नवीन व्यापार मार्गांबाबत भारत, अफगाणिस्तान यांच्यात चर्चा

0
भारत
21 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहज नूरुद्दीन अजीजी यांच्यासमवेत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर 
पाकिस्तानने प्रमुख सीमा वाहतूक ठिकाणे बंद केल्यामुळे काबुलला निर्यातीत मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान नवीन पुरवठा साखळी आणि पर्यायी व्यापार कॉरिडॉरवर त्यांचे संबंध वाढवण्याचा विचार करत आहेत. गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या विस्तृत चर्चेत दोन्ही बाजूंनी पाकिस्तानला बायपास करण्याचे, वस्तूंची वाहतूक सुलभ करण्याचे, बाजारपेठेत प्रवेश वाढवण्याचे आणि दीर्घकालीन आर्थिक सहकार्य वाढवण्याचे पर्याय तपासण्यात आले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाच दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या व्यापारी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अल्हाज नूरुद्दीन अजीजी यांची भेट घेतली. जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या विकास आणि कल्याणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, तर अजीजी यांनी 11 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने सीमा ओलांडायला मनाई  केल्यानंतर काबुलला विश्वासार्ह मार्गांची तातडीची गरज असल्याचे सांगितले.

या बंदमुळे एका महिन्याहून अधिक काळ अफगाण निर्यात थांबली आहे, ज्यामुळे काबुलला 90 दिवसांच्या आत प्रलंबित करार पूर्ण करण्याचे निर्देश व्यापाऱ्यांना द्यावे लागले. अफगाण अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की ते पाकिस्तानवरील अवलंबित्व कमी करण्यास तयार आहेत, ज्यामुळे भारत आणि इराण त्यांच्या सुधारित व्यावसायिक आणि कनेक्टिव्हिटी धोरणात केंद्रस्थानी आहेत. चाबहार बंदरासाठी भारताला अमेरिकेच्या निर्बंधांमधून पुन्हा एकदा सूट मिळाल्याने हा पर्याय आणखी मजबूत झाला आहे, ज्यामुळे अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर थेट सागरी प्रवेश मिळाला आहे.

अजीजी यांनी इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरला (IITF)  देखील भेट दिली, जिथे त्यांना इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे व्यवस्थापकीय संचालक नीरज खरवाल यांनी व्यावसायिक संधी आणि भविष्यातील सहभागाबद्दल माहिती दिली. सध्या सुरू असणाऱ्या प्रादेशिक अडथळ्यांनंतरही व्यापाराचे प्रमाण कसे संरक्षित करता येईल याचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी भारतस्थित अफगाण व्यापाऱ्यांची भेट घेतली.

व्यापाराव्यतिरिक्त, विकास सहकार्याचाही या चर्चेत समावेश होता. अफगाणिस्तानमध्ये भारताची पूर्वीची गुंतवणूक – विशेषतः जलविद्युत क्षेत्रात – ही नवीन सहकार्यासाठी संभाव्य क्षेत्रे आहेत. सलमा धरणासारख्या प्रकल्पांमध्ये भारताच्या भूमिकेवर आधारित शाश्वत जल व्यवस्थापन आणि जलविद्युत विकासाच्या गरजेवर दोन्ही सरकारांनी अलीकडेच भर दिला आहे,

अजीजी यांच्या भेटीतील सर्वात महत्त्वाचा क्षण शुक्रवारी असेल जेव्हा ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. या भेटीत अफगाण अधिकारी दोन प्रस्ताव मांडतील अशी अपेक्षा आहे: एक समर्पित भारत-अफगाणिस्तान हवाई-कार्गो पूल आणि चाबहार सागरी कॉरिडॉरचा विस्तारित अफगाण वापर. काबूल निर्यात स्थिर करण्यासाठी आणि पाकिस्तानच्या अंदाज लावता न येणाऱ्या सीमा बंद करण्याच्या निर्णयापासून त्याच्या अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी दोन्ही आवश्यक मानतो.

दरम्यान, भारत हा अफगाणिस्तानच्या औषधनिर्माण, यंत्रसामुग्री, कापड, चहा आणि अन्न उत्पादनांच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहे. त्याच वेळी, अफगाणिस्तान भारतीय व्यवसायांना कृषी, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रात संधी देते – अशा क्षेत्रांमध्ये जिथे काबूल परदेशी गुंतवणूकदार शोधत आहे आणि जिथे चीनने आधीच शिरकाव केला आहे. गोयल-अजीझी बैठकीचा निकाल भारत-अफगाणिस्तान व्यावसायिक सहभागाचा पुढील टप्पा निश्चित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर नवीन कॉरिडॉरना धोरणात्मक मंजुरी मिळाली तर ते काबूलच्या आर्थिक स्थितीला आकार देऊ शकतात.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleSouth Africa’s G20: अमेरिकेचा बहिष्कार तर मोदींचा सहभाग
Next articleकोलंबो सुरक्षा परिषद: आव्हाने आणि सुरक्षिततेविषयी NSA डोवाल यांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here