रशियाने ‘पोसायडॉन’ या अण्वस्त्र-सक्षम टॉर्पेडोची यशस्वी चाचणी घेतली- पुतिन

0

“रशियाने आपल्या ‘पोसायडॉन’ या अणु-शक्तीवर चालणाऱ्या सुपर टॉर्पेडोची यशस्वी चाचणी घेतली आहे,” असे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी जाहीर केले. लष्करी विश्लेषकांनी असा इशारा दिला आहे की, या शक्तीशाली शस्त्र प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गी समुद्री लाटा निर्माण होऊन, किनारी भाग उद्ध्वस्त होऊ शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी ररशियाबद्दलचे त्यांचे वक्तृत्व आणि भूमिका अधिक कठोर केल्यामुळे, पुतिन यांनी 21 ऑक्टोबर रोजी, नवीन ब्युरोव्हेस्टनिक क्रूझ मिसाईलची चाचणी घेत, तसेच 22 ऑक्टोबर रोजी, आण्विक प्रक्षेपण कवायतींद्वारे आपले आण्विक बळ सार्वजनिकरित्या जगासमोर प्रदर्शित केले आहे.

‘पोसायडॉन’ हे नाव, ग्रीक समुद्रातील प्राचीन देवावरून देण्यात आले असून, हे शस्त्र एक अण्वस्त्र-सक्षम टॉर्पेडो आणि ड्रोनचा एक प्रकार आहे, परंतु याबद्दल पडताळणी केलेली फार कमी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे.

मॉस्को येथील एका रुग्णालयात, युक्रेन युद्धात जखमी झालेल्या रशियन सैनिकांसोबत चहा-केक घेत असताना पुतिन यांनी, ‘मंगळवारी ही चाचणी पार पडली’ असे सांगितले.

पुतिन म्हणाले की, “प्रथमच आम्ही हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला, ज्यात आम्ही टॉर्पेडोला वाहून नेणाऱ्या पाणबुडीतून केवळ लाँच इंजिनच्या साहाय्याने प्रक्षेपित केले नाही, तर त्यावरील अणु ऊर्जा युनिट देखील कार्यान्वित केले. या अणु ऊर्जा युनिटच्या मदतीने टॉर्पेडो काही काळ सक्रिय राहिले.”

ते पुढे म्हणाले की, “हे अद्वितीय आहे. ‘पोसायडॉन’ला अडवणे अशक्य आहे. विश्लेषकांचा अंदाज आहे की, त्याची मारक क्षमता 10,000 किमी (6,200 miles) इतकी आहे आणि ते सुमारे 185 किमी/प्रतीतास वेगाने प्रवास करू शकते.”

ब्युरोव्हेस्टनिक आणि पोसायडॉनच्या या यशस्वी चाचण्यांद्वारे, रशियाला पुतिन यांच्या शब्दांत हा स्पष्ट संदेश द्यायचा आहे की, ‘युक्रेनवरील युद्धामुळे रशिया पाश्चिमात्य दबावापुढे कधीच झुकणार नाही.’

ज्या ट्रम्प यांनी युक्रेनला त्वरित पराभूत करण्यात अपयशी ठरल्याबद्दल रशियाला “कागदी वाघ” म्हटले होते, त्यांच्यासाठी हा स्पष्ट संदेश आहे की: रशिया विशेषत: आण्विक शस्त्रांच्या बाबतीत जागतिक लष्करी प्रतिस्पर्धी ठामपणे आहे आणि मॉस्कोच्या आण्विक शस्त्र नियंत्रण प्रस्तावांवर कार्यवाही करणेही आवश्यक आहे.

पोसायडॉन आणि नवीन अण्वस्त्र शर्यत

‘पोसायडॉन’ ही एक ताकदवर शस्त्र आहे, जे पुतिन यांनी- अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यात आपआपल्या आण्विक शस्त्रागारांचे आधुनिकीकरण आणि विकास करण्यासाठी सुरू असलेल्या शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत उतरवले आहे.

रशियन माध्यमांनुसार, ‘नाटो’ मध्ये कॅनियन म्हणून ओळखले जाणारे ‘पोसायडॉन’ हे 20 मीटर लांब, 1.8 मीटर व्यासाचे आणि 100 टन वजनाचे शक्तीशाली शस्त्र आहे.

शस्त्र नियंत्रण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘हे शस्त्र पारंपारिक आण्विक प्रतिबंध आणि वर्गीकरण नियमांपैकी बहुतेक नियम मोडते.’ त्यांच्या अंदाजानुसार, यामध्ये दोन मेगाटन वॉरहेडची क्षमता असू शकते आणि कदाचित हे लिक्विड-मेटल-कूल्ड रिऍक्टरद्वारे चालू शकते.

पुतिन म्हणाले की, “पोसायडॉनची शक्ती आमच्या सर्वात विश्वासार्ह आंतरखंडीय-श्रेणी मिसाईलपेक्षाही” जास्त आहे, ज्याला SS-X-29 किंवा सॅटन II (Satan II) म्हणून ओळखले जाते.

1972 च्या अँटी-बॅलिस्टिक मिसाईल करारामधून, वॉशिंग्टनने 2001 मध्ये एकतर्फी माघार घेतल्यानंतर, सुरु झालेल्या अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण कवच तयार करण्याच्या हालचालींना तसेच नाटोच्या पूर्वेकडील विस्ताराला, रशियाकडून चोख प्रत्युत्तर म्हणून पुतिन यांनी 2018 मध्ये, ‘पोसायडॉन’ आणि ‘ब्युरोव्हेस्टनिक’ शस्त्रांची घोषणा केली.

रशियाने ‘ब्युरोव्हेस्टनिक’ यशस्वी चाचणी केल्यानंतर, ट्रम्प म्हणाले होते की: “पुतिन यांनी अण्विक-शक्तीवर चालणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याऐवजी युक्रेनमधील युद्ध संपवावे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous article12 अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान प्रकार DRDO कडून उद्योग भागीदारांना सुपूर्द
Next articleExercise Trishul: India’s Massive Tri-Service Wargame That Has Pakistan on Edge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here