एलसीए तेजससाठी आयएलएसएसच्या सर्वोच्च उंचीवरील चाचण्या यशस्वी

0
एलसीए
एलसीए तेजससाठी आयएलएसएसच्या सर्वोच्च उंचीवरील चाचण्यांचे डीआरडीओकडून यशस्वी आयोजन (छायाचित्र सौजन्यः पीआरओ नागपूर, संरक्षण मंत्रालय एक्सवरून)

 

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) अंतर्गत बंगळुरू येथील डिफेन्स बायो-इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटरीने (डीईबीईएल) मंगळवारी एलसीए तेजस विमानासाठी स्वदेशी ऑन-बोर्ड ऑक्सिजन जनरेटिंग सिस्टमवर (ओबीओजीएस) आधारित इंटिग्रेटेड लाइफ सपोर्ट सिस्टमच्या (आयएलएसएस) सर्वोच्च उंचीवरील चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या.

OBOGS वर आधारित आयएलएसएस ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे जी उड्डाणादरम्यान वैमानिकांसाठी श्वास घेण्याजोगा ऑक्सिजन तयार करणे आणि तो नियंत्रित करणे यासाठी तयार केली गेली आहे, ज्यामुळे पारंपारिक द्रवरूप ऑक्सिजन सिलेंडर-आधारित प्रणालींवरील अवलंबित्व दूर होईल.

कठोर चाचण्या

आयएलएसएसने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)/एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या (एडीए) एलसीए-प्रोटोटाइप व्हेईकल-3 विमानावर कठोर चाचणी घेतली, ज्यात सरासरी समुद्रसपाटीपासून 50 हजार फूट उंची आणि high-G manoeuvres सह विविध उड्डाण परिस्थितींमध्ये कठोर एरोमेडिकल मानकांची पूर्तता करण्यात आली.

कामगिरीच्या परीक्षणांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण, श्वासोच्छवासाची मागणी, ऑक्सिजनची उपलब्धता, अँटी-जी व्हॉल्व्हच्या पूर्ण कार्यक्षम चाचणीसाठी आवश्यक उंचीवर aerobatic manoeuvres, उड्डाणादरम्यान श्वासोच्छवास ऑक्सिजन प्रणाली (बीओएस) सुरू करणे, उड्डाण, क्रूझ, जी टर्न्स आणि रिजॉईन तसेच लँडिंग यासारख्या महत्त्वपूर्ण पैलूंचा समावेश होता. सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्दीनेस अँड सर्टिफिकेशन (सीईएमआयएलएसी) कडून उड्डाणासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, प्रणालीने सर्व निर्दिष्ट निकषांची यशस्वीरित्या पूर्तता केली,” असे भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ओबीओजीएसच्या पलीकडे, आयएलएसएसमध्ये कमी दाब श्वसन नियंत्रक, बीओएस, आपत्कालीन ऑक्सिजन प्रणाली, ऑक्सिजन संवेदक, अँटी-जी व्हॉल्व आणि इतर प्रगत घटकांसह 10 बदलण्यायोग्य घटक एकत्रित केले जातात. यामुळे प्रत्यक्ष-वेळेत ऑक्सिजन निर्मिती सुनिश्चित होईल, पायलटची सहनशक्ती आणि कार्यात्मक परिणामकारकता वाढेल.

डीआरडीओ आणि भारतीय संरक्षण उद्योगांमधील महत्त्वपूर्ण सहकार्य प्रतिबिंबित करणारी ही प्रणाली एल अँड टीने विकास उत्पादन भागीदार म्हणून तयार केली आहे.

विशेष म्हणजे, आयएलएसएसमध्ये 90 टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे एरोस्पेस तंत्रज्ञानामध्ये भारताचे स्वावलंबन वाढले आहे.

योग्य बदलांसह, ही प्रणाली मिग-29के आणि इतर विमानांमध्ये वापरण्यासाठी देखील स्वीकारली जाऊ शकते.

DEBEL, ADA, HAL, CEMILAC, नॅशनल फ्लाइट टेस्ट सेंटर, डायरेक्टोरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वालिटी अश्युरन्स आणि भारतीय हवाई दल (आयएएफ) यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा टप्पा गाठण्यात आला आहे.

संरक्षणमंत्र्यांनी केले अभिनंदन

एलसीए तेजसच्या आयएलएसएसच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, आयएएफ, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उद्योगातील भागीदारांचे अभिनंदन केले. हा विकास अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाप्रती भारताची बांधिलकी बळकट करतो आणि ‘विकसित भारत 2047’ च्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे यावर त्यांनी भर दिला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleEvolving Dynamics Of Aerospace Power
Next articleDRDO Successfully Trials Life-Support System For Tejas Pilots

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here