांच्या उत्पादकांच्या नफ्याचे प्रमाण आणि औषधांच्या कमतरतेच्या इतिहासाचा हवाला देत प्रशासनाला सूट देण्यास सांगत आहेत.
या समूहाचे धोरणविषयक क्षेत्रातील वरिष्ठ उपाध्यक्ष क्रेग बर्टन म्हणाले, “जेनेरिक्सवर दर लादल्याने ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण जेनेरिक्स औषधांमध्ये त्या खर्चांना सामावून घेण्याची मर्यादित संधी आहे.”
इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेत औषधांची किंमत जास्त आहे. अमेरिकेच्या व्यापार आकडेवारीनुसार, अमेरिकेने 2023 मध्ये परदेशातून 176 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त औषध उत्पादने आयात केली, ज्यापैकी सुमारे 6 अब्ज डॉलर्स चीनमधून आली. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या डेटाबेसनुसार, त्यात अमोक्सिसिलिन आणि पेनिसिलिनसह प्रतिजैविकांचा समावेश आहे.
मर्क ((MRK.N) ॲम्जेन (AMGN.O) आणि ब्रिस्टल-मायर्स (BMY.N) यांसह मोठ्या ब्रँडेड औषधनिर्मात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आठवड्यात सांगितले की, चीनकडून त्यांच्यावर आकारल्या जाणाऱ्या 10 टक्के शुल्काचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम होणार नाही.
अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, आयर्लंडने अमेरिकेला 41 अब्ज डॉलर्स किमतीची औषध आयात केली आहे. जर्मनी आणि स्वित्झर्लंड हे देखील अमेरिकेचे सर्वोच्च निर्यातदार आहेत.
जटिल जैविक औषधांच्या उत्पादनाचा पाया बनलेल्या युरोपवरील अमेरिकेचे दर जगातील मोठ्या औषधनिर्माण कंपन्यांसाठी अधिक चिंताजनक असतील, असे मॉर्निंगस्टारचे विश्लेषक कॅरेन अँडरसन यांनी म्हटले आहे.
अँडरसन म्हणाले, “हे खरे आहे की अनेक ब्रँडेड औषध कंपन्या आहेत ज्या चीनमधून सक्रिय घटक मिळवतात, परंतु जेव्हा तुम्ही मोठ्या, पायाभूत ब्लॉकबस्टर उत्पादनांचा विचार करता, तेव्हा त्यापैकी बहुतेक एकतर स्वतःहून किंवा अमेरिकन किंवा युरोपमधील भागीदारांद्वारे तयार केल्या जातात.”
“(नियामक) प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उत्पादन स्थळांना मंजुरी द्यावी लागेल आणि सर्व चाचणी बॅचेसवर सक्रिय घटक आणि शेल्फ लाइफच्या सुसंगततेसाठी देखरेख ठेवावी लागेल. हे सर्व अमेरिकेत हलवायला वेळ लागेल,” असे यू. बी. एस. फार्मास्युटिकल्सचे विश्लेषक ट्रुंग ह्युन्ह यांनी सांगितले.
फार्मास्युटिकल लॉबिंग ग्रुप PhRMAच्या म्हणण्यानुसार, नवीन फार्मास्युटिकल प्लांट तयार करण्यासाठी आणि तो अमेरिकन नियामक आवश्यकतांचे पालन करण्यासाठी 5 ते 10 वर्षे लागू शकतात.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)