सर्वेक्षण वर्गातील तिसरे मोठे जहाज ‘Ikshak’, भारतीय नौदलाकडे सुपूर्द

0

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) ने, ‘Ikshak’ हे सर्वेक्षण वर्गातील तिसरे मोठे जहाज भारतीय नौदलाला सुपूर्द केले आहे. हे जहाज नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डिझाईन केलेले आणि GRSE च्या कोलकाता येथील शिपयार्डमध्ये तयार करण्यात आलेले 102वी युद्धनौका आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, ‘इक्षक’ची सुपूर्तता हार्बर आणि समुद्र चाचण्यांनंतर करण्यात आली.

30 ऑक्टोबर 2018 रोजी, SVL प्रकल्प करारबद्ध करण्यात आला होता आणि त्याअंतर्गत एकूण चार जहाजांचा समावेश आहे. यातील पहिले दोन जहाजे – INS संध्यायक आणि INS निर्देशक, अनुक्रमे 3 फेब्रुवारी 2024 आणि 18 डिसेंबर 2024 रोजी सेवेत दाखल झाली आहेत. चौथे जहाज सध्या बांधणीच्या प्रक्रियेत आहे.

‘Ikshak’चे वजन सुमारे 3,400 टन असून एकूण लांबी 110 मीटर आहे. हे जहाज अत्याधुनिक हायड्रोग्राफिक आणि ओशनोग्राफिक सर्व्हे प्रणालींनी सज्ज आहे. ज्यामध्ये: डेटा संग्रहण व प्रक्रिया प्रणाली (Data Acquisition and Processing System), ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल (AUV), रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल (ROV), DGPS- दीर्घ पल्ल्याचे पोझिशनिंग सिस्टम आणि डिजिटल साइड-स्कॅन सोनार सिस्टम, या सर्व प्रणालींचा समावेश आहे.

हे जहाज किनारपट्टीपासून खोल समुद्रात संपूर्ण हायड्रोग्राफिक सर्व्हे करण्यास सक्षम आहे. तसेच, बंदरे, हार्बर मार्गांचे नकाशे तयार करणे, नौवहन मार्ग निश्चित करणे, आणि संरक्षण तसेच नागरी क्षेत्रांसाठी समुद्र वैज्ञानिक आणि भू-भौगोलिक डेटा गोळा करणे यासाठीही हे उपयुक्त आहे.

‘Ikshak’ हे दोन डिझेल इंजिन्सद्वारे संचालित होते आणि 18 नॉट्सपेक्षा जास्त गती गाठू शकते. जहाजात 80% पेक्षा जास्त स्वदेशी तांत्रिक घटक (cost अनुसार) वापरण्यात आले आहेत, जे आत्मनिर्भर भारत या उपक्रमाशी सुसंगत आहे. विशेष म्हणजे, महिला अधिकारी आणि महिला नौसैनिकांसाठी निवास व्यवस्था असलेले हे पहिले SVL जहाज आहे.

‘इक्षक’ जहाजाचे लाँचिंग 6 ऑगस्ट 2021 रोजी ठेवण्यात आले होते आणि 26 नोव्हेंबर 2022 रोजी हे जलप्रवेशासाठी लाँच करण्यात आले होते. त्याची यशस्वी सुपूर्तता GRSE, वॉरशिप ओव्हरसींग टीम (कोलकाता), भारतीय उद्योग आणि असंख्य MSMEs यांचे संयुक्त योगदान दर्शवते, ज्यामुळे भारतीय महासागर क्षेत्रात भारताची सागरी क्षमता बळकट होत आहे.

याव्यतिरिक्त, आगामी काळात भारतीय नौदलासाठी आणखी 14 युद्धनौकांची बांधणी करण्यात येणार आहे, ज्यामध्ये: 2 P17A अ‍ॅडव्हान्स्ड गाईडेड मिसाइल फ्रिगेट्स, 1 SVL, 7 अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट्स आणि 4 नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स (NGOPVs) यांचा समावेश आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारताचा सिंधू नदी कराराच्या (Indus Treaty) निर्णयाला साफ नकार
Next articleऑपरेशन सिंदूर: शौर्य पुरस्काराने पाक सैनिकांच्या मृत्यूचा आकडा उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here