चीनवर पावसाची वक्रदृष्टी; प्रतिकूल हवामानाने घेतला निष्पाप नागरिकांचा बळी

0

चीनची राजधानी बीजिंगजवळील चेंगदे शहरात, प्रतिकूल हवामानाने अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गेला आठवडाभर सातत्याने सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली, ज्यामध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झाला, तर 18 जण अद्याप बेपत्ता आहेत.

हे सर्व मृत्यू, हेबेई प्रांतातील चेंगदेच्या शिगलाँग भागातील गावांमध्ये झाले असल्याचे, सरकारी वृत्तसंस्था Xinhua ने  स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले. मात्र मृत्यू नेमके कधी व कशामुळे झाले, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

बेपत्ता व्यक्तींचा शोध अजूनही सुरू असल्याचे, Xinhua ने स्पष्ट केले आहे.

डोंगराळ भागांमध्ये वसलेले चेंगदे शहर, हे पूर्वीच्या Qing राजवटीतील सम्राटांसाठी बनवण्यात आले होते, जे उन्हाळ्यात बीजिंगच्या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठीचे एक प्रसिद्ध विश्रांतीस्थळ होते.

गेल्या बुधवारपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे, बीजिंग आणि आसपासच्या भागांना जोरदार फटका बसला असून, काही भागांमध्ये एक वर्षाच्या पावसाइतका पाऊस एका आठवड्यातच पडला आहे. अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरामुळे बीजिंगच्या उपनगरांमध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, ज्यापैकी 28 मृत्यू हे मियुन जिल्ह्यात झाले.

चेंगदेतील मृत्यूही त्या गावांमध्ये झाले आहेत, जे मियुनच्या सीमेलगत आहेत आणि मियुन जलाशयापासून सुमारे 25 किमी (16 मैल) अंतरावर आहेत. हा जलाशय चीनच्या उत्तर भागातील सर्वात मोठा जलाशय मानला जातो.

विक्रमी पावसामुळे जलाशयावर परिणाम

या अतिवृष्टीच्या काळात जलाशयात पाण्याची विक्रमी नोंद झाली आहे, वाहत्या पाण्याची तीव्रता आणि पाण्याची पातळी सर्वाधिक प्रमाणात वाढली असल्याचे नोंदवले गेले आहे, ज्यामुळे आसपासची गावे अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत.

रविवारी, दर सेकंदाला 6,550 घन मीटर पाणी म्हणजे जवळपास 2.5 ऑलिम्पिक आकाराचे जलसाठे, मूळ जलाशयात प्रवेश करत होते. यामुळे जलाशयाची क्षमता वाढून 3.63 अब्ज घन मीटर झाली, जी 1960 पासून आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे.

जलाशयाच्या उत्तरेला असलेल्या एका दुसऱ्या गावात, सोमवारी झालेल्या भूस्खलनात आणखी 8 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण अद्याप बेपत्ता आहेत.

हवामान बदलांमुळे होणारी अतिवृष्टी आणि उद्भवणारी तीव्र पूरस्थिती ही चिनी धोरणकर्त्यांसाठी (policymakers) मोठ्या प्रमाणात मोठी आव्हाने उभी करत आहे, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. काही हवामान अधिकाऱ्यांनी तर, कारखान्यांमधील कामांची गती कमी होण्यास देखील मुसळधार पाऊस आणि पूर हे अंशतः कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleटॅरिफवरून ट्रम्प यांचा आक्रस्ताळेपणा तर भारताची सावध भूमिका
Next articleA Possible Way Out of India’s Submarine Acquisition Conundrum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here