सार्वजनिक हितासाठी आणि नागरिकांच्या उत्कर्षासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) एक ताकद म्हणून वापर करण्याकरिता प्रयत्नशील राहण्याचा भारताचा निर्धार आहे.
या वर्षाच्या अखेरीस पुढील AI ॲक्शन समिट आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X द्वारे, काही छायाचित्रे पोस्ट करून AI ॲक्शन समिटची एक झलक दिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “देश एकत्र येऊन AI च्या भविष्याची रूपरेषा तयार करत आहे. नावीण्यपूर्ण आणि सर्वसमावेशक परिवर्तन घडावे यासाठी सहयोग करत आहे.”
“आम्ही AI ला लोकांच्या हितासाठी, प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी एक ताकद बनवण्यासाठी काम करत राहू,” असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी, सध्या फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आमंत्रणावर, फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पॅरिसमधील ‘AI ॲक्शन समिट’ ही AI समिट्सच्या मालिकेतील तिसरी समिट आहे. गेल्यावर्षींच्या उन्हाळ्यात, सियोलमध्ये AI समिट आयोजित करण्यात आली होते.
पंतप्रधान मोदी यांच्या चालू दौऱ्याविषयी पत्रकारांना माहिती देताना, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “मी त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करेन, जे आज पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले आहे. ते म्हणाले की, AI तंत्रज्ञानाचा विकास संपूर्ण जगाच्या भल्यासाठी, उत्कर्षासाठी केला जाऊ शकतो आणि त्यासाठी सर्वांचा सहयोग आवश्यक आहे.”
मिस्री पुढे म्हणाले की, “आपल्या राष्ट्रीय AI मिशनद्वारे भारत जे योग्य आहे तेच करेल, आणि असे काहीच करणार नाही ज्यात आपल्याला भू-राजकारणामुळे पुढे जाऊन प्रभावित व्हावे लागेल. आमचा भर AI च्या सकारात्मक परिणामांवर आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ देण्यावर असेल.” “या समिटने भारत-फ्रान्सच्या वाढत्या धोरणात्मक भागीदारीमध्ये आणखी एक महत्वाचा पैलू जोडला आहे,” असेही मिस्री यावेळी म्हणाले.
MeitY (इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय) चे सचिव- एस. कृष्णन यांनी सांगितले की, “भारताने सार्वजनिक हितासाठी AI मध्ये योगदान देण्याचे वचन दिले आहे.”
त्यांनी सांगितले की, “या समिटचा दुसरा प्रमुख परिणाम म्हणजे, भारताच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत AI च्या कल्पनेचे समर्थन करणे.” “पर्यावरण आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी AI चे संरेखन सुनिश्चित करून, भारत शाश्वत AI वरच्या युतीमध्ये सामील झाला आहे,” असेही के म्हणाले.
एस. कृष्णन हे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, फ्रान्समधील भारताचे राजदूत संजीव सिंघला आणि परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिव (साइबर कूटनीती) अमित ए. शुक्ला, यांच्यासोबत मिडिया ब्रीफिंगला उपस्थित होते.
‘ग्लोबल साऊथसाठी भारताने काय केले आहे’, असा प्रश्न विचारल्यावर कृष्णन म्हणाले की, “भारताने G20 मध्ये AI ला केंद्रस्थानी आणले आणि G20 च्या घोषणापत्रात सर्वसमावेशक AI च्या विकासाबाबत काय काय करणे आवश्यक आहे, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.”
पुढे ते म्हणाले की, “त्या टप्प्यावर, आफ्रिकन युनियन आणि इतर विविध संस्थांना G20 मध्ये समाविष्ट केले गेले. त्यामुळे हे स्पष्ट होते की, आम्ही या विशेष क्षेत्रात ग्लोबल साऊथसाठी आवाज उठवत होतो. भारत ग्लोबल साऊथ सोबत, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या विस्तार आणि वापरावर खूप जवळून काम करत आहे.”
भारताच्या पुढील AI ॲक्शन समिट होस्ट करण्याच्या प्रस्तावावर, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, MeitY चे सचिव म्हणाले की, “त्यांचे मंत्रालय परराष्ट्र मंत्रालयासोबत काम करेल आणि देशांना या समिटसाठी निमंत्रित करेल, परंतु यामध्ये विशेषत: ग्लोबल साऊथमधील देशांना प्राधान्य दिले जाईल.”
“आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका येथील देशांकडून अधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असेही ते यावेळी म्हणाले.
कृष्णन म्हणाले की, “भारताने GPAI समिटसाठी ग्लोबल साऊथमधील अनेक देशांना निमंत्रित केले होते आणि पुढील समिटमध्ये, जी भारत होस्ट करेल, त्यावेळी ते ग्लोबल साऊथचे योग्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करतील.”
ते म्हणाले की, “फ्रान्समधील समिट ही फक्त भारत आणि ग्लोबल साऊथसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी खूप सकारात्मक परिणामांचे प्रतिनिधित्व करते. आम्हाला विश्वास आहे की, यामुळे AI च्या विकासाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचे संतुलन साधले जात आहे. म्हणूनच, आता भारतासाठी होस्टिंगची योग्य वेळ आली आहे असे म्हणता येईल. याबाबत पंतप्रधानांनी प्रस्ताव ठेवला आणि त्याला मान्यता देखील मिळाली. भारत होस्ट करणार असलेली ही AI समिट. भारतामध्ये या वर्षाच्या अखेरीस होईल.”
“2023 मध्ये, भारताने ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GPAI) चे अध्यक्षपद सांभाळले. पंतप्रधान मोदींनी जोर देऊन सांगितले की, GPAI चे सदस्यत्व विस्तारले पाहिजे.”
“आम्ही विश्वास ठेवतो की, AI च्या सकारात्मक फायद्यांचा वापर करण्यासाठी जागतिक स्तरावर सहयोग करण्याच्या शक्यतांचा उपयोग होईल आणि आम्हाला इतर देशांचा सहभाग देखील आवश्यक आहे.”
परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले की, “या भेटीदरम्यान, AI क्षेत्रात द्विपक्षीय वितरीत कार्य देखील होईल.”
सायबर सुरक्षा आणि दीपफेक संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कृष्णन म्हणाले की, “भारतीय कायद्यांमध्ये दीपफेक आणि चुकीची माहिती यावर कारवाई करण्यासाठी विविध तरतुदी आहेत. Deepfake मुख्य समस्या म्हणजे तंत्रज्ञान सतत सुधारत आहे, ज्यामुळे शोधण्यात काही विलंब होतो. म्हणूनच, आम्हाला सर्वोत्तम तंत्रज्ञान लवकरात लवकर स्वीकारायचं आहे, जेणेकरून शोधण्यास सोपे जाईल.”
“व्यक्तिगत डेटा कसा वापरला जाऊ शकतो, हा प्रश्न डिजिटल पर्सनल डेटा प्रायव्हसी प्रोटेक्शन एक्टद्वारे हाताळला जात आहे,” असेही त्यांना सांगितले.
MeitY चे सचिव म्हणाले की, “भारताला नाविण्यपूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, कारण AI कडून त्याला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो.”
फ्रान्ससोबतच्या DPI सहयोगाबाबत ते म्हणाले की, “भारत जगभरातील अशा सहयोगांचे स्वागत करतो. आम्ही विश्वास ठेवतो की, भारताने ऑफर केलेले DPI फक्त ग्लोबल साऊथच्या विकासशील देशांसाठीच नाही, तर ते इतर विकासशील देशांमध्ये देखील लागू होऊ शकतात. भारतात विकसित केलेले अनुप्रयोग, ज्यात UPI आणि DigiLocker समाविष्ट आहेत, हे युरोपीय संदर्भात देखील खूप उपयुक्त ठरू शकतात.”
ते म्हणाले की, “भारताचे AI ॲक्शन समिटच्या यशातील योगदान ‘खूप महत्त्वपूर्ण’ आहे.” भारत-आधारित चॅटबॉट्सबाबत काय केले जात आहे, या प्रश्नाचे उत्तर देत ते म्हणाले की, “आम्ही शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये आधीच अनेक चॅटबॉट्सचा नियमीत वापर करत आहोत.”