इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी नागरिकाच्या कार हल्ल्यात 13 जण जखमी

0
जखमी
इस्रायलमध्ये एका पॅलेस्टिनी व्यक्तीने केलेल्या कार हल्ल्यात 13 जण जखमी झाले. (प्रातिनिधिक छायाचित्र सौजन्यः अनस्प्लॅश)

इस्रायलच्या उत्तरेकडील परदेस-हन्ना-कारकूर शहराजवळील कारकुर जंक्शन येथील बस स्टॉपवर एका पॅलेस्टिनी नागरिकाने गुरुवारी केलेल्या कार हल्ल्यात किमान 13 लोक जखमी झाले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या एका किशोरवयीन मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

संशयित हल्लेखोर वेस्ट बँकच्या जेनिन भागातील पॅलेस्टिनी रहिवासी असून तो आपल्या अरब इस्रायली पत्नीसह बेकायदेशीरपणे इस्रायलमध्ये राहत होता. सुरुवातीच्या हल्ल्याच्या घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवर त्याने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले, असे पोलीस प्रमुख डॅनियल लेव्ही यांनी टाइम्स ऑफ इस्रायलला सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, पोलिस सध्या कारकूर जंक्शनवरील हल्ल्याचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी द टाइम्स ऑफ इस्रायलला सांगितले की, या हल्ल्यात 17 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या हाडेरा येथील हिलेल याफे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

हाडेरा येथील हिलेल याफे मेडिकल सेंटरने जेरुसलेम पोस्टला सांगितले की त्यांच्या इथे एकजण चिंताजनक, दोन गंभीर तर तीन मध्यम स्थितीतील जखमींना दाखल करण्यात आले आहे.

इस्रायल पोलिसांच्या प्रवक्त्याने वृत्तपत्राला सांगितले: “हल्लेखोर बस स्थानकावर असलेल्या अनेक प्रवाशांवर धावून गेला, नंतर स्क्रू ड्रायव्हरने त्याने इतरांवर वार केला आणि मग तो पोलिसांच्या वाहनावर धडकला.”

संशयिताची ओळख पटली

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, 53 वर्षीय संशयिताचे जमील झायूद असे नाव आहे.

द टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, मूळचा जेनिनचा रहिवासी असणारा जमील त्याच्या अरब इस्रायली पत्नीसोबत माले आयर्नमध्ये बेकायदेशीरपणे राहत होता.

हमासने केले हल्ल्याचे कौतुक

पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने या हल्ल्याचे कौतुक केले.

फर्स्टपोस्टने या गटाच्या हवाल्याने म्हटले आहे की, “हडेरा जवळील कर्कूर भागात आज दुपारी झालेली चकमक आणि हा हल्ला ही ताब्यात घेतलेल्या वेस्ट बँकमध्ये, विशेषतः त्याच्या उत्तरेकडील गव्हर्नरेटमध्ये, आणि यहुदीकरण मोहिमा आणि अल-अक्सा मशीद, इब्राहिमी मशीद आणि आपल्या इस्लामिक पवित्र स्थानांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांवर झालेल्या क्रूर आक्रमणाचा आणि सुरू असलेल्या गुन्ह्यांचा एक नैसर्गिक, शूर प्रतिसाद आहे.”

तीन रिकाम्या बसेसमध्ये स्फोट

इस्रायलच्या बॅट याम शहरात अलीकडेच किमान तीन रिकाम्या बसेसमध्ये स्फोट झाले. पोलिसांनी या घटनेचे संभाव्य दहशतवादी हल्ला म्हणून वर्णन केले. हे शहर तेल अवीव शहराच्या दक्षिणेस स्थित आहे.

पोलिसांनी सांगितले की, इतर दोन बसमध्ये जोडलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊ शकला नाही. स्फोट झाला तेव्हा बसेस पार्किंगमध्ये उभ्या होत्या.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleNorth Korea’s Kim Orders Nuclear Readiness After Missile Test
Next articleFormer U.S. Defence Secretaries Condemn Trump’s “Reckless” Military Purge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here