तिबेट वर्धापन दिनी लॉकडाऊन, ल्हासात जिनपिंगनी केले मेगा-डॅमचे कौतुक

0

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बुधवारी तिबेट स्वायत्त प्रदेशच्या (TAR) 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी सीमाबंदी केलेल्या तिबेटची राजधानी ल्हासा येथे पोहोचले.

 

राज्य माध्यमांनी या भेटीचे स्वागत समृद्धी आणि प्रगतीचा उत्सव म्हणून केले. निर्वासित गट आणि परदेशी माध्यमांनी लष्कराकडून करण्यात आलेला लॉकडाऊन असे वर्णन केले, जिथे “बळकावलेल्या जमिनीवर उत्सव साजरा होत नाही – ती गुपचूप सहन करते.”

2021 च्या दौऱ्यानंतर, राष्ट्राध्यक्ष म्हणून शी यांचा तिबेटचा हा दुसरा दौरा होता. शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, लाल झेंडे आणि फुले घेऊन “उत्सवपूर्ण पारंपरिक पोशाखातील लोकांनी” ल्हासा कोंगगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते वांग हुनिंग आणि कै ची यांच्यासह “स्नोई पठार प्रदेशातील आनंदी गाणी” नावाच्या एका उत्सवात भाग घेतला.

गुरुवारी सकाळी, ते राज्य माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपित केलेल्या TAR च्या स्थापनेच्या स्मरणार्थ शहरात एका भव्य मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

निर्वासित गटांनी दिलेल्या वृत्तानुसार शी यांच्या आगमनाचे अगदी वेगळेच चित्र रेखाटले. व्हॉईस ऑफ तिबेटने व्यापक निर्बंधांची नोंद केली ज्यात पीपल्स लिबरेशन आर्मीची दिसून येणारी मोठी उपस्थिती, शहरभर उभारण्यात आलेल्या चौक्या आणि उड्डाणे, क्रीडा कार्यक्रम, फुगे आणि अगदी पतंग उडवणाऱ्यावरही घातलेली बंदी. एक तिबेटी निर्वासित नेते भूचुंग त्सेरिंग एक्सवर म्हणाले की शी “सीसीपीच्या अंतर्गत त्यांचे जीवन किती भव्य झाले आहे हे तिबेटी लोकांना सांगण्यासाठी आले होते”, परंतु लष्करी दडपशाहीने काही वेगळीच कथा सांगितली.

परदेशी माध्यमांच्या नोंदीनुसार तिबेटमध्ये अजूनही परदेशी पत्रकार आणि बाहेरील लोकांसाठी प्रवेश जवळजवळ बंद आहे. हालचाली, देखरेख आणि सार्वजनिक अभिव्यक्तीवरील कडक नियंत्रणावरील निर्बंध हे टीकाकार “वर्धापनदिन” स्वायत्ततेचा उत्सव म्हणून नव्हे तर नियंत्रणाचे प्रदर्शन म्हणून का पाहतात हे अधोरेखित करणारे आहे.

शिन्हुआने शी यांचे म्हणणे उद्धृत केले की तिबेटने “राजकीय स्थिरता, सामाजिक सुव्यवस्था, वांशिक एकता आणि धार्मिक सुसंवाद राखला पाहिजे”. त्यांनी या प्रदेशाला “एकजूट, समृद्ध, सुसंस्कृत, सुसंवादी आणि सुंदर” असा आधुनिक समाजवादी तिबेट उभारण्याचे आवाहन केले, तसेच शेती, पर्यटन, स्वच्छ ऊर्जा आणि सांस्कृतिक एकात्मता वाढवली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

शी यांच्या संदेशाचा केंद्रबिंदू मेगा-प्रकल्पांद्वारे होणारा विकास होता. ब्लूमबर्गने वृत्त दिले की त्यांनी 1.2  ट्रिलियन युआन यारलुंग त्सांगपो जलविद्युत धरण आणि सिचुआन-तिबेट रेल्वेचा उल्लेख केला आणि अधिकाऱ्यांना “शक्ती, सुव्यवस्था आणि कार्यक्षमतेने” पुढे नेण्याचे निर्देश दिले.

सध्या बांधकाम सुरू असलेला जलविद्युत प्रकल्प इतिहासातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा उपक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. ब्लूमबर्गने नमूद केले की त्यासाठी हूवर धरणाच्या 60 पट सिमेंट आणि 116 एम्पायर स्टेट बिल्डिंग्सना लागणाऱ्या स्टीलपेक्षा जास्त स्टीलची आवश्यकता असेल, ज्याचे बांधकाम किमान एक दशकभर चालेल अशी अपेक्षा आहे. चीनच्या कार्बन कमी करण्याच्या उद्दिष्टांचा एक भाग म्हणून आणि आशियातील “वॉटर टॉवर” वापरण्याचा एक मार्ग म्हणून बीजिंग याचे प्रमोशन करत आहे.

1951 मध्ये तिबेटवर ताबा मिळवणे ही “शांततापूर्ण मुक्तता” असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चौदा वर्षांनंतर, 1965 मध्ये, TAR औपचारिकपणे चीनचा पाचवा आणि शेवटचा स्वायत्त प्रदेश म्हणून स्थापित झाला. शिन्हुआच्या भाष्यात गेल्या सहा दशकांना “चमत्कारिक मानवी विकास” असे म्हटले आहे, ज्यामध्ये 1965 च्या तुलनेत 155 पट जास्त GDP वाढ, निरपेक्ष गरिबीचे निर्मूलन आणि 1950 च्या दशकात 35.5 वर्षांवरून 72.5 पर्यंत आयुर्मान वाढल्याचे नमूद केले आहे.

परंतु परदेशी माध्यमांनी आठवण करून दिली की तिबेटचा आधुनिक इतिहास वेगळीच गोष्ट सांगतो. 1959 मध्ये एका अयशस्वी उठावानंतर 14 वे दलाई लामा भारतात निर्वासित म्हणून आश्रयाला आले. तेव्हापासून, निर्वासित आणि अधिकार गटांनी बीजिंगच्या राजवटीचे वर्णन “जुलमी” असे केले आहे.

2008 मध्ये पुरुष आणि महिला भिक्षूंनी काढलेल्या आणि नंतर चिरडून टाकलेल्या निदर्शनांपासून दडपशाही अधिक पद्धतशीर झाली आहे यावरही परदेशी माध्यमांनी भर दिला. त्यानंतरच्या वर्षांत आत्मदहनाची लाट आली, निर्बंध आणखी कडक झाले आणि तिबेट बाह्य तपासणीसाठी जवळजवळ पूर्णपणे बंद झाले.

तिबेटमधील धार्मिक जीवनावर देखील पक्षाची देखरेख आहे. शी यांनी तिबेटी बौद्ध धर्माने “चीनच्या समाजवादी व्यवस्थेशी जुळवून घेतले पाहिजे,”  याचा पुनरुच्चार केल्याचे वृत्त परदेशी माध्यमांनी दिले. तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च गुरु दलाई लामा यांच्या जागी नव्या दलाई लामांची नियुक्ती करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, जे 90 व्या वर्षीदेखील भारतात निर्वासित जीवन जगत आहेत. टीकाकारांचे म्हणणे आहे की धर्माला राजकारणाच्या अधीन करण्याच्या राज्याच्या दृढनिश्चयाचे हे  उदाहरण आहे.

दरम्यान, अधिकार गट आणि परदेशी माध्यमांच्या बातम्यांनुसार तिबेटी मुलांना त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे करून मंदारिन भाषेच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले जात आहे, ज्यामुळे तिबेटची मूळ सांस्कृतिक आणि भाषिक ओळख नष्ट होत आहे.

शिन्हुआने वृत्त दिले की शी यांनी ल्हासा येथे कर्नल आणि त्यावरील पदांचे कार्यकर्ते, न्यायिक अधिकारी, पोलिस आणि लष्करी अधिकाऱ्यांशी भेट घेतली. त्यांनी तिबेटमध्ये तैनात असलेल्या सैन्यांना “कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समिती आणि केंद्रीय लष्करी आयोगाच्या वतीने” शुभेच्छा दिल्या. परदेशी विश्लेषकांसाठी, औपचारिक बैठकांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश केल्याने हे अधोरेखित झाले की तिबेटमध्ये स्थिरता राखण्यासाठी सर्वप्रथम बळाचा वापर केला जातो.

तिबेट हा देश धोरणात्मकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. परराष्ट्र माध्यमांनी भारताशी असलेल्या त्याच्या लांबच लांब सीमारेषेची नोंद घेतली आहे, जिथे अलिकडच्या काळात चिनी आणि भारतीय सैन्यांमध्ये संघर्ष झाला आहे, विशेषतः 2020 मध्ये झालेली प्राणघातक चकमक. शी यांचे ल्हासा येथील आगमन या आठवड्यात चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या नवी दिल्ली भेटीबरोबरच झाले, जिथे दोन्ही बाजूंनी संबंध स्थिर करण्याचे आश्वासन दिले.

यारलुंग त्सांगपो धरणामुळे तणावात आणखी भर टाकली आहे: खालच्या दिशेला असलेल्या भारताने हिमालयीन नदी प्रणालींवर चीनच्या नियंत्रणाबद्दल असमाधान व्यक्त केले आहे. परराष्ट्र वृत्तांतात या प्रकल्पाचे वर्णन केवळ विकास उपक्रमच नाही तर एक भू-राजकीय जुगार देखील आहे, ज्याचे परिणाम तिबेटच्या पलीकडे पसरलेले आहेत.

बीजिंगच्या म्हणण्यानुसार, स्वायत्त प्रदेश म्हणून तिबेटची 60 वर्षांची गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधा आणि वांशिक एकतेची कहाणी आहे. राज्य माध्यमांच्या वृत्तांकनानुसार ल्हासामध्ये,  संगीत, नृत्य आणि “आनंददायी लयी” यांचा एक उत्सव सादर झाला आहे.

पण निर्वासित तिबेटी लोकांसाठी, प्रत्येक रस्त्यावरील सैनिकांच्या उपस्थितीमुळे मिरवणूक झाकली गेली.  ‘व्हॉईस ऑफ तिबेट’ ने लिहिले आहे की, ‘बळकावलेली जमीन उत्सव साजरा करत नाही- ती गुपचूप सगळं सहन करते.’

हा विरोधाभास अधिक तीव्र असू शकत नाहीः शी जिनपिंग यांच्यासाठी तिबेट हे कम्युनिस्ट पक्षाचे यश आणि निष्ठेचे प्रदर्शन आहे. अनेक तिबेटी लोकांसाठी, ही लष्करी ताब्यात असलेली भूमी आहे, जिथे सैन्याच्या देखरेखीखाली उत्सव साजरे केले जातात आणि जिथे सुरक्षेच्या नावाखाली फुगे आणि पतंग देखील निषिद्ध आहेत.

रामानंद सेनगुप्ता

+ posts
Previous articleU.S. Tariffs Renew Urgency for India’s Jet Engine Autonomy
Next articleMission Divyastra on Track: India Nears Closure on Agni-5 Deployment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here