DRDO, IAF ने केली अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय हवाई दलाने (IAF) 11 जुलै 2025 रोजी स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) सीकरने सुसज्ज  स्वदेशी बनावटीच्या दृष्टी टप्प्याच्या पलिकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या  (BVRAAM) ‘अस्त्र’ ची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. ओदिशाच्या किनारपट्टीवर सुखोई-30 एमके-I प्लॅटफॉर्मवरून ही चाचणी घेण्यात आली.अस्त्र बीव्हीआरएएमची मारक क्षमता 100 किमीपेक्षा जास्त आहे आणि ती अत्याधुनिक मार्गदर्शन आणि नेव्हिगेशन प्रणाली बरोबरच उच्च अचूकता आणि स्वायत्त लक्ष्य संलग्नता सक्षम करण्यासाठी  सुसज्ज आहे.

स्वदेशी RF शोधक, सक्रिय रडार-मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा एक महत्त्वाचा घटक, क्षेपणास्त्राला त्याच्या स्वतःच्या उत्सर्जित रेडिओ लहरींचा वापर करून लक्ष्य शोधणे, मागोवा घेणे आणि लक्ष्य गाठणे शक्य करते. ही “fire-and-forget” क्षमता क्षेपणास्त्राला प्रक्षेपण विमानाकडून पुढील माहिती न देता प्रक्षेपणानंतर स्वतःला मार्गदर्शन करण्यास अनुमती देते.

चाचण्यांमध्ये, वेगवेगळे अंतर , लक्ष्य संबंधित पैलू आणि प्रक्षेपण प्लॅटफॉर्म परिस्थितीवर उच्च गतीच्या मानवरहित हवाई लक्ष्यांवर दोन प्रक्षेपणे करण्यात आली. दोन्ही प्रक्षेपणांमध्ये , क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूकतेने लक्ष्ये नष्ट केली.

“चाचण्यांदरम्यान, सर्व उपप्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली, ज्यामध्ये डीआरडीओच्या स्वदेशी बनावटीच्या आणि विकसित केलेल्या आरएफ सीकरचा समावेश होता,” असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजने  तैनात केलेल्या रेंज ट्रॅकिंग उपकरणांमधून प्राप्त डेटाद्वारे ‘अस्त्र’ शस्त्रास्त्रे प्रणालीची निर्दोष कामगिरी सत्यापित करण्यात आली. या यशस्वी उड्डाण चाचण्यांमुळे स्वदेशी सीकरसह अस्त्र शस्त्रास्त्रे प्रणालीची अचूकता आणि विश्वसनीयता  पुन्हा सिद्ध झाली आहे.

स्वदेशी सीकरसह क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही प्रमुख संरक्षण तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. DRDO च्या विविध प्रयोगशाळांव्यतिरिक्त, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसह 50 हून अधिक सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांनी या शस्त्रास्त्र प्रणालीच्या यशस्वी निर्मितीत योगदान दिले आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleNSA Ajit Doval Slams Foreign Media Over Operation Sindoor Coverage: ‘Show Us One Image of Indian Damage’
Next article‘ऑपरेशन सिंदूर’वरून NSA डोवाल यांची परदेशी माध्यमांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here