आरटीएक्सची उपकंपनी असलेली अमेरिकन वैमानिक आणि संरक्षण उपकरणे बनवणारी कंपनी कॉलिन्स एरोस्पेसच्या बंगळुरू येथे नवीन अभियांत्रिकी विकास आणि चाचणी केंद्राचे (ईडीटीसी) नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. भारताच्या एरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचे ते प्रतीक असल्याचे म्हटले जाते. अंतराळ प्रणालीची चाचणी घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि कामगिरी मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी या सुविधेची रचना करण्यात आली आहे.
अत्याधुनिक चाचणी क्षमतांनी सुसज्ज, ईडीटीसी high altitudes, intense vibrations, electromagnetic interference, and extreme temperatures अशा विमानचलनासाठी आवश्यक परिस्थितीचे simulate करू शकते, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.
कॉलिन्स एरोस्पेस येथील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे वरिष्ठ उपाध्यक्ष क्ले लिंडवाल यांनी सांगितले की हे केंद्र सुरुवातीला एव्हिओनिक्स, प्रगत संरचना, अंतर्गत आणि ऊर्जा तसेच नियंत्रण प्रणालींच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करेल. कालांतराने, या सुविधेच्या सेवा सर्व आरटीएक्स व्यवसायांना आधार देण्यासाठी विस्तारल्या जातील, ज्यामुळे एरोस्पेस आणि संरक्षण अनुप्रयोगांमध्ये त्यांची भूमिका विस्तृत होईल.
जागतिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्रांचे उपाध्यक्ष सव्यसाची श्रीनिवास म्हणाले, “ही गुंतवणूक प्रगत चाचणी क्षमता अभियांत्रिकी आणि उत्पादन होणाऱ्या ठिकाणांना जवळ आणते आणि जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करते.
कॉलिन्स एरोस्पेस हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) सक्रिय सहकार्य करत असून त्यांची उपकरणे तेजाससह विविध लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्समध्ये वापरली गेली आहेत. याव्यतिरिक्त, कंपनी प्रगत मध्यम लढाऊ विमान (ॲमका) प्रकल्पाबाबत एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीशी चर्चा करत आहे.
अभियांत्रिकी, डिजिटल, उत्पादन, कामगिरी आणि पुरवठा साखळी कार्यांमध्ये भारतात 6 हजारांहून अधिक कर्मचारी असलेले कॉलिन्स एरोस्पेस आपल्या footprint चा विस्तार करत आहे. ईडीटीसीमुळे कंपनीच्या जागतिक जाळ्यामध्ये एरोस्पेस नवनिर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होणे अपेक्षित आहे.
टीम भारतशक्ती