पायदळ दिन: ज्या दिवशी भारताने काश्मीरचे रक्षण केले

0
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल आणखी एक “काश्मीरसाठी काळा दिवस” ​​असे निवेदन जारी केले असताना, भारताने मात्र 27 ऑक्टोबर रोजी पायदळ दिन साजरा केला.  पाकिस्तानच्या पाठिंब्याने केलेल्या सशस्त्र आक्रमणाला परतवून लावण्यासाठी भारतीय सैनिकांना 27 ऑक्टोबर 1947 च्या सकाळी0श्रीनगरमध्ये विमानाने नेण्यात आले होते.

भारतासाठी, हा योगायोग एक ऐतिहासिक आणि धोरणात्मक आठवण करून देतो: भारतीय सैन्याने कायदेशीर प्रवेशानंतर केलेली पहिली कारवाई ही संरक्षणाची होती, आक्रमणाची नव्हती.

आक्रमणापासून विलिनीकरणापर्यंत: 1947 चा घटनाक्रम

22 ऑक्टोबर 1947 रोजी, पाकिस्तानी सैन्याच्या मार्गदर्शनाखाली सशस्त्र आणि निर्देशित हजारो आदिवासी सैनिक मुझफ्फराबाद मार्गे जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसले. काही दिवसांतच, हल्लेखोर बारामुल्ला येथे पोहोचले आणि श्रीनगरकडे आगेकूच करताना स्थानिक नागरिकांवर अत्याचार करत होते.

राज्याचे शासक महाराजा हरी सिंह यांनी नवी दिल्लीला मदतीसाठी आवाहन केले. 26 ऑक्टोबर रोजी, त्यांनी विलिनीकरणाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली आणि शेकडो संस्थानांसाठी वापरण्यात आलेल्या संवैधानिक प्रक्रियेनुसार भारतात सामील झाले. दुसऱ्या दिवशी गव्हर्नर-जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी जम्मू काश्मीरच्या भारतातील विलिनीकरणाला मंजूरी दिली.

27 ऑक्टोबर 1947 रोजी पहाटे, भारतीय हवाई दलाच्या डकोटा विमानाने श्रीनगर विमानतळावर 1 शीख रेजिमेंटच्या तुकड्या उतरवण्यास सुरुवात केली. त्यांचे तात्काळ ध्येय: हवाई पट्टी सुरक्षित करणे आणि आक्रमण करणाऱ्यांना थोपवून धरणे हे होतं. या कारवाईमुळे श्रीनगरचे पतन रोखले गेले आणि स्वतंत्र भारतीय सैन्याच्या सर्वात निर्णायक सुरुवातीच्या कारवायांपैकी ही एक कारवाई म्हणून इतिहासात याची नोंद झाली.

भारताचा बचावात्मक प्रतिसाद विरुद्ध पाकिस्तानचा पहिला आक्रमकपणा

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ताज्या निवेदनात भारताला “कब्जा करणारा” देश म्हणून संबोधित करण्याच्या त्याच्या परिचित ओळीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे.

तरीही, ऐतिहासिक नोंद स्पष्ट आहे. पाकिस्तानने शेजारील देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणाऱ्या सैन्याला पाठिंबा देऊन संघर्ष सुरू केला.

कायदेशीररित्या मान्यताप्राप्त घटकाकडून मदतीचा औपचारिक विनंती अर्ज मिळाल्यानंतरच भारताने प्रतिसाद दिला.

हा कालक्रम स्पष्टपणे ब्रिटिश, भारतीय आणि संयुक्त राष्ट्रांच्या अभिलेखागारात नोंदवलेला आहे. म्हणून, पायदळ दिन हा विजय नव्हे तर वैधता आणि संरक्षणाचे प्रतीक आहे.

वास्तवाशी विसंगत असे प्रचारकथन

दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचे राजनैतिक संदेश नियंत्रण रेषेच्या बाजूला असलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करतात. अलिकडच्या काही महिन्यांत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) मोठ्या प्रमाणात सुरू असणाऱ्या निदर्शनांनी इस्लामाबादच्या या प्रदेशाकडे सततच्या राजकीय आणि आर्थिक दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे. वीजटंचाई आणि कर आकारणीवरून मुझफ्फराबाद, धीरकोट आणि दादयाल येथे झालेल्या निदर्शनांमध्ये निदर्शकांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्राणघातक कारवाईचा सामना करावा लागला, ज्यामध्ये किमान दहा नागरिकांचा मृत्यू झाला तर शंभराहून अधिक जखमी झाले.

आंतरराष्ट्रीय आउटलेट्स आणि हक्क निरीक्षकांनी कर्फ्यू, अटक आणि इंटरनेट ब्लॅकआउटचे दस्तऐवजीकरण केले आहे, जे काश्मिरी हक्कांचे रक्षक म्हणून पाकिस्तानच्या स्वतःच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आहे.

संरक्षण विश्लेषकांसाठी, या घडामोडी इस्लामाबादच्या बाह्य वक्तृत्व आणि अंतर्गत प्रशासनातील अपयशांमधील वाढती दरी अधोरेखित करतात.

पायदळ दिनाचे धोरणात्मक महत्त्व

स्मरणोत्सवाव्यतिरिक्त, पायदळ दिन हा भारताच्या कायदेशीर संरक्षण आणि जलद गतिशीलतेच्या मूलभूत सिद्धांताची पुष्टी करतो – जे तत्व लष्करी नियोजन परिभाषित करत राहतात.

1947 मध्ये प्रवेशानंतर काही तासांतच झालेल्या एअरलिफ्टमुळे, लष्कर आणि हवाई दल यांच्यातील वेग, पुढाकार आणि संयुक्तपणे कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न म्हणजे एखाद्या पाठ्यपुस्तकातील उदाहरण आहे.

आज, भारत हवाई दल गतिशीलता प्लॅटफॉर्म, आयएसआर एकत्रीकरण आणि थिएटराझेशनच्या तयारीमध्ये गुंतवणूक करत असताना, 27 ऑक्टोबरचे धडे अद्यापही गिरवले जात आहेत, जे आहेत: प्रादेशिक अखंडता जपण्यासाठी संकरित आक्रमणाला जलद, समन्वित प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

कायदेशीरता, सार्वभौमत्व आणि आधुनिक प्रासंगिकता

जम्मू आणि काश्मीरबाबतची भारताची भूमिका कायदेशीर प्रवेश, लोकशाही शासन आणि विकासात्मक समावेशन यावर आधारित आहे. पाकिस्तानची भूमिका ही आक्रमकता आणि बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशांवर सतत कब्जा करण्यामध्ये आहे.

इस्लामाबाद वार्षिक निवेदनांद्वारे या मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना, पीओके आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील दडपशाही आणि वंचिततेमुळे त्याची विश्वासार्हता कमी होते.

भारताच्या धोरणात्मक समुदायासाठी, पायदळ दिन 2025 चा संदेश ऐतिहासिक आणि समकालीन दोन्ही आहे: 1947 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या संरक्षणाने आज हिमालयात भारताच्या सुरक्षा भूमिकेसाठी नैतिक आणि कार्यात्मक पाया घातला गेला.

पायदळ दिन 2025 हा पाकिस्तानच्या नव्याने सुरू झालेल्या प्रचार हल्ल्याशी जुळतो, परंतु इतिहासात अस्पष्टतेसाठी फारशी जागा नाही.

भारतीय सैन्याने हल्ला झालेल्या सार्वभौम राज्याचे कायदेशीर रक्षक म्हणून काश्मीरमध्ये प्रवेश केला.

अठ्ठ्याहत्तर वर्षांनंतर, पाकिस्तानला त्यांच्याच व्यापलेल्या प्रदेशात अशांततेचा सामना करावा लागत असताना, भारतीय पायदळ स्थिरता, सार्वभौमत्व आणि कायदेशीर संरक्षणासाठी उभे आहे, त्याच तत्त्वांसाठी ज्यासाठी ते पहिली लढाई लढले होते.

पायदळ दिन हा कब्जा करण्याचा दिवस नाही; हा दिवस आहे जेव्हा भारतीय सैनिकांनी काश्मीर वाचवले.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleInfantry Day 2025: The Day India Defended a Legally Acceded Kashmir
Next articleजपानच्या नवीन पंतप्रधानांच्या भूमिकेमुळे चीन सावध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here