ब्रिटनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी, ख्रिस्ती गटाच्या प्रमुखाला दोषी ठरवले

0

ब्रिटनमध्ये, एका ‘कल्ट’सदृष ख्रिस्ती संघटनेच्या प्रमुखाला, गुरुवारी ज्युरींच्या अंतिम निर्णयानंतर, त्याच्याच गटातील 9 महिलांवरील लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. यापूर्वी त्याला चर्च ऑफ इंग्लंडने पाठिंबा दिला होता.

ख्रिस ब्रेन या 68 वर्षीय इसमाने, 1980 आणि 1990 च्या दशकात, उत्तर इंग्लंडमधील शेफील्ड येथे ‘9’O क्लॉक सर्व्हिस’ नावाच्या इव्हँजेलिकल चर्च चळवळीचे नेतृत्व केले होते.

या ख्रिस्ती गटाच्या नाईटक्लब-शैलीतील सेवा, रविवारी रात्री 9 वाजता घेतल्या जात असत, ज्यामध्ये लाइव्ह बँड असायचा आणि शेकडो तरुण-तरूणी त्याकडे आकर्षित होत असत.

मात्र, सरकारी वकिलांनी सांगितले की, “ब्रेनने गटातील सदस्यांवर नियंत्रण ठेवले, त्यांना त्यांच्या कुटुंबापासून आणि मित्रांपासून दूर ठेवले आणि आपल्या स्थानाचा गैरवापर करून अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केला.”

सरकारी वकील टिम क्लार्क म्हणाले की, “ब्रेनची एक “होमबेस टीम” होती, ज्यात तरुण महिलांचा समावेश होता, ज्या शेफील्ड येथील त्यांच्या घरात ब्रेन, त्याची पत्नी आणि मुलीची काळजी घेत असत. त्यांना “लायक्रा नन्स” (lycra nuns) असे टोपणनाव दिले होते.”

1981 ते 1995 दरम्यान, 13 महिलांशी संबंधित एकूण 36 विनयभंग आणि एका बलात्काराच्या आरोपाखाली, त्याला दोषी ठरवण्यात आले होते. त्याने हे आरोप नाकारत, प्रत्येक लैंगिक संबंध हा परस्पर सहमतीने झाला होता, असे सांगितले.

बुधवारी, इनर लंडन क्राउन कोर्टातील खटल्यानंतर, ब्रेनला नऊ महिलांशी संबंधित 17 विनयभंगाच्या आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले.

ब्रिटनच्या क्राउन प्रोसिक्युशन सर्व्हिसने गुरुवारी सांगितले की, “उर्वरित चार विनयभंगाचे आणि कथित बलात्काराच्या आरोपांवर ज्युरी कोणताही निर्णय देऊ शकले नाहीत आणि लवकरच पुन्हा खटला सुरू करण्याचा काळजीपूर्वक केला जाईल.”

‘चर्चचे अपयश’

‘नाइन ओ’क्लॉक सर्व्हिस’ला चर्च ऑफ इंग्लंडने याआधी पाठिंबा दिला होता. सरकारी वकिलांनी सांगितले की, “1990 मध्ये आर्कबिशप ऑफ कँटरबरी-इलेक्ट, जॉर्ज केरी यांनी ब्रेनच्या पद्धतींवर चर्चा करण्यासाठी त्याची भेट घेतली होती.”

“ब्रेनच्या धर्मग्रहण प्रक्रियेला गती देण्यात आली आणि ‘नाइन ओ’क्लॉक सर्व्हिस’ने, या समारंभासाठी 1986 च्या ‘द मिशन’ चित्रपटातील रॉबर्ट डी नीरोच्या वेशभूषेसाठी मोठी रक्कम खर्च केली,” असे सरकारी वकिलांनी सांगितले.

परंतु, 1995 च्या BBC डॉक्युमेंटरीच्या प्रसारणापूर्वी ब्रेनने राजीनामा दिला आणि चर्च सोडले. या डॉक्युमेंटरीमध्ये त्याच्यावर लैंगिकदृष्ट्या अयोग्य वर्तनाचा आरोप होता. जॉर्ज केरी म्हणाले की, “जेव्हा हे आरोप सार्वजनिक झाले तेव्हा ते खूप दु:खी झाले आणि त्यांना जबर धक्का बसला.”

आपल्या बचावात ब्रेन म्हणाला की, “त्याला ‘नाइन ओ’क्लॉक सर्व्हिस’च्या सदस्यांकडून मसाज मिळत असे, जे कधीकधी लैंगिक क्रियाकलापांकडे वळत होते.” मात्र, गटातील महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या सर्व आरोपांचे त्याने खंडन केले.

शेफील्डचे बिशप पीट विल्कॉक्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “जे घडले, ते सत्ता आणि नेतृत्वाचा भयानक गैरवापर होता, जे कधीही व्हायला नको होते.”

“भूतकाळात जेव्हा याप्रकरणी चिंता व्यक्त केली गेली होती, मात्र त्यावर योग्यप्रकारे कारवाई केली गेली नाही, तेव्हा ते चर्चचे अपयश होते. त्या संस्थात्मक अपयशांसाठी मी बिनशर्त माफी मागतो.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या माहितीसह)

+ posts
Previous articleIndia and Algeria Strengthen Military Partnership as Army Chief Heads to Algiers
Next articleIndia Hosts Global Women Peacekeepers at UN Military Officers Course 2025

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here