पुण्यातील नव्या अभियांत्रिकी सुविधेमुळे डसॉल्ट एव्हिएशनचा भारतात विस्तार

0
फ्रेंच एरोस्पेस प्रमुख डसॉल्ट एव्हिएशनने मंगळवारी महाराष्ट्रातील पुणे येथे डसॉल्ट एअरक्राफ्ट सर्व्हिसेस इंडिया या अभियांत्रिकी केंद्रासाठीच्या नवीन परिसराचे उद्घाटन करून आपल्या भारतीय कामकाजाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याची घोषणा केली.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, हे पाऊल “‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत दिलेल्या वचनबद्धतेनुसार” असून डसॉल्टच्या भारतातील एरोस्पेस इकोसिस्टमशी दीर्घकालीन भागीदारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या विस्तारामुळे केंद्राची 150  हून अधिक अभियंत्यांना सामावून घेण्याची क्षमता दुप्पट होईल, ज्यामुळे अत्याधुनिक तांत्रिक क्षमता निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक तज्ज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी डसॉल्टच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. ही सुविधा कंपनीच्या अंतर्गत कामकाज आणि तिच्या व्यापक भारतीय आणि जागतिक पुरवठा साखळीला समर्थन देईल, असे निवेदनात म्हटले आहे.

डसॉल्टने म्हटले आहे की, पुणे येथील हे केंद्र स्थानिक डिझाइन, अभियांत्रिकी आणि औद्योगिक क्षमता मजबूत करण्याच्या त्यांच्या व्यापक धोरणाशी सुसंगत आहे, तसेच यामुळे भारतीय भागीदार आणि पुरवठादारांसोबत सहकार्य वाढवता येईल. हा उपक्रम भारतीय हवाई दलाशी राफेल लढाऊ विमान करारांतर्गत कंपनीच्या ऑफसेट जबाबदाऱ्यांना देखील हातभार लावेल.

“हा विस्तार दसॉल्ट एव्हिएशनच्या भारताच्या एरोस्पेस क्षेत्रातील भविष्यात गुंतवणूक करण्याच्या दृढनिश्चयाचे प्रदर्शन करते, तसेच सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत व्हिजनच्या अनुषंगाने स्वदेशी क्षमतांच्या विकासाला पाठिंबा देते,” असे कंपनीने नमूद केले.

पुणे अभियांत्रिकी केंद्र हे दसॉल्टच्या भारतातील वाढत्या औद्योगिक उपस्थितीचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे, ज्यामध्ये उत्पादन, देखभाल आणि तंत्रज्ञान हस्तांतरणातील भागीदारी समाविष्ट आहे. संरक्षण स्वदेशीकरणाला चालना देण्यासाठी आणि उच्च-तंत्रज्ञान संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी भारताकडून सुरू असणाऱ्या  प्रयत्नांदरम्यान हा विस्तार करण्यात आला आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDassault Aviation Expands India Footprint with New Engineering Facility in Pune
Next articleIndia’s Defence Reforms Link Speed with Sovereignty

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here