किम जोंग उनने आण्विक हल्ल्याच्या तयारीचे दिले आदेश

0
किम
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन याचा फाइल फोटो

उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उन याने सामरिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणी-प्रक्षेपणाचे निरीक्षण केले आणि आण्विक हल्ल्याची क्षमता वापरण्यासाठी पूर्ण तयारीचे आदेश दिले आहेत. यामुळे देशासाठी सर्वात प्रभावी संरक्षण सुनिश्चित होईल.

केसीएनए वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, ही चाचणी “शत्रूंना इशारा देण्यासाठी तयार करण्यात आली होती, जे (देशाच्या) सुरक्षा वातावरणाचे गंभीर उल्लंघन करीत आहेत आणि संघर्षाचे वातावरण जोपासत आहेत, वाढवत आहेत” आणि “त्याच्या विविध आण्विक कामगिऱ्यांच्यासाठी झालेली तयारी दाखवून देण्यासाठी” तयार करण्यात आली होती.

केसीएनएने किमच्या हवाल्याने म्हटले आहे की, “शक्तिशाली प्रहार क्षमतेद्वारे ज्याची हमी दिली जाते ती सर्वात परिपूर्ण प्रतिबंध आणि संरक्षण क्षमता आहे.”

“आण्विक शक्तीची अधिक सखोल लढाऊ तयारी आणि त्यांच्या वापरासाठी पूर्ण तयारी करून विश्वासार्ह आण्विक कवचासह राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षिततेचे कायमचे रक्षण करणे हे उत्तर कोरियाच्या आण्विक सशस्त्र दलांचे जबाबदार ध्येय आणि कर्तव्य आहे.”

हे क्षेपणास्त्र बुधवारी कोरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले.

अण्वस्त्रे वितरीत करण्याच्या उद्देशाने उत्तर कोरियाने अनेक वर्षांपासून धोरणात्मक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या विकासाचा पाठपुरावा केला आहे.

क्षेपणास्त्राच्या या प्रकारावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कमी धोक्याचा इशारा दिला जातो  तसेच यांच्या वापराबाबत फारसा निषेध नोंदवला जात नाही कारण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार त्यांच्यावर औपचारिकपणे बंदी नाही.

सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रे विकसित करण्यावर बंदी घातली असून याचे उल्लंघन केल्याबद्दल अनेक निर्बंध लादले आहेत.

क्षेपणास्त्र चाचणीचा अहवाल ज्या आठवड्यात आला होता त्याच आठवड्यात किमने लष्करी प्रशिक्षण संस्थांना परत एकदा भेटी दिल्या होत्या. त्यावेळी निष्ठा आणि तरुण लष्करी अधिकाऱ्यांच्या वैचारिक आणि रणनीतिक प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले होते.

किम यांनी शत्रूंना इशारा देताना कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही, परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे जाहीर करूनही त्यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या विरोधात कठोर वक्तव्ये केली आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प आणि किम यांच्यात अभूतपूर्व शिखर बैठका झाल्या होत्या.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)

 


Spread the love
Previous articleउत्तर कोरियाचे अतिरिक्त सैन्य रशियात दाखल – सेऊल गुप्तहेर संस्था
Next articleतुर्की – पीकेकेचा 40 वर्षांचा संघर्ष ओकलानच्या शांतता याचिकेमुळे संपणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here