शटडाऊन कायम राहिल्यास अमेरिकेत हॉलिडे एव्हिएशनचे संकट: व्हॅन्स

0
सरकारी शटडाऊन सुरूच राहिले तर थँक्सगिव्हिंगच्या सुट्टीत अमेरिकेमध्ये प्रवासात गंभीर व्यत्यय निर्माण होऊ शकतो असा इशारा उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी गुरुवारी दिला. त्यांनी डेमोक्रॅट्सना सरकारचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची व्यवस्था करण्याचे आवाहन केले.

अमेरिकन एअरलाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्स, युनियन आणि इतर विमान वाहतूक उद्योग अधिकाऱ्यांसोबत व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीनंतर व्हान्स म्हणाले की नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत शटडाऊन सुरूच राहिले तर कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती वाढू शकते. यामुळे सिक्युरिटी चेकसाठीच्या रांगा वाढू शकतात आणि उड्डाणांना विलंब होऊ शकतो.

“ही एक आपत्ती असू शकते. ती खरोखर येऊ शकते, कारण त्या वेळी तुम्ही लोकांचे तीन पगार चुकवल्याबद्दल बोलणार आहात,” असे म्हणत व्हान्स पुढे म्हणाले “त्यापैकी किती कर्मचारी कामावर येणार नाहीत?”

डेल्टा एअर लाइन्स, युनायटेड, साउथवेस्ट एअरलाइन्स आणि अमेरिकन या सर्वांनी काँग्रेसला सरकारचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी आणि आरोग्य सेवा धोरण वादांवरील चर्चा सुरू ठेवण्यासाठी सतत ठराव किंवा “सीआर” म्हणून ओळखले जाणारे स्टॉप-गॅप फंडिंग बिल त्वरित मंजूर करण्याचे आवाहन केले.

विमान वाहतुकीत व्यत्यय

30 दिवसांच्या सरकारी बंदमुळे हवाई वाहतूक नियंत्रकाच्या अनुपस्थितीमुळे उड्डाणांमधील विलंबांमध्ये वाढ झाली असून हजारो उड्डाणांवर परिणाम झाला आहे, असे वाहतूक विभागाने म्हटले आहे.

“यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे,” असे युनायटेडचे ​​सीईओ स्कॉट किर्बी यांनी पत्रकारांना सांगितले, याशिवाय बुकिंगवरही परिणाम होत आहे. “त्यामुळे स्वच्छ सीआर पास करण्याची वेळ आली आहे.”

डेल्टाने म्हटले आहे की “दडपणाखाली असलेली यंत्रणा मंदावली असून त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे. दररोज आकाशात उड्डाण करणाऱ्या लाखो लोकांना विलंबाचा फटका बसत आहे.”

शटडाऊनमुळे 13 हजार  हवाई वाहतूक नियंत्रक आणि 50 हजार वाहतूक सुरक्षा प्रशासन अधिकाऱ्यांना पगाराशिवाय काम करावे लागले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

विमान वाहतूक सुरक्षेच्या धोक्यांचा हवाला देत विमान कंपन्यांनी हा शटडाऊन संपविण्याची वारंवार विनंती केली आहे.

शटडाऊनमुळे आधीच कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना ही बैठक पार पडली. 2019 मध्ये 35 दिवसांच्या सरकारी शटडाऊनला मदत करणाऱ्या विलंबांसारखाच व्यापक व्यत्यय निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डफी म्हणाले की, रविवारी 44 टक्के आणि सोमवारी 24 टक्के विलंब हवाई वाहतूक नियंत्रकांच्या अनुपस्थितीमुळे झाला, जो  शटडाऊनपूर्वी सरासरी 5 टक्के होता.

मंगळवारी पहिला पूर्ण पगार चुकल्यानंतर शेकडो हवाई वाहतूक नियंत्रकांनी आपली बिलं भरण्यासाठी आवश्यक असणारे पैसे कमावण्यासाठी दुसऱ्या नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. एअरलाइन्स आणि इतर कंपन्या विमानतळांवर TSA चे एजंट आणि इतर फेडरल कर्मचाऱ्यांना अन्न पाकिटे पुरवत आहेत.

FAA मध्ये आवश्यकतेपेक्षा सुमारे 3 हजार 500 हवाई वाहतूक नियंत्रकांची कमतरता आहे. अनेकजण शटडाऊनपूर्वीच  अनिवार्यपणे ओव्हरटाइम आणि आठवड्यातून सहा दिवस काम करत होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleव्यापार चर्चेनंतर शी जिनपिंग यांनी, APEC शिखर परिषदेत नेतृत्व केले
Next articleL&T, General Atomics Forge JV to Manufacture MALE Drone – RPAS in India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here